भारत आणि कॅनडा मधील संबंधात कमालीचा तणाव आला आहे. या दोन्ही देशांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवले आहे. हा तणाव वाढला ते कॅनडामध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे. गेल्यावर्षी झालेल्या या हत्येत भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात होता असा आरोप कॅनडानं केला आहे. हा आरोप करुन कॅनडाचे सरकार गप्प बसले नाही, तर कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही यात सहकार्य केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. गेल्या वर्षापासून चालत असलेल्या या वादात भारतानं पुरावे द्या अशी मागणी कॅनडाकडे केली आहे. मात्र संबंधीत पुरावे देण्यास कॅनडानं टाळाटाळ केली आहे. (Sanjay Varma)
आता कॅनडामध्ये निवडणुका होत आहेत. यात खलिस्तान समर्थकांची मते बहुमुल्य आहेत. त्यामुळे कॅनडाच्या सरकारनं यात आता थेट भारतीय उच्चायुक्तांचे नाव घेतले आहे. कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचे नाव घेतल्यानं खळबळ उडाली आहे. तर कॅनडामधील खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांच्यावर 3.5 कोटीचे बक्षिस ठेवले आहे. यामुळे भारतानं संजय वर्मा यांना माघारी बोलावले आहे. बिहारमधील संजय वर्मा यांची प्रतिमा अभ्यासू प्रशासकीय अधिकारी असून वर्मा हे भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिका-यांपैकी एक आहेत. भारत आणि कॅनडा मधील तणावात भारतीय प्रशासकीय अधिका-यांचे नाव पुढे येत आहे, ते म्हणजे, संजय वर्मा. कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून संजय वर्मा हे काम करत होते. (International News)
खलिस्तानच्या प्रेमात बुडालेल्या जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येला थेट भारत जबाबदार असल्याचे सांगून निज्जरच्या हत्येत भारतीय राजनैतिकाचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यातून कॅनडाने भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांची चौकशी करण्याच्या मागणी केली. भारतानं त्वरित हा आरोप फेटाळून लावला. शिवाय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि अन्य राजनैतिक अधिका-यांना परत बोलावले आहे. पण कॅनडा सरकारनं संजय वर्मा यांचे नाव निज्जरच्या हत्याकांडात घेतल्यानं ते खलिस्तानवाद्यांच्या रडारवर आले आहेत. खलिस्तानवाद्यांनी त्यांच्या हत्येसाठी बक्षिसही जाहीर केले आहे. खलिस्तानवाद्यांनी संजय वर्मा यांच्या पुतळ्याचे दहन केले आणि गोळीबारही केला आहे. त्यामुळे संजय शर्मा यांच्या जीवाला कॅनडा सरकारच्या खोट्या आरोपामुळे धोका निर्माण झाला आहे. (Sanjay Varma)
कॅनडाचे उच्चायुक्त असलेले संजय वर्मा हे बिहारचे आहेत. 28 जुलै 1965 रोजी जन्मलेल्या वर्मा यांनी पाटणा विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीतून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1988 मध्ये त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळाची त्यांची राजनैतिक कारकीर्द आहे. उच्चायुक्त वर्मा हे भारताचे सर्वाधिक काळ काम करणारे मुत्सद्दी अधिकारी आहेत, त्यांची कारकीर्द 36 वर्षांची आहे. त्यांनी जपान, सूदानचे राजदूत म्हणून काम केले आहे. शिवाय इटली, तुर्की, व्हिएतनाम आणि चीनमध्येही भारतीय अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. (International News)
======
हे देखील वाचा : फाइव्ह आयजचे रहस्य आणि भारत कॅनडा संबंध
======
वर्मा यांनी हाँगकाँगमधील भारतीय उच्चायुक्तालयातून आपला राजनैतिक प्रवास सुरू केला आणि त्यानंतर चीन, व्हिएतनाम आणि तुर्की येथील भारतीय दूतवासात सेवा दिली आहे. वर्मा हे इटली येथे भारताचे कौन्सुल जनरल होते. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव आणि नंतर अतिरिक्त सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी मार्शल बेटांचे प्रजासत्ताक भारताचे राजदूत म्हणूनही काम केले. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांची कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बंगाली भाषेसोबतच संजय वर्मा यांचे हिंदी, इंग्रजी आणि चिनी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. त्यामुळेच एवढ्या अनुभवी अधिका-यावर कॅनडाने केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचे भारतानं म्हटलं आहे. वास्तविक कॅनडामध्ये होणा-या निवडणुका पुढे ठेऊन कॅनडाच्या टुडो सरकारनं भारतावर जून 2024 पासून जाहीरपणे टिका सुरु केली आहे. कॅनडाच्या संसदीय समितीच्या अहवालात चीननंतर कॅनडाच्या लोकशाहीसाठी भारत हा दुसरा सर्वात मोठा परदेशी धोका असल्याचे वर्णन करण्यात आले. यावर उच्चायुक्त संजय वर्मा यांनी आक्षेप घेत कॅनडाच्या वृत्तपत्रामध्ये भारताची भूमिका मांडली. याचाच राग त्यांच्यावर काढत निज्जर हत्याकांडाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आल्याची चर्चा आहे. (Sanjay Varma)
सई बने