Home » पावसाळ्यात अशी घ्या स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी

पावसाळ्यात अशी घ्या स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी

by Team Gajawaja
0 comment
Safety tips in monsoon
Share

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. आरोग्यासंबंधित साथीचे आजार या काळात होतात. खासकरुन साथीचे आजार, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावीच. पण त्याचसोबत काही अशा सुद्धा गोष्टी असतात त्यांची ही याच सोबत पावसाळ्यात काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते. (Safety tips in monsoon)

-सावधगिरीने गाडी चालवा
जी लोक कार किंवा बाईकने प्रवास करतात त्यांनी कायद्यांचे पालन केलेच पाहिजे. परंतु पावसाळ्यात सुद्धा वाहनांची सर्विस करुन घ्यावी. कारण कधीकधी गाडी मध्येच बंद पडली तर काय करावे हे कळत नाही. या व्यतिरिक्त दुचाकीचे टायर खराब झाले असतील तर ते बदलून घ्या. कारण पावसाळ्यात रस्ते हे निसरडे होतात आणि अशातच तुमची गाडी घसरु शकते.

-पावसाळ्यात वॉकसाठी जाऊ नका
कामावर जाताना पावसाचा आनंद घेत जाणे प्रत्येकालच आवडते. परंतु असे करणे आरोग्यासाठी सुरक्षित नव्हे. पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर साथीचे आजार तुम्हाला होऊ शकतात. जसे की, लेपटोस्पिरोसिस आणि पायांच्या नखांच्या माध्यमातून फंगल इंन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

-आपल्यासोबत एक्स्ट्रा कपडे ठेवा
कधीकधी पावसाचा जोर वाढल्याने आपण छत्री असून ही भिजतो. अशातच तुम्ही नेहमीच पावसाळ्यात आपल्यासोबत एक्स्ट्रा कपडे ठेवा.तुमच्या ऑफिसच्या लॉकरमध्ये हे कपडे ठेवू शकता.

-खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
टाइफाइड किंवा डेंग्यू सारखे आजार पावसाळ्यात होतात. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही संतुलित आहार घ्यायला विसरु नका. आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. यावेळी पोषक तत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करा.(Safety tips in monsoon)

-इलेक्ट्रिक धोक्यांपासून दूर रहा
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पाणी आणि वीज या गोष्टी एकत्रित आल्या तर वीजेचा धक्का बसू शकते. अशातच तुम्ही वीजेसंबंधित क्षेत्रात काम करत असाल तर काळजी घ्या. वीजेच्या तारा खुल्या असतील त्या ठिकाणी त्या बंद करा आणि तेथे जाणे टाळा. तुमची विद्युत उपकरणे व्यवस्थितीत आहेत की नाही हे सुद्धा पहा.

हेही वाचा- थंड की गरम पाणी, अंघोळीसाठी बेस्ट पर्याय कोणता?

तर वरील काही गोष्टींची काळजी घ्या. त्याचसोबत परिवारातील अन्य सदस्यांची सुद्धा पावसाळ्यात काळजी घ्यावी. खासकरुन घरात जर लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असतील. त्यामुळे पावसाळ्यातील तुम्ही केलेल्या चुकांमुळे तुमचे नुकसान होईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.