बॉलिवूडमध्ये काही डान्स कोरियोग्राफर आहेत. पण सरोज खान यांची बातच काही वेगळी होती. त्यांनी ३ हजारांपेक्षा अधिक गाण्यासाठी कोरियोग्राफी केली. काही कलाकारांना शिकवलेच पण त्याचसोबत काही आयकॉनिक स्टेप्सही दिल्या. आज सरोज खान या जगात नाहीत. पण त्यांचे चाहते त्यांना अजूनही विसरलेले नाहीत. प्रोफेशनल लाइफमध्ये जेवढे त्यांना यश मिळाले तेवढेच खासगी आयुष्यात चढ-उतार आले. तुम्हाला माहितेय का, सरोज खान यांचे वयाच्या १३ व्या वर्षात लग्न झाले होते. ज्या व्यक्तीशी त्यांचे लग्न झाले होते तो त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठा होता. (Saroj Khan)
सरोज खान यांचे खरे नाव निर्मला नागपाल होते. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद संधु आणि आईचे नाव नोनी सिंह होते. १९४८ मध्ये जन्मलेल्या सरोज खान भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर आई-वडिलांसोबत भारतात आल्या होत्या. येथेच त्या स्थायिक झाल्या. येथे आल्यानंतर वयाच्या तिसऱ्या वर्षात सरोज खान यांनी आपल्या करियरची सुरुवात केली होती. ५० च्या दशकात सरोज खान सिनेमात बॅकग्राउंड डांन्सर म्हणून काम करायच्या. त्यांनी कोरियोग्राफी बी. सोहनलाल यांच्याकडून शिकल्या.
सरोज खान यांचा पहिला नवरा आणि मुलं
जेव्हा सरोज खान १३ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्यासोबत लग्न केले. पण ते वयाने त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठे होते. सोहनलाल यांचे त्यावेळी वय ४३ वर्ष होते. सरोज खान यांना माहिती सुद्धा नव्हते ज्या व्यक्तीशी आपले लग्न झाले आहे ते आधीच विवाहित होते. त्यांना चार मुलं सुद्धा आहेत. खरंतर एक दिवशी सरोज खान यांच्या गळ्यात बी. सोहनलाल यांनी एक काळा धागा बांधला होता. त्यामुळे त्यांना वाटले की त्यांचे लग्न झाले आहे.
सोहनलाल यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर दररोज त्या शाळेत जायच्या. त्यांना हे माहिती नव्हते की, आपला नवरा आधीच चार मुलांचा बाबा आहे. सरोज खान यांना त्यांच्याबद्दल हे तेव्हा कळले जेव्हा त्या १९६३ मध्ये स्वत: आई झाल्या. त्यांनी राजू नावाच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी सरोज खान पुन्हा आई झाल्या पण बाळ काही महिन्यांनी जीवंत राहिले नाही.(Saroj Khan)
नवऱ्यासोबत घटस्फोट, इस्लाम कबुल करून दुसरे लग्न
तो पर्यंत सोहनलाल यांनी सरोज खान यांच्या मुलांना आपले नाव दिले नव्हते. सरोज खान यांनी जेव्हा याबद्दल विचारले असता त्यांनी मुलांना माझे नाव देऊ नये असे सोहनलाल यांनी स्पष्टपणे सांगितले. याच कारणास्तव त्यांचे वैवाहिक नाते मोडले गेले. सरोज खान या नवऱ्यापासून विभक्त झाल्या.त्यानंतर त्यांनी सरदार रोशन खान यांच्यासोबत १९७५ मध्ये लग्न केले. इस्लाम धर्म स्विकारत आपले नाव ही बदलले. तेव्हा त्या निर्मला वरून सरोज खान झाल्या, सरोज आणि रोशन खान यांनी मुलीला जन्म दिला. तिचे नाव सुकैना असून ती दुबईत डान्स इंस्टिट्युट चालवते.
हेही वाचा- जुही चावला म्हणते ‘माझ्यामुळे स्टार झाली’ करिश्मा कपूर