बदलत्या काळासोबत स्मार्टफोनची डिझाइन, कॅमेरा आणि प्रोसेसमध्ये सुद्धा खुप बदल झाला आहे. परंतु स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफ बद्दल बोलायचे झाल्यास येथे तुम्हाला काही अपडेट मिळत नाही. आजकाल मोठे डिस्प्ले, मल्टीपल सेंसर आणि फास्ट प्रोसेससारखे फिचर चालवण्यासाठी उत्तम बॅटरी पॉवरची गरज भासते. दरम्यान काही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग किंवा पॉवर मोडसह येत आहेत. पण हे बॅटरीच्या समस्येवरील ठोस तोडगा नाही आहे. त्यामुळे युजर्सला फोनच्या बॅटरीवर खासकरुन लक्ष द्यावे लागते. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ (Samrtphone battery life) वाढू शकते.
बॅटरी लाइफ कशी वाढवाल?
प्रत्येक स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये बॅटरीचा ऑप्शन दिलेला असतो. तेथे तुम्हाला बॅटरी सेव्ह (Battery Save) चा ऑप्शन असतो. या फिचरचा वापर करुन तुम्ही असे काही अॅप्स निवडू शकता ज्यासाठी अधिक बॅटरीचा वापर केला जातो. येथे तुम्हाला कळेल की, कोणत्या अॅपमुळे तुमची बॅटरी लाइफ लगेच संपत आहे. अशातच ते अॅप तुम्ही बंद करु शकता. या व्यतिरिक्त पुढील काही टीप्स वापरुन तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.
हे देखील वाचा- गाडीत नेहमी ठेवा ‘ही’ पाच टूल्स, संकटात देतील साथ

-तुम्ही स्मार्टफोनमध्ये असलेला GPS आणि लोकेशन ऑप्शन बंद करु शकता
-बॅटरी सेव्ह करण्यासाठी ऑटो ब्राइटनेस ऑन ठेवा
-स्क्रिनचा रिफ्रेश रेट 60HZ वर ठेवू शकता
-बॅटरीची लाइफ अधिक वाढवण्यासाठी ऑटो स्क्रिन टाइम ३० सेकंद करा
-युजर्सने बँकग्राउंडमध्ये सुरु असलेले अॅप्स बंद करावेत
-१५ सेकंदाच्या inactivity नंतर डिवाइस लॉक करणे नेहमीच फायदेशीर असते
-डार्क मोडचा वापर करावा
-ऑलवेज ऑन डिस्प्ले ऑफ करण्याचा प्रयत्न करा
-पोर्टेबल हॉटस्पॉटचा वापर केल्यानंतर तो बंद करणे विसरु नका
-एज लाइटिंग सारखे फिचर्स सुद्धा बॅटरी अधिक जाते, त्यामुळे तुम्ही ते डिसेबल करु शकता (Samrtphone battery life)
-स्मार्टफोनची बॅटरी खराब झाल्यास काय करावे?
सर्वात उत्तम उपाय म्हणजे बॅटरी बदलावी. शिओमीने नुकत्याच बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्रामची घोषणा केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना फक्त ४९९ रुपयांमध्ये नवी बॅटरी खरेदी करता येणार आहे. ही ऑफर शाओमी आणि रेडमी या दोन्ही स्मार्टफोनसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र डिवाइसच्या आधारावर किंमत वेगळी असू शकते. अन्य ब्रँन्डच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ बद्दल तुम्हाला सर्विस सेंटर मध्ये जाऊनच माहिती मिळू शकते. त्यामुळे वरील काही गोष्टींची काळजी घेत तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची लाइफ वाढवू शकता.