Home » ते होते म्हणून भारत अखंड देश म्हणून उभा आहे

ते होते म्हणून भारत अखंड देश म्हणून उभा आहे

by Team Gajawaja
0 comment
Sardar Vallabhbhai Patel
Share

ते नसते तर आज दिल्लीहून मुंबईला जाताना मध्ये वेगळे देश लागले असते. ते नसते तर आज भारताचा नकाशा वेगळा आणि छोटा असता. ते नसते तर कदाचित भारत देश तुकड्यां तुकड्यांमध्ये विभागलेला असता. ते होते म्हणून आजचा भारत अखंड देश म्हणून उभा आहे. ५६० पेक्षा जास्त संस्थानांचे एकत्रीकरण करून भारताला एका देशाच स्वरूप देणारे  ‘ते’ म्हणजेच लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल. पण त्यांनी हे कसं साध्य केलं तत्कालीन ५६२ संस्थानं भारतात विलीन कशी झाली जाणून घेऊया. (Sardar Vallabhbhai Patel)

स्वातंत्र्यापूर्वी भारतात दोन प्रकारे सत्ता होती. काही ठिकाणी ब्रिटिशांची थेट राजवट होती आणि काही ठिकाणी होते प्रिंसली स्टेट्स, जिथे स्थानिक राजा राज्य करत होते. पण हे राजासुद्धा ब्रिटिशांच्याच अधीन होते, ब्रिटिशांचेच आदेश त्यांना पाळावे लागायचे. तेव्हा भारतात ५६० पेक्षा जास्त संस्थांन होती. १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र  होता तेव्हा ब्रिटिश पार्लियामेंट आणि शेवटचे ब्रिटिश व्हायसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांनी इंडियन इंडिपेंडन्स एक्ट पास केला, ज्यामुळे भारताला स्वतंत्र मिळालं, पण भारतं दोन स्वतंत्र देशांमध्ये विभागला गेला. भारत आणि पाकिस्तान, आणि दुसरं म्हणजे या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यापूर्वी जे प्रिंसली स्टेट्स म्हणजे संस्थानं होती, त्यांना या एक्टनुसार तीन पर्याय देण्यात आले. एकतर त्यांनी भारतात विलीन व्हावं, किंवा पाकिस्तानात, आणि तिसरा पर्याय हो म्हणजे त्यांनी स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहावं. (Social News)

५६० पेक्षा जास्त संस्थानांना भारतात विलीन करणं अत्यंत कठीण काम होतं. पण ही जबाबदारी उचलली भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी. त्यांनी या आव्हानाला एक सुवर्णसंधी म्हणून पाहिलं, कारण इतक्या वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आपला देश एक नवीन सुरुवात करत होता आणि देशाच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी भारत एक अखंड आणि मजबूत देश म्हणून उभा राहणं गरजेचं होतं. त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी इन्स्ट्रूमेंट ऑफ अ‍ॅसेशनचा वापरं केला. इन्स्ट्रूमेंट ऑफ अ‍ॅसेशन हे एक कायदेशीर कागदपत्र होतं, ज्याच्यामुळे कायदेशीर रित्या ही संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन होऊ शकत होती. सरदार पटेल आणि त्यांचे सचिव व्ही. पी. मेनन यांनी आपल्या संवाद कौशल्य आणि बुद्धीमत्तेने जवळपास सर्व संस्थांनांच्या राजांची इन्स्ट्रूमेंट ऑफ अ‍ॅसेशनवर सही घेऊन त्यांना भारताचा भाग बनवलं. पण तीन संस्थांनांच्या राजांनी भारताचा भाग बनण्यास स्पष्ट नकार दिला. ही तीन संस्थानं होती जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर. (Sardar Vallabhbhai Patel)

त्यावेळी काश्मीरचे राजा हरीसिंग यांना स्वतंत्र देश बनवायचं होतं. कारण ते कायम एक राजा म्हणून राज्य करायला इच्छुक होते. त्यांना हे चांगल्याप्रकारे समजलं होतं की पाकिस्तानचे इस्लामीकरण आणि भारताच्या लोकशाहीत त्यांना कधीच एक राजा म्हणून राज्य करण्याची मुभा मिळणार नाही. म्हणूनच, त्यांनी काश्मीरला भारत आणि पाकिस्तान दोन्हीपासून वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे ते आरामात राज्य करू शकतील.पण काश्मीर हे एक बॉर्डरिंग स्टेट होतं. लॉर्ड माउंटबेटन यानेही राजा हरी सिंग यांना सल्ला दिला की तुम्ही एक बॉर्डरिंग स्टेट आहात, काश्मीरला स्वतंत्र देश बनवून तुम्ही जास्त काळ टिकू शकणार नाहीत तुमच्यावर आक्रमण होऊ शकतं. पण राजा हरीसिंग यांनी निर्णय घेतला नाही. पाकिस्तान डोळा काश्मीरवर होताच, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी हाजारो आदिवासींची एक फौज, ज्यांना ‘कबायली’ म्हटले जात होतं, त्यांना काश्मीरवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. (Social News)

२३ ऑक्टोबर १९४७ पर्यंत कबायलींनी श्रीनगरपासून 100 किलोमीटर दूर काश्मीरमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर राजा हरीसिंग श्रीनगरमधून जम्मूला गेले. तेव्हा या कबायली सैन्याला रोखण्यासाठी काश्मीरचे ब्रिगेडियर राजेंद्र सिंग आपल्या छोट्याशा सैन्यासोबत तयार होते. त्यांनी या पाकिस्तानच्या कबायली सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच ते शहिद झाले. पण ब्रिगेडियर राजेंद्र सिंग यांच्या प्रयत्नांमुळे राजा हरि सिंग यांना काश्मीर वाचवण्यासाठी दोन दिवसांचा अधिक वेळ मिळाला. राजा हरि सिंग यांनी सरदार पटेल यांचे सचिव व्ही. पी मेनन यांच्याकडे मदत मागितली. मेनन दिल्लीला गेले आणि तिथे सरदार पटेल आणि नेहरू यांची भेट घेतली. तेव्हा लॉर्ड माउंटबेटन याने सांगितलं की, “काश्मीर भारताचा भागच नाही, तर तिथे भारतीय सैनिक पाठवणं चुकीचं ठरेल, हे युद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल.” तेव्हा सरदार पटेल आणि व्ही. पी मेनन राजा हरी सिंग यांना समजावून त्यांची इन्स्ट्रूमेंट ऑफ अ‍ॅसेशनवर सही घेतली त्यामुळे 26 ऑक्टोबरच्या रात्री काश्मीर भारताचा भाग बनलं. (Sardar Vallabhbhai Patel)

अशाच प्रकारे जुनागढचा नवाब मोहम्मद खान सुद्धा जुनागढला भारताचा भाग बनवण्यास नकार देत होते. जेव्हा केव्हा सरदार पेटल यांचे सचिव व्ही. पी. मेनन या नवाबाला भेटायला जात, तेव्हा नेहमी तो काही ना काही कारण देऊन ही भेट टाळायचा. त्यानंतर त्याने पाकिस्तान सोबत हात मिळवणी करून जुनागढला पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेतला. पण सरदार पटेल यांना हे मान्य नव्हतं. कारण यामुळे गुजरातमध्ये धार्मिक तणाव वाढण्याची भीती होती. भारताने जूनागढला इंधन आणि कोळसा पुरवठा थांबवला, हवाई व पोस्टल संपर्क तोडले, जुनागढच्या सीमेवर सैन्य पाठवलं गेलं, जुनागढमध्ये तेव्हा ९६% लोकसंख्या ही हिंदू समाजाची होती. जुनागढच्या लोकांनी मोहम्मद खानविरोधात उठाव केला. जनतेचा आक्रोश पाहून मोहम्मद खान पाकिस्तानला पळून गेला. त्यानंतर जुनागढ संस्थानांचे दिवाण शाहनवाज भुट्टो यांनी भारतात जूनागढ समाविष्ट करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यानंतर जुनागढमध्ये निवडणूक घेतली केली. ज्यात ९१ % लोकांनी जुनागढला भारतात विलीन करण्यास सहमती दर्शवली. आणि अखेर १९४८ साली जुनागढ भारताचा एक भाग बनलं. (Social News)

सर्वात शेवटी भारतात सामील झालेलं संस्थानं म्हणजे हैदराबाद. हैदराबाद संस्थानाचा नवाब निजाम उस्मान अली खान याने ठरवलं होतं की, हैदराबाद ना पाकिस्तानचा भाग बनेल ना भारताचा. या निजामाकडे स्वत:ची एक फौज होती, ज्यांना रझाकार म्हटलं जायचं. त्यामुळेच हैदराबादला भारताचा भाग बनवणं सर्वात कठीण आणि महत्त्वाचं काम होतं. सरदार पटेल यांना चिंता होती की, भारताच्या मध्यभागी एक स्वतंत्र देश असणं, भारताच्या अंतर्गत सुरक्षा साठी एक धोका आहे. म्हणून सरदार पटेल कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला भारताचा भाग बनवू इच्छित होते. सुरुवातीला त्यांनी उस्मान अली खान याला हैदराबाद भारतात विलीन करण्यासाठी विनंती केली. पण निजामाने पटेलांची विनंती नाकारली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी हैदराबादला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. लॉर्ड माउंटबेटन याने सल्ला दिला होता की, या आव्हानाला भारताने बळाचा वापर न करता सामोरं केलं पाहिजे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा याच्याशी सहमत होते. पण, सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सल्ल्याशी पूर्णपणे असहमत होते. (Sardar Vallabhbhai Patel)

========

हे देखील वाचा : चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !

======

स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्यानंतर निजामा शस्त्रं खरेदी करण्याचा आणि पाकिस्तानची मदत घेण्याच्या तयारीत होता. सरदार पटेल यांना याची माहिती कळताच त्यांनी भारतीय सैन्य पाठवून हैदराबादला भारतात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या ऑपरेशनला “ऑपरेशन पोलो” असं नाव दिलं गेलं. भारतीय लष्कराचे नेतृत्व मेजर जनरल जेएन चौधरी करत होते. पाच दिवस चाललेल्या या कारवाईत १३७३ रझाकार मारले गेले. हैदराबादचे 807 सैनिकही मारले गेले. तर भारताचे ६६ जवान शहीद झाले. अखेर 17 सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी रझाकारांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं आणि हैदराबाद सुद्धा भारतात विलीन झालं.अशा प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्न आणि निर्णयांमुळे भारताला एक अखंड राष्ट्र म्हणून उभं राहता आलं. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.