Saree wearing tips- बदलत्या ऋतूनुसार आपण आपली फॅशन आणि वॉडरोब मधील कपडे ही त्यानुसार घालणे पसंद करतो. तर सध्या पावसाळा सुरु झाला असून आपल्याला आरोग्याची काळजी तर घ्यावीच लागते पण आपली फॅशन ही बदलते. अशातच तुम्ही कॉलेजला, ऑफिसला जाणारे असाल तर त्यानुसार कपडे निवडावेत. मात्र जर ऐन पावसाळ्यात एखादे फॅमिली फंक्शन किंवा लग्न असेल तर आपण साडी कशी नेसायची असा प्रश्न पडतो. कारण पावसाळ्यात साडी नेसणे म्हणजे ती भिजली तर कार्यक्रमात ही तशीच घेऊन मिरवावे लागेल. त्यामुळे जर पावसाळ्यात तुम्ही साडी नेसण्याचा प्लॅन करत असाल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात घ्या.
-योग्य रंग निवडा
उन्हाळ्यात जसे आपण लाइट आणि पेस्टल शेड्स घालणे पसंद करतो कारण ते घातल्यानंतर छान दिसतात. तर मान्सूनमध्ये अशा प्रकारच्या काही शेड्स घालणे टाळावेत ज्याला सहज डाग लागू शकतात. त्यामुळे मान्सूनमध्ये गडद रंगाचे कपडे घाला. हिच बाब साडीच्या बाबतीत ही लक्षात असू द्या. तुमच्या स्किन टोन प्रमाणे कोणता गडद रंग हा तुम्हाला सूट होतोय हे सुद्धा पहा.
-हलक्या वजनाची साडी निवडा
पावसाळ्यात लाइटवेट फ्रॅब्रिक असेल अशा पद्धतीची साडी नेसा. कारण तुम्ही जरी पावसात भिजलात तरीही ती लगेच सुकण्यास मदत होईल. शिफॉन, जॉर्जेट, नेटच्या साड्या पावसाळ्यात बेस्ट ऑप्शन ठरतील. अन्य दुसऱ्या फॅब्रिकच्या तुलनेत स्वस्त ही असतात.
हे देखील वाचा- ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
-वॉटरप्रुफ मेकअप
साडी नेसल्यानंतर आपला साज दिसून येण्यासाठी प्रत्येक महिला मेकअप करतातच. अशातच पावसाळ्यात तुम्ही वॉटरप्रुफ मेकअप करा. जेणेकरुन भिजलात तरीही तुम्ही लावलेला मस्करा, काजळ किंवा लाइनजर हे टिकून राहील.(Saree wearing tips)
-फुटवेअर्सची निवड
अन्य गोष्टी जशा महत्वाच्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे फुटवेअर्सची निवड. पावसाळ्यात साडी नेसल्यानंतर हिल्सच्या चप्पल घालण्याऐवजी फ्लॅट किंवा बॅलरीना घालणे उत्तम राहिल. कारण पावसामुळे रस्ते निसरडे जरी झाले असतील तरीही तुमचा पाय घसरणार नाही. याचसोबत तुमच्या साडीसोबत ते मॅच ही होतील अशा पद्धतीचे घ्या.
-कमीत कमी ज्वेलरी घाला
ट्रेडिशनल कपडे घालायचे म्हणजे नट्टापट्टासह ज्वेलरी सुद्धा फार महत्वाची असते. कारण त्यामुळेच तुम्ही अधिक उठून दिसता. परंतु पावसाळ्यात तुम्ही अधिक ज्वेलरी घालणे टाळा. कारण तुम्ही ती घातल्यानंतर कंम्फर्टेबल असाल का किंवा त्यावर पाणी पडल्यास त्याचा त्रास होईल का याचा सुद्धा विचार करा आणि कमीत कमी ज्वेलरी घाला.