मराठी आणि हिंदीमध्ये काम करत आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची प्रेक्षकांवर भुरळ घालणारी सई नेहमीच चर्चेत असते. मराठीमध्ये टॉपवर पोहचल्यावर तिने हिंदीमध्ये देखील आपली प्रतिभा दाखवत यश मिळवले. नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या सईने नुकतेच ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सईचे फोटो आणि तिचा हा लुक तुफान व्हायरल होताना दिसतोय. सईने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा वेस्टर्न लूक सगळ्यांनाच खूप आवडत आहे. सई या लुकमध्ये कमालीची आकर्षक दिसत असून तिचा कमनीय बांधा आणि मादक अदा सगळ्यांनाच भुरळ घालत आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये तिने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. सईचा हा लुक कमाल व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोजवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सईने तिच्या या ड्रेसवर हाय हील्स घातल्या असून, ज्वेलरीमध्ये गोल्ड इअररिंग घातलेल्या दिसत आहे. तिने चौकोनी आकाराच्या इअररिंग्जला निवडले असल्याने ते तिच्या स्टाईल कॉम्प्लिमेंट करताना दिसत आहे.
सईच्या हेयर स्टाइलबद्दल बोलायचे झाले तर तिने केसांचा हाफपोनी बांधला असून बाकी केस मोकळे सोडले आहेत. मोकळ्या केसांना तिने कर्ल लुक दिला आहे. सईने या ड्रेससह मॅट मिनिमल मेकअप केलेला दिसत आहे. तिने डोळ्यांना डार्क काजळ आणि स्मोकी आईज लुक दिला आहे. ब्राऊन शेड आयशॅडोचा वापर केला असून मिनिमल अशी न्यूड शेड लिपस्टिक लावली आहे.