Home » अनुभव की बनवाबनवी, Sachin Pilgaonkar सतत चर्चेत का ?

अनुभव की बनवाबनवी, Sachin Pilgaonkar सतत चर्चेत का ?

by Team Gajawaja
0 comment
Sachin Pilgaonkar
Share

त्यांचा पिक्चर जेव्हा थिएटरला लागायचा तेव्हा घरातला कर्ता पुरुष सायकलवरून त्या पिक्चरची advance बूकिंग करायला जायचा. ते तिकीट घेऊन जेव्हा तो घरी पोहचायचा तेव्हा ते तिकीट हातात घेऊन त्याची मुलं ते कौतुकाने पहायचे आणि चार दिवसांनी जेव्हा ते त्या पिक्चरला म्हणजे त्या सोहळ्याला, त्यांच्यासाठी तो सोहळाचं. त्याला ते संपूर्ण कुटुंब एकत्र जायचे. तर हे सगळं व्हायचं एका माणसाच्या चित्रपट पाहण्यासाठी ज्यांना सध्या सोशल मिडियावर प्रचंड ट्रॉल केलं जातंय ते म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर. त्यांचा एक इंटरव्ह्यु सध्या व्हायरल होतोय जो त्यांनी 9 महिन्यांं आधी दिला होता. ज्यात त्यांनी असा दावा केला होता की, शोले’ चित्रपटातला अमजद खानचा म्हणजे गब्बर सिंगचा तो सुपरहिट डायलॉग “कितने आदमी थे” त्यांना कसा बोलायचा, हे सचिन यांनीच त्यांना सांगितलं. यावरून नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आणि ट्रॉल करायला सुरुवात केली. पण हे पहिल्यांदा नाही आहे. याआधी सुद्धा त्यांना बऱ्याचदा ट्रॉल केलं गेलंय. त्यामुळे याघटने मागचं सत्य काय? हा सगळा गोंधळ नेमका काय आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना ट्रोल करणारे त्यांचं योगदान विसरत चालले आहेत का ? हे जाणून घेऊ. (Sachin Pilgaonkar)

तर सचिन पिळगावकर यांची ट्रॉल होण्याची ही पहिली वेळ नाही. सहा वर्षांआधी जेव्हा त्यांनी आमची मुंबई हे गाणं केलं होतं. तेव्हा सुद्धा त्यांना भयंकर ट्रॉल केलं गेलं होतं. एवढं की आजही त्या गाण्यावरून सोशल मिडियावर त्यांची खिल्ली उडवली जाते. काही लोक म्हणतात की त्यांना ट्रॉल करण्याची गरजच नाही हे गाण बनवून त्यांनी स्वत:लाच ट्रॉल केलं आहे. त्यानंतर ते ट्रॉल झाले त्यांच्या Interviews मुळे आणि त्यात अतिशयोक्ती अलंकाराचा जास्त वापर केल्यामुळे अशाच एका Interview मध्ये त्यांनी सांगितलेला शोलेचा किस्सा ज्यावरून सध्या त्यांची ट्रॉलिंग सुरू आहे. तर अमजद खान यांना त्यांनी dialogue कसा घ्यावा हे सांगितलं होतं असा दावा त्यांनी केला होता. त्यावर मग त्यांना कोणी म्हणालं की अरे, सचिन पिळगावकर कोण इतके मोठे की अमजद खान यांना शिकवतील?” तर कोणी म्हणतं, “हा काय गप्पांचा बादशहा आहे!” एवढंच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करून सांगितलं की त्यांना सचिन यांचं म्हणणं पटत नाही. (Top Stories)

Sachin Pilgaonkar

पण या सगळ्याआधी त्यावेळी नक्की काय घडलं होतं हे समजून घ्यायला हवं, तर 1975 मध्ये, जेव्हा ‘शोले’ हा चित्रपट बनत होता. त्या काळात अमजद खान हे इंडस्ट्रीत नवखे होते. ‘शोले’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. आणि हो, गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी त्यांना कास्ट करण्याआधी त्यांना चित्रपटात काम करण्याचा अनुभव नव्हता. कॉलेजच्या नाटकांमधून त्यांनी थोडं काम केलं होतं. त्याचं वेळी सचिन पिळगावकर हे 17 वर्षांचे असले तरी त्यांचा चित्रपटात काम करण्याचा अनुभव दांडगा होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती! 1962 मध्ये ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं आणि थेट भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.(Sachin Pilgaonkar)

शोले चित्रपटात काम करेपर्यंत त्यांनी राजा परांजपे, मीनाकुमारी, देव आनंद, शम्मी कपूर, ऋषिकेश मुखर्जी यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं होतं. आणि सचिन हे शोले चित्रपटात रमेश सिप्पींना असिस्ट करत होते. म्हणजे एका यूनिटमध्ये ते त्यांचे Representative होते. तर शोले’च्या सेटवर काय झालं की अमजद खान यांचा आवाज गब्बरच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. त्यांचा आवाज बारीक आणि कमजोर वाटत होता, आणि त्यात खलनायकाची ती धमक नव्हती. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की, त्यांना चित्रपटातून काढण्याचा विचारही झाला होता! शोले’चे लेखक सलीम-जावेद यांनी सुद्धा डायरेक्टर रमेश सिप्पी यांना अमजद यांचा आवाज डब करून दुसऱ्या कोणाचा तरी आवाज वापरण्याचा सल्ला दिला होता. (Top Stories)

=================

हे देखील वाचा : Sundar Pichai : भारत की अमेरिका? गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्याकडे कोणत्या देशाचे नागरिकत्व, वाचा

=================

आता सचिन पिळगावकर यांनी ‘शोले’मध्ये अहमदची छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. इतकंच नाही, तर त्यांना काही दृश्यांचं सहाय्यक दिग्दर्शन करण्याचीही संधी मिळाली होती. त्यांनी आणि अमजद खान यांनी काही सीनमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे मग सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना सांगितलं, मला फक्त तीन दिवस द्या. डबिंगमध्ये यात सुधारणा होऊ शकते. सचिन रोज सकाळी पाच वाजता अमजद खान यांच्यासोबत राजकमल स्टुडिओत जायचे. तिथे साऊंड रेकॉर्डिस्ट सूद यांच्या मदतीने त्यांनी अमजद यांच्यासोबत डबिंगवर काम केलं. त्यांनी अमजद यांना सांगितलं की आवाजात बेस वाढवावा, ट्रेबल कमी करावा. “कितने आदमी थे” हा डायलॉग अमजद यांनी खरजात बोलला, आणि त्या तीन दिवसांत त्यांनी तो परफेक्ट केला. जेव्हा हा डबिंगचा ट्रॅक रमेश सिप्पी यांना ऐकवला, तेव्हा त्यांनी लगेच ठरवलं की अमजदच डबिंग करणार. सचिन यांनी याचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात, ‘हा माझा मार्ग एकला’मध्ये केलाय. त्या इंटरव्ह्युमध्ये सुद्धा सचिन पिळगावकर असं म्हणतात की माझ्या मागे जो अनुभव होता तो अमजदच्या मागे नव्हता.. आता सचिन यांनी जे काही सांगितलं आहे किंवा लिहिलं आहे ते खरं आहे की खोटं हे माहिती नाही. पण सचिन पिळगावकर हे फक्त अभिनेतेच नाहीत, तर दिग्दर्शक, लेखक, गीतकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत 60 वर्षं घालवली आहेत. महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता चित्रपट अशी ही बनवाबनवी त्यांनी स्वत: लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. त्याशिवाय एकापेक्षा एक’, ‘नवरा माझा नवसाचा अशा अनेक चित्रपटांनी बालपण समृद्ध केलंय.(Sachin Pilgaonkar)

आज त्याचं माणसाला ट्रॉल केलं जातंय, आता त्यांनी केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा की नाही, हा विषय वेगळा आहे. पण त्यांनी मराठीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट आधी आणले आहेत, प्रेक्षकांचं मनोरंजंन केलं आहे. हो, कदाचित ते इंटरव्ह्युमध्ये बोलतात ती अतिशयोक्ती वाटतं असले, पण त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीला सोशल मीडियाच्या कमेंट्समध्ये काळं फासण्याची गरज आहे का? हे आता प्रेक्षकांनाच ठरवावं लागेल.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.