सौदी अरेबियावर आरोप लावण्यात आला आहे की, त्यांनी १४ दिवसात १२ लोकांचे शीर कापले. सौदी अरेबियाने हे सर्व काही अशावेळी केले जेव्हा सर्व जगाचे लक्ष हे फिफा वर्ल्ड कपकडे लागले आहे. या सर्व लोकांना सौदी मध्ये अंमली पदार्थांसंबंधित प्रकरणी मृत्यूची शिक्षा देण्यात आली होती. सौदी अरबवर अशा कारणास्तव टीका केली जात आहे कारण त्यांनी २०२१ मध्ये अहिंसक गुन्हांसाठी मृत्यूची शिक्षा न देण्याची प्रतिज्ञा केली होती. याच दरम्यान सौदी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान हा नुकत्याच वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनी मध्ये उपस्थिती होता. तर जाणून घेऊयात सौदी अरेबियातील मृत्यूच्या शिक्षेसंदर्भातील नियम नक्की काय आहेत. (Sar kalam saza)
सौदी मधील मृत्यूच्या शिक्षेसंदर्भातील नियमांबद्दल बोलायचे झाल्यास तर युनाइटेड नेशंस ह्युम राइट्स ट्रीटी बॉडीजने या संदर्भातील एक रिपोर्ट जाहीर केला होता. त्यामध्ये सर्वात पहिली पद्धत तलवारीने शीर हे एकाच फटक्यात कापले जाणे.सौदी अरेबियाचे असे म्हणणे आहे की, या पद्धतीत मानेच्या मागील बाजूवर जोरदार वार केला जातो. ही एक वाईट पद्धत आहेच. पण रिपोर्टनुसार, काही वेळा अशी प्रकरणे पाहिली गेली आहेत की, जेथे जल्लाद नियम मानत नाहीत. ते शीर कापण्यासाठी काही वेळा वार करता. या दरम्यान, ज्या व्यक्तीने अपराध केला आहे त्याच्या घरातील मंडळी सुद्धा त्यावेळी उपस्थितीत असतात.

गोळीबार ही केला जातो
सुळावर चढवण्याचा नियम सुद्धा आहे. मात्र अशी प्रकरणे कधी पाहिली गेली नाहीत. मृत्युची शिक्षा दिल्यानंतर भीती निर्माण करण्यासाठी शवला काही वेळासाठी चौथऱ्यावर लटकवले जाते. पण ते किती वेळ असते याबद्दल अचुक माहिती नाही. काही वेळा मृत्यूच्या शिक्षेसाठी एखादा तलवारबाज उपलब्ध नसतो तेव्हा गोळीबार केला जातो. सौदीत अशा प्रकारच्या मृत्यूच्या प्रकरणांची माहिती फार कमी आहे. सौदीने काही काळापूर्वी अनुभवी तलवारबाजांना कामावर ठेवले होते.(Sar kalam saza)
हे देखील वाचा- सख्या भावाबहिणीशी लग्न करण्याची प्रथा असणाऱ्या ‘या’ ख्रिस्ती समुदायावर कोर्टाने घातली बंदी
शव ही परिवाराला दिले जात नाही
सौदी अरेबियात दगडं मारुन मारुन मृत्यूची शिक्षा दिली जाते. ही शिक्षा फक्त अशा लोकांना दिली जाते ज्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप आहे. या अंतर्गत गुन्हेगाराला त्याच्या गुडघा किंवा छातीपर्यंत दफन केले जाते. लोक तो पर्यंत दगडं फेकता जो पर्यंत त्याचा मृत्यू होत नाही. दरम्यान, मृत्यूदंडाची शिक्षेसंदर्भात लोकांचा बचाव करणारी संघटना रीप्रीव यांनी असे सांगितले की, त्यांना अशा प्रकारच्या होणाऱ्या घटनांबद्दल माहिती नाही. या व्यतिरिक्त मृत्यूची शिक्षा देणाऱ्या व्यक्तीचे शव ही त्याच्या परिवाराला दिले जात नाही. परदेशी नागरिकांसंबंधित प्रकरणांमध्ये काही वेळेस सौदी अधिकाऱ्यांनी शवचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला किंवा त्यासाठी वेळ ही लावला. राजकीय आंदोलनासंदर्भातील प्रकरणांमध्ये सौदी सरकार दफन करण्यासाठी जागा सुद्धा बनवत नाही.