जगातलं स्वप्नवत शहर म्हणून ओळखलं जाणारं ग्रीस या देशातील सॅंटोरिना हे बेट आता पूर्णपणे रिकामं झालं आहे. या बेटावर रहाणारे नागरिक आपल्या घराला सोडून ग्रीसमधील अन्य सुरक्षित स्थळी गेले आहेत. तर या सॅंटोरिनामध्ये आता फक्त नागरी संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भूंकपतज्ञ उपस्थित आहेत. गेल्या आठ दिवसात या बेटावर 7 हजार सातशे भूकंप झाले आहेत. येथील ज्वालामुखीचाही यामुळे उद्रेक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 69 वर्षापूर्वी याच बेटावर अशाच लहान भूकंपाची साखळी झाली होती आणि नंतर एक मोठा भूकंप आला होता. त्यात 50 नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र तेव्हा या बेटावर मोजकी लोकसंख्या होती. आता येथील लोकसंख्येत आणि बेटावरील बांधकामातही वाढ झाली आहे. त्यामुळे मोठा भूकंपाचा धक्का बसला तर मनुष्यहानीही मोठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रीस सरकारनं या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. परिणामी येथील 15 हजार नागरिकांनी जड अंतरकरणानं या सुंदर शहरला सोडलं आहे. (Santorini Island)
सॅंटोरिना मधील पांढ-या रंगाच्या आकर्षक इमारती आणि घरं जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरातील श्रीमंत व्यक्ती, हॉलिवूड मधील तारकांचं हे आवडतं पर्यटन स्थळ आहेत. येथील रेस्टॉरंटमध्ये जगभरातील महागडे खाद्यपदार्थ मिळतात. या सॅंटोरिनाच्या निळ्या रंगाच्या समुद्रात करडो रुपये किंमतीच्या बोटी उभ्या असतात. हे सर्व आता ओस पडलं आहे. येथे मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे स्थानिकांसोबत येथे आलेल्या पर्यटकांनीही या बेटापासून लांब जाणे पसंद केले आहे. परिणामी अगदी महिन्यापूर्वी दिवसरात्र गजबजलेल्या सॅंटोरिना बेटावर एक भीतीदायक शांतता पसरली आहे. ग्रीसमधील सँटोरिनीमध्ये आठवड्यात 7700 भूकंप आले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांनी या बेटावरील ज्वालामुखीही जागृत झाल्याची माहिती संशोधकांनी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. सॅंटोरिनी हे बेट समुद्राच्या काठावर बसलेले आहे. या बेटाला सतत भूकंपाचे धक्के बसत असतांता आता त्यांची तीव्रता अधिक होऊ लागली आहे. 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आल्यावर ग्रीस सरकारनं या सॅंटोरिनी बेटावर आणीबाणी जाहीर केली. (International News)
31 जानेवारीपासून हे भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली आहे. आता या बेटावरील 10 हजार नागरिकांनी शहर खाली केले असून येथे फक्त पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, पत्रकार आणि भूवैज्ञानिक थांबले आहेत. सुरुवातीला या बेटावरील भूकंपामुळे ज्वालामुखी जागृत होण्याची शक्यता अभ्यासकांनी नाकारली होती. मात्र भूकंपाची तीव्रता वाढल्यावर भूकंपाचे परिणाम सॅंटोरिनीच्या ज्वालामुखीवरही दिसून आले. उपग्रहावरून मिळालेल्या रडार डेटाच्या आधारे, थेस्सालोनिकीच्या अॅरिस्टॉटल विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर मिचालिस फौमेलिस यांनी याबाबत माहिती दिली. त्यावरुन ज्वालामुखीमध्ये काही बदल झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच ग्रीस सरकारनं पुढील संभाव्य धोक्याला पाहून हे शहर खाली करण्याचा निर्णय घेतला. (Santorini Island)
या भागातील ज्वालामुखी जागृत होण्याचा धोका आहे, ही बातमी आल्यावर सॅंटोरिनामधील नागरिकही बेट सोडून जाण्यास तयार झाले. येथील समुद्रात उभ्या असलेल्या बोटीही आता दुस-या समुद्रकिना-यावर नेण्यात आल्या आहेत. तसेच या भागातली शाळा, महाविद्यालये खाली करण्यात आली आहेत. हॉस्पिटलमधील रुग्णही अन्यत्र हलवण्यात आले असून मोजके वैद्यकीय कर्मचारी येथे ठेवण्यात आले आहेत. या बेटाची लोकसंख्या साधारण 20 हजार आहे. पण या बेटावर दरवर्षी 30 लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. त्यामुळेच वर्षाचे बाराही महिने हे बेट पर्यटकांनी गजबजलेले असते. दक्षिण प्रशांत महासागरात असलेले सँटोरिनी बेट हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. युरोपमधील पर्यटकांचे हे सर्वात आवडते ठिकाण आहे. आता या सर्व पर्यटकांना बेटामधून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या सॅंटोरिनीची सर्व अर्थव्यवस्था या पर्यटनावरच अवलंबून आहे. ग्रीसमध्ये सर्वात जास्त युरोपीयन पर्यटक या बेटावर येतात. त्यामुळे ग्रीस सरकारनं या भागात अनेक सुविधा केलेल्या आहेत. येथील समुद्रकाठावर सर्वप्रकारचे समुद्री खेळ खेळण्याची सुविधा आहे. शिवाय हॉटेल व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
Donald Trump : ट्रम्पना कुठे करायची आहे, रिसॉर्ट सिटी
===============
जगातील सर्वोत्तम बेकरीही याच बेटावर असल्याची माहिती मिळते. या बेटावर संग्रहालये देखील प्रेक्षणीय आहेत. सॅंटोरिनी बेटावरील ओया शहरातून सूर्यास्ताचे सर्वोत्तम दृश्य बघायला मिळते. यासाठी येथे दररोज हजारो पर्यटक जमतात. मात्र आता भूकंपाच्या भीतीनं हे शहर खाली झाले आहे. फक्त काही तज्ञ या बेटावर रहात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या भूकंपाचे केंद्र सँटोरिनी, अनाफी, अमोर्गोस आणि आयोस बेटांच्या दरम्यान आहे. येथे मोठा भूकंप येईल का आणि आल्यास तो कधी येईल, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न हे तज्ञ करीत आहेत. (Santorini Island)
सई बने