Home » पावसाळ्यात सुरक्षित वाहन चालवण्यासाठी ‘या’ चुका करणे टाळा

पावसाळ्यात सुरक्षित वाहन चालवण्यासाठी ‘या’ चुका करणे टाळा

by Team Gajawaja
0 comment
Safe driving in monsoon
Share

पावसाळ्यातून गाडीवरुन फिरायला जाणे हे बहुतांश जणांना आवडते. मात्र काहीजण पावसाळ्यातून कामावर जाण्यासाठी गाडीचा वापर करतात. परंतु पावसाळ्यात दुचाकी वाहने चालवताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. अन्यथा अपघात होण्याची फार अधिक शक्यता असते. कारण पावसाळ्यात जेव्हा पावसाचे पाणी रस्त्यावर साठते तेव्हा आपल्याला रस्त्यात असलेला खड्डा किंवा गटार उघडं आहे का हे सुद्धा दिसत नाही. त्यामुळेच नेहमीच दुचाकी चालवताना काळजी घेणे फार महत्वाचे असते. या व्यतिरिक्त पावसाळ्यात ट्रॅफिक जाम सुद्धा होते. अशावेळी रस्ते हे निसरडे झाल्याने तेव्हा दुचाकी काळजीने चालवणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊयात पावसाळ्यात बाइक किंवा स्कूटी चालवताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे.(Safe driving in monsoon)

-टायरकडे लक्ष द्या
पावसाळ्यात घराबाहेर पडताना जर तुम्ही स्कुटी घेऊन जात असाल तर टायरकडे जरुर लक्ष द्या. कारण तुमच्या टायरची ग्रिप कमी झाली असेल तर तुमचे वाहन हे रस्त्यावर सहज घसरु शकते. यासाठी कोणताही विलंब न लावता टायर बदलून घ्या. या व्यतिरिक्त नियमित रुपात टायर मधील हवा सुद्धा तपासून पहा.

-अधिक वेगाने वाहन चालवू नका
तुम्ही जरी उत्तम चालक असाल तरी पावसाळ्यात वाहन चालवताना काळजी घ्या. कारण पावसाळ्यात आपली स्कूटी किंवा बाईक अधिक वेगाने चालवण्यापेक्षा त्याचा वेग कमी असू द्या. यामुळे तुमचा बाईकवरील कंट्रोल सुद्धा राहिलच पण आपत्कालीन ब्रेक लावून सुद्धा तुम्ही गाडी लगेच थांबवू शकता. याउलट गाडी वेगाने असेल आणि तुम्ही अचानक ब्रेक दाबल्यास गाडी घरसण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा- जगातील एकमेव शहर, जिथे चालवू शकत नाही मोबाईल आणि टीव्ही; खेळण्यांच्या वापरावरही बंदी

-अंतर ठेवा
पावसाळ्यात नेहमीच पाठी, पुढे किंवा आजूबाजूला असलेल्या वाहनांपासून काही अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त अधिक भार भरलेल्या गाड्यांपासून सुद्धा दूर रहा. त्याचसोबत गाडीची हेडलाइट सुरुच ठेवा. कारण तुम्हाला पावसाळ्यात पुढचे दिसण्यास समस्या येणार नाही.(Safe driving in monsoon)

-ब्रेकचा योग्य वापर करा
पावसाळ्यावेळी नेहमीच ब्रेकचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे गाडी हळूहळू थांबली जाते. तर पुढील ब्रेक दाबल्याने गाडी अचानक उभी राहते. त्यामुळे तुमची गाडी घसरु शकते आणि पाठीमागे असलेल्या गाडीला धक्का सुद्धा लागू शकतो. त्यामुळे आपत्काळात तातडीने गाडी थांबवण्यासाठी पुढील आणि मागील ब्रेक एकत्रित दाबा. फक्त पुढील ब्रेक लावण्यापासून दूरच रहा.

-साचलेल्या पाण्यात जाणे टाळा
पावसाळ्यावेळी रस्त्यावर पाणी साचले असेल तर तेथे जाणे टाळा. कारण तुमची गाडी खड्ड्यात अडकू शकते आणि तेथून गाडी बाहेर काढणे त्रासदायक होते. भरलेल्या पाण्यातून गाडी चालवल्यास ती बंद ही पडू शकते. त्यामुळे साचलेल्या पाण्यात आपली स्कूटी घेऊन जाणे टाळले पाहिजे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.