Home » Samudra Manthan : दिवाळीचा संबंध समुद्र मंथनाशी कसा जोडला गेला आहे? जाणून घ्या पौराणिक रहस्य

Samudra Manthan : दिवाळीचा संबंध समुद्र मंथनाशी कसा जोडला गेला आहे? जाणून घ्या पौराणिक रहस्य

by Team Gajawaja
0 comment
Samudra Manthan
Share

Samudra Manthan : दिवाळी हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा मानला जातो. पण या सणाचं मूळ केवळ रामाच्या अयोध्येत परतण्याशीच नाही, तर एक पौराणिक घटनेशी समुद्र मंथनाशी देखील जोडलेलं आहे. या घटनेतून केवळ अमृतच नव्हे, तर अनेक देवता आणि संपत्ती प्रकट झाल्या, ज्यात देवी लक्ष्मीचं प्राकट होण  सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. म्हणूनच दिवाळीला लक्ष्मीचा सण असंही म्हणतात.

समुद्र मंथनातून प्रकट झालेली लक्ष्मीदेवी पुराणांनुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी क्षीरसागराचं मंथन केलं. या मंथनातून चौदा रत्नं बाहेर आली. त्यात धन, ऐश्वर्य आणि सौंदर्याची देवी लक्ष्मी प्रकट झाली. तिने विष्णू देवांना आपला वर म्हणून स्वीकारलं. तो दिवस लक्ष्मीप्रकट दिन म्हणून ओळखलं जातो  आणि याच दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मानला जातो. दिवाळीच्या काळात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि ज्या घरात स्वच्छता, प्रकाश आणि सद्भाव असतो तिथे ती स्थायिक होते, असा विश्वास आहे.

Samudra Manthan

Samudra Manthan

दिवाळी आणि समृद्धीचा संबंध समुद्र मंथनातून आलेली लक्ष्मी ही केवळ धनाची नव्हे, तर आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धीची प्रतीक आहे. दिवाळीच्या सणात घर स्वच्छ ठेवणं, दिवे लावणं, आणि मंत्रोच्चार करणं हे लक्ष्मीचं स्वागत मानलं जातं. समुद्र मंथनातील प्रकाश अंधारावर विजय मिळवतो हा अर्थच दिवाळीच्या सणाचा मूलभूत संदेश बनतो. म्हणून दिवाळी हा  केवळ उत्सव नसून आत्मप्रकाश आणि शुभतेचं प्रतीक मानली जाते.

लक्ष्मीपूजन आणि समुद्र मंथनाचा मुहूर्त दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे अमावास्या म्हणजेच चंद्र नसलेली रात्र. हीच ती रात्र आहे ज्या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाल्या. त्यामुळे त्या रात्री देवीला आवडणाऱ्या वस्तू जसे की कमळाचं फूल, सोनं-चांदी, तूपाचे दिवे आणि शुद्ध सुगंधी वस्तू अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी धन, आरोग्य आणि आनंद प्राप्तीसाठी लोक लक्ष्मीमंत्र जपतात.

===================

हे देखील वाचा :

 Rup Chaturdashi 2025 : रूप-सौंदर्याबरोबर यमाची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि धार्मिक महत्त्व!                                    

 Diwali : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का आहे एवढे महत्व?                                    

 Diwali : दिवाळीत ‘या’ आयडिया वापरून करा आकर्षक पणत्यांची सजावट                                    

===================

समुद्र मंथनाचं प्रतीकात्मक अर्थ

समुद्र मंथन हे केवळ पौराणिक कथा नसून जीवनातील संघर्षाचं प्रतीक आहे. जसं देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन करून अमृत मिळवलं, तसंच माणसालाही जीवनातल्या चांगल्या वाईट प्रसंगांचं संतुलन राखून आनंद प्राप्त करावा लागतो. दिवाळी हा तो क्षण आहे जेव्हा आपण स्वतःच्या जीवनातला अंधार दूर करून नव्या प्रकाशाचं स्वागत करतो. दिवाळीचा समुद्र मंथनाशी असलेला संबंध आपल्याला सांगतो की प्रकाश, समृद्धी आणि शांती ही बाहेरून मिळणारी नाही ती आपल्याच आत आहे. देवी लक्ष्मीचा सण साजरा करणं म्हणजे त्या आत्मशांती आणि सकारात्मकतेचं स्वागत करणं होय. त्यामुळे दिवाळीचा अर्थ फक्त दिवे लावणं नाही, तर मनातील अंधार दूर करून ज्ञान, श्रद्धा आणि समृद्धीचा प्रकाश पेटवणं आहे.(Samudra Manthan)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.