Home » Saikat Chakraborty : अमेरिकेत का आलाय चर्चेत सकैत चक्रवर्ती !

Saikat Chakraborty : अमेरिकेत का आलाय चर्चेत सकैत चक्रवर्ती !

by Team Gajawaja
0 comment
Saikat Chakraborty
Share

अमेरिकेतील न्यू यॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक झाल्यापासून अवघ्या अमेरिकेसह जगभर जोहरान ममदानी हे नाव प्रसिद्ध झालं आहे. न्यू यॉर्कचे महापौर झालेल्या ममदानी यांचा हा विजय लक्षणीय ठरला तो त्यांच्या घोषणांमुळे. न्यू यॉर्कमध्ये मोठी संख्या स्थलांतरितांची आहे. या स्थलांतरितांसाठी अनेक योजनांची घोषणा करणारे ममदानी विजयी झाले आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी खुले आव्हान दिले आहे. आता ममदानी पाठोपाठ आणखी एका भारतीयवंशी तरुणाची चर्चा अमेरिकेत सुरु झाली आहे. भारतीय-अमेरिकन डेमोक्रॅट सैकत चक्रवर्ती हे संसद निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवार आहेत. (Saikat Chakraborty)

सॅन फ्रान्सिस्को मधून सैकत चक्रवर्ती डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सॅन फ्रान्सिस्को हे शहर प्रतिष्ठित गोल्डन गेट ब्रिज, केबल कार आणि व्हिक्टोरियन वास्तुकलेसाठी ओळखले जाते. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे मुख्यालय या शहरात असल्यामुळे न्यू यॉर्क पाठोपाठ महत्त्वाचे शहर म्हणून सॅन फ्रान्सिस्को ओळखले जाते. आता याच शहराचे संसद सदस्य म्हणून भारयीय वंशाचे सकैत निवडणूक लढवत आहेत. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये सुभाष चंद्र बोस यांचा टी-शर्ट घातल्याबद्दल सकैत यांच्यावर नाझी समर्थक म्हणून टीका कऱण्यात आली आहे. मात्र सकैत हे ममदानी यांचे कट्टर समर्थक आहेत. विशेष म्हणजे, ममदानी यांच्यासारखेच श्रीमंतांवर अधिक कर लावण्याची भाषा ते करत आहेत. त्यामुळे आता सकैत यांना स्थलांतरितांना साथ देणारी विधाने विजयी करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (International News)

अमेरिकन काँग्रेसमध्ये भारतीय वंशाचे सकैत चक्रवर्ती यांची निवड होण्याची शक्यता आहे. जेष्ठ सदस्य नॅन्सी पेलोसीची जागा घेणारे सकैत हे न्यू यॉर्कचे महापौर ममदानी यांचे कट्टर समर्थक आहेत. प्रतिष्ठीत हार्वर्ड विद्यापीठात संगणक शास्त्राचा अभ्यास केलेले सकैत हे त्यांच्या आक्रमक विचारांनी ओळखले जातात. सॅन फ्रान्सिस्को येथील सदस्य नॅन्स पेलोसी यांनी राजकारणातून नियुक्ती जाहीर केली आणि सकैत चक्रवर्ती यांचे नाव चर्चेत आले. नॅन्सी पेलोसी यांच्याकडे सॅन फ्रान्सिस्को ची जागा १९८७ ताब्यात होती. आता नॅन्सी पेलोसी यांनीही आपला उत्तराधिकारी म्हणून सैकत यांचे नाव घेतल्यामुळे त्यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या पाठिंब्यामुळे ३९ वर्षीय सैकत यांना डेमोक्रॅटिक उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य म्हणजे, अमेरिकेत सध्या आशियायी तरुणांचा राजकारणात मोठा सहभाग वाढत आहे, त्यामध्ये सकैत यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं बघण्यात येत आहे. ममदानीप्रमाणेच, सैकत हे अमेरिकेत उदयास येणाऱ्या प्रगतीशील नेत्यांच्या नवीन पिढीचा भाग आहेत. (Saikat Chakraborty)

सकैत चक्रवर्ती २०१८-१९ मध्ये प्रथम चर्चेत आले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सुभाष चंद्र बोस यांचे छायाचित्र असल्याचे टी-शर्ट घातले होते. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. सकैत यांच्यावर तेव्हा नाझी विचारसरणीचा प्रचार केल्याचा आरोप केला गेला. मात्र चक्रवर्ती यांनी या टीकेला घाबरुन आपली आक्रमक विचारसरणी बदलली नाही. त्यांनी नव्या पिढीला आवश्यक अशा सुविधा देण्यासाठी आपल्या योजना जाहीर करुन त्याप्रमाणे कार्य सुरु ठेवले. (International News)

त्यामुळेच सोशल मीडियावर चक्रवर्ती यांची तुलना ममदानी यांच्याबरोबर केली जात आहे. एप्रिलपासून त्यांनी त्यांच्या प्रचार मोहीमेची सुरुवात केली आहे. चक्रवर्ती यांनी ममदानीप्रमाणेच, श्रीमंतांवर कर वाढवण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचा ब्रँड पूर्णपणे बदलण्याची घोषणाही केली आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी चक्रवर्ती यांनी ११ व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टसाठी २०२६ च्या डेमोक्रॅटिक पार्टी प्रायमरीमध्ये आपली उमेदवारी जाहीर केली. यावेळी “डेमोक्रॅटिक पक्षाला आता नवीन नेतृत्वाची आवश्यकता आहे.” असे त्यांनी जाहीर करुन पक्षामध्ये तरुणांना संधी मिळणार हे सुतोवाच केले होते. (Saikat Chakraborty)

=======================

हे देखिल वाचा : Obesity Treatment : भारतातील  पहिली ‘ लठ्ठपणा कमी करणारा ’ औषधयशस्वी ट्रायलमध्ये यश, बाजारात कधी येणार जाणून घ्या

=======================

सकैत यांचा जन्म टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथे भारतीय स्थलांतरित पालकांच्या पोटी झाला. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी संगणक शास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत २०१६ मध्ये बर्नी सँडर्स यांच्या अध्यक्षीय मोहिमेचे काम सांभाळले. सँडर्स जिंकले नसले तरी, सकैत यांनी त्यातून आपली ओळख निर्माण केली, आणि आता त्याचाच फायदा त्यांनी कॉंग्रेससदस्यपदाच्या निवडणुकीसाठी होणार आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.