आजकाल सर्वच आपल्या आरोग्याबाबत सजग झाले आहेत. त्यामुळे अनेक लोकं नियमित व्यायामासोबतच हेल्दी आणि निरोगी खाण्यास देखील प्राधान्य देताना दिसत आहे. जमेल तेवढे साधे, हलके आणि शरीरास उपयुक्त असे जेवण करून स्वतःला निरोगी राखण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. मात्र कमी मिठाचे, कमी तिखट, कमी तेल, साधे, मुळमुळीत जेवण करायला जास्त लोकांना आवडत नाही. मग अश्वेल्स अतिशय हेल्दी, चविष्ट असा पर्याय म्हणजे सॅलड. (Salad)
आपण जर पाहिले तर सॅलड खाण्याची क्रेझ मधल्या काही दिवसांपासून कमालीची वाढली आहे. विविध प्रकारचे हेल्दी सॅलड खाऊन सर्वच हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. विविध फळं, विविध भाज्या वापरून अतिशय चविष्ट असे सॅलड आता भारतीय जेवणाचा महत्वाचा भाग बनत आहे. अनेकदा तर सॅलड हेच एक वेळेला जेवण म्हणून खाल्ले जाते. सॅलड खाणे खरंच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे.(Marathi News)
सॅलड खाण्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे सॅलडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने आपली पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय सॅलडमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूपच आवश्यक आहेत. सॅलडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनास मदत करते, आतड्यांची कार्यक्षमता वाढवते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. (Top Stories)
सॅलडमध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सोबतच या सॅलडमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. सॅलडमध्ये पाणी जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. सॅलड हे आपल्या त्वचेसाठी चांगले आहेत, कारण यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.(Latest Marathi News)
सॅलड खाणे हे आपल्या निरोगी जीवनशैलीचा एक भाग आहे. सॅलड अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. मात्र एक लक्षात ठेवा सॅलडमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचा समावेश करा, जेणेकरून तुम्हाला विविध पोषक तत्वे मिळतील. शिवाय सॅलडसाठी तेल आणि मीठ कमी वापरा, जेणेकरून ते हेल्दी व्हर्जन तयार होईल. सॅलडमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचा वापर करून, तुम्ही वेगवेगळ्या चवीचे सॅलड बनवू शकता.(Social NEws)
विविध प्रकारच्या सॅलड रेसिपी
१) क्लासिक ग्रीक सॅलड
क्लासिक ग्रीक सॅलड हे मुख्यतः ग्रीसमध्ये खाल्ले जाणारे मुख्य सॅलड आहे. हे सॅलड बनवायला खूप सोपे असून, या सॅलडमध्ये टोमॅटो, काकडी, कांदा, ऑलिव्ह आदी पदार्थांचा समावेश होतो. या सॅलडमध्ये चिरलेली सिमला मिरची देखील घालू शकता, ज्यामुळे सॅलडची चव वाढते. शिवाय यात बारीक चिरलेली ब्रोकोली देखील घालता येते. हे साधे सॅलेड अतिशय निरोगी आणि स्वादिष्ट आहे.
२) फळ पास्ता सॅलड
फळांसोबत पास्ता सॅलडचे सेवन करणे देखील चांगले आहे. मात्र यासाठी गव्हाचा पास्ता वापरावा. पास्ता सॅलड हे शाकाहारी लोकांसाठी पोटभरीचे जेवण आहे. हे सॅलड बनवण्यासाठी आधी पास्ता उकळवा आणि नंतर थंड झाल्यावर त्यात आंबा, द्राक्षे, संत्री, सफरचंद, किवी इत्यादी ताजी फळे घाला. चवीनुसार मसाले घालून मस्त ताव मारा. (Top Marathi Headline)
३) स्प्राउट्स सॅलड
स्प्राउट्स सॅलड देखील बहुतेक घरांमध्ये बनवले जाते. याचे कारण म्हणजे ते खूप आरोग्यदायी आहे आणि बनवायला खूप सोपे आहे. यासाठी रात्री भिजवलेले हिरवे मूग आणि हरभरा ओल्या कपड्यात बांधून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात कोंब फुटलेले दिसेल. आता ते एका ठराविक प्रमाणात घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मसाले घाला. लिंबू घातल्यानंतर त्याचे सेवन करा.
४) चीज आणि भाज्या कोशिंबीर
पनीर आणि भाज्यांच्या सॅलडमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असेल. ते बनवण्यासाठी कच्चे चीज आणि टोमॅटो, कांदा, काकडी, काकडी, सिमला मिरची, लेट्युस इत्यादी भाज्या लागतात.सर्व भाज्या बारीक चिरल्यानंतर त्यात मीठ आणि मिरपूड घाला. यानंतर चीजचे छोटे तुकडे करून सॅलडमध्ये मिसळा. यात चवीनुसार लिंबू घालावा. (Todays Top HEadline)
५) ग्रीन सॅलड
या सॅलडमध्ये फक्त हिरव्या भाज्या घालाव्या लागतात. त्यासाठी तुम्ही काकडी, शिमला मिरची, लेट्युस, वाटाणे, पालक, कोबी, फ्लॉवर इ. भाज्या वापरू शकता.सर्व भाज्या बारीक चिरून त्यात मीठ, मिरपूड आणि लिंबू घालून सेवन करा.
६) नॉन व्हेज सॅलड
नॉन-व्हेज सॅलड बनवण्यासाठी, चिकन, मटण किंवा मासे वापरून विविध प्रकारच्या सॅलड रेसिपी तयार करता येतात. चिकन सॅलडसाठी, चिकन शिजवून बारीक करून, काकडी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर मिक्स करता येतात. मटण सॅलडसाठी, मटण शिजवून किंवा भाजून, काकडी, टोमॅटो, कांदा आणि इतर भाज्या वापरल्या जाऊ शकतात. मासे सॅलडसाठी, मासे शिजवून किंवा भाजून, काकडी, टोमॅटो, कांदा आणि इतर भाज्या वापरल्या जाऊ शकतात. (Health Care)