Saffron for Skin : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. याशिवाय काही घरगुती उपायही आहेत. पण तरीही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नसल्यास हाती निराशा येते. अशातच आयुर्वेदातही केशरचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर करण्यात येतो. याशिवाय केशर जगभरातील सर्वाधिक महागड्या मसाल्यांपैकी एक आहे. याचा त्वचेसाठी वापर केला जात असल्याने त्यासंबंधित सर्व समस्या दूर होतात. केशरचा उत्तम स्वाद, सुगंध यामुळे त्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्येही वापर केला जातो. अशातच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केशरचा कशाप्रकारे फायदा होतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अँटी-एजिंग
केशरमध्ये अँटी-एंजिंग गुणधर्म, क्रोसिन, सफ्रानल भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेसाठी केशर फायदेशीर ठरते. केशरमुळे त्वचा सूर्याच्या हानिकारक किराणांपासून आणि सन डॅमेजपासून दूर राहते. केशमध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडेंट्समुळे त्वचेचे होणारे नुकसान होत नाही.
पिग्मेंटेशन
केशरमध्ये भरपूर प्रमाणात सूज दूर ठेवणे ते काही औषधीय गुणधर्म असतात. यामुळे त्वचेसह आरोग्याला याचा फायदा होतो. केशरमुळे पिंपल्स, पिंपल्सचे डाग, पिग्मेंटेशन, डोळ्यांखाली काळे डाग आणि काही अन्य त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

kesar benefits for skin
त्वचा चमकदार होते
केशरमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. एखाद्या पार्टीसाठी जाणार असल्यास चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी केशरच्या मास्कचा वापर करू शकता. याशिवाय एक्सफोलिएशनसाठी केशर बेस्ट पर्याय आहे.
=======================================================================================================
आणखी वाचा :
Black Raisins : काळ्या मनुका नियमित खाल्ल्याने शरीराला होतील अनेक मोठे फायदे
Alum Water Face Wash Benefits : तुरटीने चेहरा धुतल्याने काय होते?
=======================================================================================================
सूजेची समस्या दूर होते
केशरमुळे त्वचेवरील सूजेची समस्या कमी होण्यास मदतहोते. केशमध्ये सूज कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्याला येणारी सूज कमी होते. (Saffron for Skin)
केशरचा असा करा वापर
-त्वचेवर केशरचा टोनरचा वापर करू शकता. यासाठी केशरला गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकता.
-ग्लोइंग त्वचेसाठी केशरचा फेस पॅक तयार करू शकता. यासाठी केशर मिल्क पावडरमध्ये मिक्स करुन पेस्ट तयार करा.
-केशरमध्ये दूध, चंदन आणि मध मिक्स करुन चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेचे टॅनिंग कमी होते.