Home » महेश कोठारे आणि सचिन यांचे नाते कसे आहे..?

महेश कोठारे आणि सचिन यांचे नाते कसे आहे..?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sachin Pilgaonkar
Share

मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने नावारूपाला आणला तो अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या दिग्गजांनी. आपल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने आणि अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटांना अटकेपार ओळख मिळवून दिली. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर हे त्रिकुट असो किंवा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे हे त्रिकुट असो यांनी मोठ्या पडद्यावर फक्त धुमाकूळच घातला आहे.

जवळपास ५० वर्ष सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या सचिन यांनी कधीच महेश कोठारे यांच्यासोबत काम केले नाही, किंवा महेश यांनी देखील सचिन यांच्यासोबत काम केले नाही. अनेकदा लोकांच्या मनात देखील हा प्रश्न आला असेल की, सचिनजी आणि महेश कोठारे हे एकत्र का नाही दिसत? मात्र याचे उत्तर आजपर्यंत कधी मिळालेच नाही. पण सध्या सचिनजी त्यांच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच निमित्ताने त्यांनी ‘माझा कट्ट्याला’ एक मुलखात दिली आणि या मुलाखतीमध्ये याबद्दल त्याची बाजू देखील स्पष्ट केली आहे.

Sachin Pilgaonkar

या मुलाखतीमध्ये सचिनजी यांना विचारण्यात आले की, ‘तुम्ही महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्याकडून अशा कोणत्या गोष्टी शिकला की ज्याचा फायदा तुम्हाला आतापर्यंत होत आहे?’ याला उत्तर देताना सचिन पिळगांवकर यांनी सांगितले की, “महेश कोठारेसोबत मी कधी काम नाही केले. समवयस्कात काम केले, म्हणजेच तुम्ही त्यांच्याकडून काही शिकता असा होत नाही. पण त्यांची काम बघून आपण त्यांची स्तुती, कौतुक नक्कीच करु शकतो. मला महेशचे सिनेमे पाहायला खूप आवडते. त्याचा ‘थरथराट’ हा सिनेमा माझ्यामते नंबर वन सिनेमा आहे. त्याची सिनेमा तयार करण्याची पद्धतच वेगळी आहे आणि माझी पद्धत वेगळी आहे.”

पुढे त्यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींबद्दल सांगितले. ते म्हणले, “अशोक सराफकडून काही शिकण्यासारखे असेल तर त्याची शिस्त. जे तुम्ही सरावादरम्यान केले नाही, ते तुम्ही टेकमध्ये नाही करायचे. भरपूर कलावंताना ही सवय असते की, टेकमध्ये स्वत:चे काहीतरी करतात. याबाबतीत त्याचे विचार मला पटतात. तुम्हाला जर काही करायचे असेल तर समोरच्या कलाकाराला सांगून करा. यासोबतच त्याच्या शिस्तीमध्ये अनेक गोष्टी येत्यात, ज्यात वेळेवर पोहचणे, आधी संवाद पाठ करणे. तर लक्ष्याकडून मी कोणती चांगली गोष्ट शिकलो असेल तर ती म्हणजे बडे दिलवाला आदमी…ती एक गोष्ट मला त्याच्याकडून शिकायला मिळाली. तो खूप दिलदार होता.”

दरम्यान नवरा माझा नवसाचा २ या सिनेमात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, जयवंत वाडकर असे अनेक कलाकार दिसणार आहेत. मुख्य म्हणजे २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटाचा हा सिनेमा सीक्वेल आहे.

आणखी वाचा :
प्रवासावेळी ट्रॅव्हल एंग्जायटीचा सामना करता? लक्षात ठेवा या गोष्टी
प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी या 5 गोष्टींची घ्यावी खास काळजी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.