जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून साने ताकाची यांची निवड होणार आहे. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने आयोजित केलेल्या क्रॉस-पार्टी मतदानात ताकाची यांनी माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांचे पुत्र कृषी मंत्री शिंजिरो कोइझुमी यांचा पराभव केल्यानं त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने साने ताकाची यांची नवीन नेते म्हणून निवड केली आहे. त्यामुळे जपानच्या इतिहासात साने ताकाची यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. (Sanae Takaichi )
जपानमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडीकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे. येथे पहिल्यांदाच एक महिला पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहे. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने साने ताकाची यांची नवीन नेते म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पंतप्रधान होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 ऑक्टोबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. एलडीपी संसदेत सर्वात मोठा पक्ष असल्याने ताकाची या सध्याचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची जागा घेतील अशी अपेक्षा आहे. (international News)
यापूर्वी साने ताकाची यांनी दुसऱ्या फेरीच्या मतदानात माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांचा पराभव केला. शिंजिरो कोइझुमी हे तरुणांचे नेते म्हणून जपानमध्ये लोकप्रिय आहेत. उदारमतवादी नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्यावर मात करण्यात साने ताकाची यशस्वी ठरल्या आहेत. साने ताकाची या गेली अनेक वर्ष जपानच्या राजकारणात सक्रिय आहेत. 64 वर्षीय साने ताकाची या आर्थिक सुरक्षा मंत्री होत्या. जपानवर एलडीपी पक्षाचे मोठे वर्चस्व आहे. 1955 याच पक्षानं जपानवर राज्य केले आहे. मात्र आता या पक्षाची ताकद विखुरलेली आहे. (Sanae Takaichi )

त्यामुळे ताकाची पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर एलडीपीच्या मतदारांना एकत्र करणे, हे प्रथम आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय साने ताकाची यांच्यासमोर जपानमधील वाढत्या सामाजिक समस्याही उभ्या रहाणार आहेत. सध्या जपानमध्ये लोकसंख्येचा दर सर्वाधिक खाली जात आहे. जपान हा वृद्ध लोकांचा देश म्हणून ओळखला जात आहे. येथील कारखान्यात काम करण्यासाठी पुरेसा कामगार वर्गही मिळत नसल्यामुळे अन्य देशांमधून मजूर आणावे लागत आहेत. या सर्वांचा परिणाम जपानच्या उद्योगावर झाला आहे. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. जपानमध्ये स्थलांतरितांचा प्रश्नही मोठा आहे. या सर्व प्रश्नांकडे आता साने ताकाची यांना लक्ष द्यावे लागणार आहे. (international News)
जपानच्या आयर्न लेडी म्हणून साने ताकाची या ओळखल्या जातात. जपानच्या राजकीय व्यवस्थेत जे बदल झाले आहेत, त्यात साने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साने ताकाची यांना जपानच्या राजकारणात एक रूढीवादी राष्ट्रवादी नेत्या म्हणून ओळखले जाते. राजकीय विश्लेषकांचे मते, ताकाची यांचा विशेष अभ्यासाचा विषय हा परराष्ट्र धोरण आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या नेतृत्वामध्ये जपानमधील परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्याची आशा व्यक्त होत आहे.
================
हे देखील वाचा : Navi Mumbai : भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल आणि सर्वात सुरक्षित’ एअरपोर्टची वैशिष्ट्ये
================
मुख्य म्हणजे, साने ताकाची यांचे अमेरिकेसोबत मैत्रीचे संबंध हे कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. राजकीय कारर्कीदीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अमेरिकेत काम केले आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड नितीचा जपानवर फारसा परिणाम होणार नसल्याची आशा आहे. साने ताकाची यांनीही “जपान फर्स्ट” वर आपले लक्ष केंद्रित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या “अमेरिका फर्स्ट” या धोरणासारखीच साने यांची मते आहेत. साने ताकाची यांचा असा विश्वास आहे की, जपानने लष्करी आणि आर्थिक धोरणांमध्ये स्वावलंबन वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात जपानमध्ये अधिक उद्योग व्यवसाय उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. (Sanae Takaichi )
मात्र साने ताकाची या अती रुढवादी असल्याची प्रतिक्रीय जपानच्या शेजारी देशांची आहे. दुस-या महायुद्धातील जपानच्या सैन्यांच्या वारसांना न्याय देण्यासाठी त्यांना पुढाकार घेतला होता. चीनबाबतही साने ताकाची यांनी घेतलेली भूमिका वादात सापडली होती. त्यामुळे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर साने अमेरिकेबरोबर आपली मैत्री कायम ठेवतात, आणि चीनसोबत आपले दुरावलेले संबंध कसे सुधारणार याकडे लक्ष लागले आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
