Safety tips for laptop– ज्या वेळी आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करतो तेव्हा आपल्यासोबत महत्वाच्या गोष्टी घेऊन जाण्यास विसरत नाहीत.मात्र जर तुम्हाला तुमच्या कंपनीतून एका महत्वाच्या मिटिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठी पाठवण्यात येत असेल तेव्हा तुम्हाला तुमचा लॅपटॉप सोबत घेऊन जा असे ही सांगितले जाते. अशातच तुम्ही ट्रॅव्हल करताना लॅपटॉप सोबत घेऊन जाणार असाल तर काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. कारण प्रवासादरम्यान आपल्या महत्वाच्या सामानांपैकी एक असलेला लॅपटॉपची सुद्धा चोरी होऊ शकते याची सुद्धा भीती आपल्या मनात असते. किंवा जर एखाद्याचा धक्का लागल्यास हातातील लॅपटॉप खाली पडल्यास तुमचेच नुकसान यामध्ये होते. तुमचा थोडासा ही बेजबाबदारपणा तुमच्या अंगलट येऊ शकतो. परंतु ट्रॅव्हल करताना लॅपटॉपची काळजी घेणे हे फार काही अवघड नाही आहे. या दरम्यान काही फक्त सावधगिरी बाळगून तुम्ही तुमचा लॅपटॉप अत्यंत सुरक्षित ठेवू शकता. तर जाणून घेऊयात लॅपटॉप संदर्भातील काही सेफ्टी टिप्स.
-तुमच्या बॅगेला लॉक असू द्या
प्रवास करताना तुम्ही एखादी सामान्य चैन असलेली बॅग घेण्यापेक्षा ज्या बॅगेला लॉक येतात तशी बॅग सोबत घ्या, कारण यामुळे लॅपटॉप चोरी होण्याची भीती नसते. या व्यतिरिक्त लॅपटॉप बॅग ही प्रवासादरम्यान आपल्या सोबतच ठेवा.
-वाय-फाय वापरण्यापासून दूर रहा
तुमच्या लॅपटॉप मधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवासादरम्यान वाय-फायचा वापर करु नका. खासकरुन सार्वजनिक वाय-फायचा वापक करणे टाळा. कारण याच्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या लॅपटॉप मधील सर्व डेटा चोरतात. त्यामुळे ही काळजी प्रवासादरम्यान नक्की घ्या.
-डेटा बॅकअप ठेवा
काही वेळेस चुकून लॅपटॉप चोरी झाला किंवा लॅपटॉपची हार्ड डिस्क क्रॅश झाल्यास तुमचा सर्व डेटा निघून जाईल. अशातच लॅपटॉपचा डेटा सुरक्षित करण्यासाठी डेटा बॅकअप ऑन ठेवा आणि लॅपटॉप मधील सर्व डेटा एक्सटरनल हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करण्यास विसरु नका.
हे देखील वाचा- २.५ पेटाबाइटमध्ये स्टोर केला जाऊ शकतो मानवाचा मेंदू? जाणून घ्या अधिक
-पॅडेड कव्हरचा वापर करा
प्रवासादरम्यान चुकून धक्का लागल्यास लॅपटॉप खाली पडल्यास तुमचेच नुकसान होणार आहे. तर सामान्य कव्हर सुद्धा लॅपटॉपला स्क्रॅच फ्री ठेवण्यात अयशस्वी ठरतात. अशातच तुम्ही पॅडेड कव्हरचा वापर करुन लॅपटॉपला स्क्रॅच येण्यापासून बचाव करु शकतात.(Safety tips for laptop)
-लॅपटॉप हिट होणार नाही याची काळजी घ्या
प्रवासादरम्यान तुम्ही तुमचा लॅपटॉप हा हिट होणाऱ्या जागेऐवजी थंड ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. लॅपटॉपला ह्युमिडिटी आणि गरम ठिकाणी ठेवणे टाळा.
-कुलिंग पॅड लावणे विसरु नका
काही वेळेस दीर्घकाळ लॅपटॉपवर काम केल्याने लॅपटॉप गरम होतो. अशातच लॅपटॉपचे तापमान सामान्य ठेवण्यालाठी कुलिंग पॅडचा वापर करणे बेस्ट आहे. त्यासाठी प्रवासादरम्यान ४-५ तासांहून अधिक वेळ लॅपटॉप वापरणार असाल तर कुलिंग पॅड लावणे विसरु नका.