Home » Sanajy Dutt : एका फॅनने संजय दत्तच्या नावे केली होती ७२ कोटींची संपत्ती

Sanajy Dutt : एका फॅनने संजय दत्तच्या नावे केली होती ७२ कोटींची संपत्ती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sanajy Dutt
Share

आपण कितीही नाही म्हटले तरी आपल्याला एखादा कलाकार मनातून थोडाफार तरी आवडत असतो. त्या कलाकारांचे काम, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचा अभिनय, चित्रपट काहीतरी आपल्याला आवडते, आणि त्याच्याकडे आपले जरा झुकते माप असते. मीडियामध्ये कायमच कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचे किस्से गाजताना दिसतात. काही किस्से राग आणणारे तर काही किस्से भावनिक करणारे, काही किस्से कायम स्मरणात राहणारे असतात. कलाकार देखील त्याच्या फॅन्सशिवाय अपूर्ण असतात. मात्र काही फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारासाठी असे काही करतात जे पाहून इतरांना आणि कलाकारांना देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. फॅन्सच्या प्रेमाचे अनेक अनुभव कलाकार घेतच असतात. मात्र संजय दत्तने एका फॅन्सच्या त्याच्यावरील प्रेमाचा जो अनुभव घेतला तो आजवर कोणत्याच कलाकाराला आला नसावा. (Sanjay Dutt News)

संजय दत्तने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या या खास अनुभवाचा चकित करणारा अनुभव शेअर केला आहे. ९० च्या काळातील सुपरस्टार अभिनेता म्हणून संजय दत्तची ओळख आहे. संजयने त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्याच्यावर देशद्रोहाचा देखील आरोप झाला. त्याला काही वर्षांचा तुरुंगवास देखील झाला. मात्र असे असले तरी त्याच्या फॅन्सचे त्याच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही. संजू बाबाचा एक ऑरा आहे. त्याचे व्यक्तिमत्व समोरच्याला कायमच आकर्षित करत असते. (Marathi News)

आजवर आपण संजय दत्तच्या फॅन्सबद्दल बरेच ऐकले आहे. संजय देखील त्याच्या फॅन्सशी अतिशय अदबीने वागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला संजयच्या एका अशा फॅनबद्दल सांगणार आहोत ज्याने त्याची संपूर्ण संपत्तीच संजयच्या नावे केली होती. निशा पाटील नावाची एक मुलगी होती जी संजय दत्तची एवढी मोठी फॅन होती की तिने तिची तब्बल ७२ कोटी रुपयांची संपत्ती त्याच्या नावावरून केली होती. याची माहिती संजयला कोण्या माणसाने नाही तर चक्क पोलिसांनी फोन करून दिली होती. (Todays Marathi HEadline)

Sanajy Dutt

झाले असे की, २०१८ साली एक दिवस संजय दत्तला पोलिसांचा फोन आला होता. त्यांनी संजयला सांगितले की निशा पाटील नावाच्या त्याच्या चाहतीने त्याच्या नावावर ७२ कोटींची संपत्ती केली आहे. मात्र निशाने मृत्यूपूर्वी तिची सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केली होती. निशाला कोणतातरी मोठा आजार होता, ज्यामुळे तिचे निधन झाले. मात्र त्यापूर्वी तिने तिची प्रॉपर्टी संजयच्या नावे केली होती. (Marathi Top HEadline)

निशाने आपल्या मृत्यूपूर्वी तिची सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केल्याचे वकिलांनी सांगितले. निशाच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीच पोलिसांकडून संजय दत्तला फोन गेला होता. जेव्हा पोलिसांनी त्याला निशाने त्याच्यासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांची मालमत्ता ठेवले असल्याचे सांगितले तेव्हा हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला खूपच आश्चर्य वाटले. निशाने तिच्या बॅंकेला देखील अनेकदा पत्र लिहिले आणि बँक अधिकाऱ्यांना सांगितले होते की तिची संपूर्ण प्रॉपर्टी ही तिचा आवडता बॉलिवूड अभिनेता असलेल्या संजय दत्तच्या नावावर करायची आहे. हे ऐकल्यानंतर संजय दत्तला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. (Marathi Latest News)

मात्र या घटनेनंतर संजय दत्तच्या वकिलांनी सांगितले की ‘तो ७२ कोटींची ती संपत्ती स्वीकारू शकत नाही. कारण तो निशाला ओळखतच नव्हता. संजय दत्तने देखील हेच सांगितले होते. त्याने सांगितले की मी कधीच यावर क्लेम करणार नाही. कारण मी निशाला ओळखत नव्हतो. मला हे सगळं कळल्यानंतर मलाही धक्का बसला. मी ही सर्व संपत्ती निशाच्या कुटुंबाला परत केली होती. (Top Stories)

================

हे देखील वाचा : Kim Jong Un : किमच्या औषधाची उत्तर कोरियाच्या नागरिकांना भीती !

==============

दरम्यान संजय दत्तच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचे झाले तर ती जवळपास ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. तो एका चित्रपटासाठी जवळपास १५ ते २० कोटी घेतो. संजयचे दोन प्रोडक्शन हाउस होते. त्याने स्नीकर मार्केटप्लेस पासून त्याच्या स्कॉच व्हिस्की ब्रॅंड The Glenwalk सोबत इतर स्टार्ट-अप्समध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्याचे मुंबईत घर असून त्याची किंमत ५० कोटींच्या आसपास आहे. त्यासोबत त्याचे दुबईमध्ये देखील एक आलिशान घर आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.