Saif Ali Khan Diet Plan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान 54 व्या वर्षीही अगदी फिट अँड फाइन आहे. वयाच्या 36 व्या वर्षी हार्ट अटॅक आल्यानंतर अभिनेत्याने आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले आहेत. खरंतर, सैफ आपल्या डाएटकडे अधिक लक्ष देतो. एका मुलाखतीत सैफने म्हटले होते की, एखाद्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये असल्यास तेथेही स्वदेशी पदार्थ खायला आवडतात. याशिवाय सैफ अली खानला जेवण बनवायला खूप आवडते. अशातच तुम्हीही वयाच्या 50 व्या वर्षात हेल्दी आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतायत तर सैफचा डाएट प्लॅन फॉलो करू शकता.
असा आहे सैफचा डाएट प्लॅन
एका मुलाखतीत सैफ अली खानने म्हटले होते की, लंचमध्ये गाजर, मटार आणि भेंडी अशा भाज्यांचे सेवन करणे पसंत आहे. सकाळच्या नाश्तामध्ये अंडी आणि टोस्ट आवडते. याशिवाय मीट देखील आवडते. रात्रीच्यावेळेस मासे आणि भात आवडतो.
फिटनेस फ्रिक नाही
सैफ अली खान अधिक फिटनेस फ्रिक नाही. याशिवाय रविवारी थोडा आरामात सकाळी उठतो. यानंतर कुकिंग करतो आणि हलका व्यायाम करतो. (Saif Ali Khan Diet Plan)
या गोष्टींचे सेवन करणे टाळतो
वर्ष 2007 मध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर सैफ अली खानने आपल्या डेली रुटीनमध्ये काही बदल केले आहेत. सैफ आधी सिगरेट ओढायचा, ती आता त्याने बंद केली आहे. सिगरेट प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन बिघडले जाते. यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढला जातो. याशिवाय दारु देखील सैफ पित नाही. दारु प्यायल्याने ब्लड प्रेशर प्रभावित होते. अशातच हृदयासंबंधित आजार उद्भवल्या जातात.
आणखी वाचा :
मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रवास
स्वप्नील जोशीने खरेदी केली कोट्यवधी किंमतीची आलिशान गाडी