Home » बेली फॅट लपवण्यासाठी अशा प्रकारे नेसा साडी

बेली फॅट लपवण्यासाठी अशा प्रकारे नेसा साडी

बहुतांश महिलांचे प्रेग्नेंसीनंतर ओटीपोट सुटते आणि त्या लठ्ठपणाच्या शिकार होतात. अशातच एखादे कपडे घालताना त्या वारंवार विचार करतात.

by Team Gajawaja
0 comment
Saree draping tips
Share

बहुतांश महिलांचे प्रेग्नेंसीनंतर ओटीपोट सुटते आणि त्या लठ्ठपणाच्या शिकार होतात. अशातच एखादे कपडे घालताना त्या वारंवार विचार करतात. मात्र जेव्हा साडी नेसायची असते तेव्हा खासकरुन बेली फॅट लपवायचे कसे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. जर काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच तुमचे बेली फॅट साडीत लपवू शकता. यासाठी पाहूयात पुढील काही ट्रिक्स. (Saree draping tips)

रंगाची काळजी घ्या
कोणतेही कपडे घालण्यापूर्वी रंगसंगतीकडे लक्ष दिले पाहिजे आणि असे करणे फार महत्त्वाचे असते. कारण काही रंग असे असतात जे तुम्हाला स्लिम लूक देतात. रंगाबद्दल बोलायचे झाल्यास डार्क रंग नेहमीच तुम्हाला स्लिम लूक देतात. मात्र लाइट रंगात तुम्ही जाड दिसता. अशातच साडी खरेदी करताना तुम्ही डार्क रंगाची निवड करा. डार्कमध्ये काळा,ब्राउन, ब्लू, डार्क ग्रीन अशा रंगाची निवड करू शकता.

पदर लांब ठेवा
तुम्हाला साडीत स्लिम दिसायचे असेल तर पल्लू थोडा लांब ठेवा. कारण यामुळे तुमचे बेली फॅट लपले जातील. त्याचसोबत पदर हा थोडा सोडलेला ठेवल्यास तर तुमचे पोट झाकले जाईल आणि स्मार्ट लूक ही येईल. त्याचसोबत मागील आणि बाजूने फॅट लपवायचे असतील तर तुम्ही पदराला फिरवुन ब्लाउजला पिनअप करा. यामुळे सुद्धा बेली फॅट दिसणार नाहीत.

ब्लाउजचा रंग डार्क असावा
तुम्ही सध्याच्या ट्रेंन्ड पाहिलात तर कॉन्ट्रास्ट रंगाचा आहे. त्यामध्ये ब्लाउज डार्क रंगाचा असतो आणि साडी अधिक गडद रंगाची नसते. अशा प्रकारे तुम्ही कलर कॉन्ट्रास्ट केल्यास बॉडी शेपमध्ये दिसते. त्याचसोबत फॅट कमी दिसतात. लांब हाताचे ब्लाउज असेल तर तुमचे बेली फॅट हाइड होण्यास मदत होते. आजकाल तुम्ही पाहिले असेल की, ब्लाउजमध्ये अटॅच शर्ग ब्लाउज सध्या ट्रेंन्डमध्ये आहे. जे खांद्यापासून ते पोटाला कवर करतात. त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्लिम लूक मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही पेप्लम स्टाइल ब्लाउज सुद्धा घालू शकता. (Saree draping tips)

हेही वाचा- जीन्स दीर्घकाळ टिकून रहावी म्हणून धुण्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरुन पहा

जॉर्जेट किंवा शिफॉनची साडी
जर तु्म्हाला साडीत स्लिम दिसायचे असेत तर फुगणाऱ्या साड्या नेसू नका. त्याचसोबत जॉर्जेट किंवा शिफॉनच्या प्युअर फॅब्रिक असणाऱ्या साड्या नेसू शकता. यामध्ये तुम्ही एकदम स्लिम दिसाल. तुमचे फॅट्स कोठून ही दिसणार नाहीत. आजकाल यामध्ये खुप प्रकार तुम्हाला मिळतील.केवळ तुम्ही कशी ती कॅरी करता हे सुद्धा महत्त्वाचे ठरेल.क्रेपची साडी सुद्धा तुम्हाला स्लिम लूक देईल. त्यामुळे अशा प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्डरोब मध्ये जरुर ठेवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.