Home » पनवेलचा सागर म्हात्रे ठरला ‘इंडियन आयडल मराठी’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता!

पनवेलचा सागर म्हात्रे ठरला ‘इंडियन आयडल मराठी’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता!

by Team Gajawaja
0 comment
Sagar Mhatre
Share

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केलं. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) विजेता ठरला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे (Sagar Mhatre) पेशाने इंजिनियर असला तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘गाडीवान दादा’ असं टोपणनाव पडलेल्या सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे.

स्पर्धेत टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मेहेनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची व्हा व्हा मिळवत तब्बल ८ ‘झिंगाट परफॉर्मन्स’ मिळवले. हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गात, दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला.

====

हे देखील वाचा: रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा रायगडावर दमदार प्रयोग

====

आता ‘इंडियन आयडल मराठी’ च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.