भारतात अगणित मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचा इतिहास, वैशिष्ट्ये वेगळे आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक मंदिराचे नियम देखील अनोखे आहेत. या अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमुळे देखील भारताची एक वेगळी ओळख जगात आहे. भारतातील मंदिरं आणि त्यातही खासकरून दक्षिण भारतातील मंदिरं त्यांच्या रेखीव स्थापत्यासाठी आणि अनोख्या नियमांसाठी कायम प्रकाशझोतात येत असतात. असेच एक दक्षिण भारतातील जगविख्यात मंदिर म्हणजे ‘शबरीमाला’. (Temple)
आपण अनेकदा या मंदिराबद्दल ऐकले असेल, वाचले असेल. भगवान अय्यप्पा यांना समर्पित असलेले हे मंदिर भारतात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. नुकतेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे तीर्थस्थान मानले जाणारे सबरीमला मंदिर रविवारी दोन महिन्यांच्या वार्षिक तीर्थयात्रेसाठी उघडण्यात आले. पहाटे तंत्रींनी नवीन मेलशांतीच्या उपस्थितीत श्रीकोविलसमोर कलशाभिषेक करून विधीची सुरुवात झाली आहे. (Sabrimala Temple)
भारताच्या केरळ राज्यातील पतनमतिट्टा जिल्ह्याच्या पेरियार टायगर अभयारण्यात वसलेले शबरीमाला मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. वर्षातून तीनवेळाच या मंदिरात जाता येते. विषु, म्हणजे एप्रिल महिन्याच्या मध्यावर, मार्गशीष महिन्यात होणाऱ्या मण्डलपूजेला आणि मलरविलक्कु, म्हणजेच मकर संक्रांतीला येथे जाता येते. त्यातही मकर संक्रांतीची यात्रा अधिक पावन मानली जाते. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना त्यांच्या भक्तीचा कस लावावा लागतो आणि त्यानंतरच त्यांना देवाचे दर्शन होते. शबरीमला मंदिराचं नाव रामायणातील शबरीच्या नावावरून पडलं. शबरीचे वास्तव्य डोंगरांच्या ज्या भागामध्ये होतं तेथेच हे मंदिर असल्याने या मंदिराचं नामकरण ‘शबरीमला’ असं करण्यात आलं आहे. (Marathi)

दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान भारतातील भाविकांसह परदेशातील भाविकही या मंदिराला भेट देतात. या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या कोटींच्या आसपास असते. या भाविकांची सर्व व्यवस्था त्रावणकोर देवासवम बोर्डातर्फे करण्यात येते. भगवान अय्यप्पन यांना समर्पित असलेल्या या मंदिरात येण्यासाठी भक्तांना ४१ दिवसांच्या कठोर व्रताचे पालन करावे लागते. कठोर ब्रह्मचर्य आणि त्यानंतर सात्विक भोजन अशा नियमांचे पालन या ४१ दिवसांच्या व्रतामध्ये केले जाते. याला मण्डलम् म्हणतात. पंबा नदिच्या काठावर वसलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. पंपापासून अंदाजे ५ किमीची जंगलातून जाणारी पायी यात्रा पूर्ण केल्यानंतर भक्त १५३५ फूट उंचीवरील सबरीमला मंदिरात पोहोचतात. (Marathi News)
मात्र येथील सौंदर्य पाहून इथवर पोहचायचा अत्यंत कठिण प्रवास भक्तांचा सगळा थकवा दूर होतो आणि त्यांना स्वर्गीय सुखाचा अनुभव होतो. मल्याळम मध्ये शबरीमलाचा अर्थ पर्वत असा होतो. पंपा येथून शबरीमलयपर्यंत पायी यात्रा करावी लागते. हे पाच किलोमिटरचे अंतर घनदाट झाडांनी व्यापलेले आहे. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर असलेले शबरीमलय मंदिर पौराणिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मंदिरातील शांत वातावरण भक्तांना सुखावते. मंदिराच्या भोवती १८ डोंगर आहेत. मंदिराच्या प्रांगणात पोहचण्यासाठी १८ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरात अय्यप्पन यांच्याशिवाय मालिकापुरत्त अम्मा, गणपती, नागराज यांच्याही मुर्ती आहेत. (Top Stories)
भगवान अय्यप्पांच्या दर्शनासाठी १८ पायऱ्यांवरून चढून गेल्यावर भक्तांना प्रवेश मिळतो. या १८ पायऱ्यांच्या अर्थाशी जोडलेल्या काही परंपरा आहेत. सर्वात प्रचलित मान्यतेनुसार पहिल्या पाच पायऱ्या ५ इंद्रियांचे प्रतीक आहेत. नंतरच्या ८ पायऱ्या ८ भावनांचे प्रतीक आहेत. त्यानंतरच्या ३ पायऱ्या ३ गुण दर्शवतात आणि शेवटच्या २ पायऱ्या विद्या आणि अविद्या यांचे प्रतीक आहेत. त्याशिवाय या पायऱ्यांचा संबंध १८ पुराणे, सबरीमालाच्या आसपासचे १८ पर्वत, अय्यप्पांची १८ शस्त्रास्त्रे, १८ सिद्धपुरुष, १८ देवता आणि १८ गुण यांच्याशी जोडला जातो. (Marathi News)
त्यावरून जाण्याचे नियमही कठीण आहेत. कोणताही भक्त १८ पायऱ्यांवर गाठोड्याशिवाय (इरुमुडी) आणि ४१ दिवसांचे व्रत केल्याशिवाय चढू शकत नाही. या १८ पायऱ्यांना पतिनेत्तामपदी म्हटले जाते. त्या आधी ग्रॅनाइटच्या होत्या, पण १९८५ मध्ये त्या सोने, चांदी, तांबे, लोखंड, टिन यांच्या मिश्रणाने मढवल्या. या पायऱ्यांमुळे सबरीमाला मंदिर अय्यप्पांच्या इतर मंदिरांपेक्षा वेगळे ठरते. या पायऱ्या चढण्यासाठी डोक्यावर गाठोडे (इरुमुडी) ठेवणे आवश्यक आहे. दोन भागांतील गाठोड्याच्या अर्ध्या भागात पूजा सामग्री आणि दुसऱ्या भागात भक्तांच्या खासगी वापराच्या वस्तू असतात. येथे देवाचे वर्णन ‘नील मेघ श्यामल वर्ण’ या रूपातही होते. त्यामुळे देवाशी जोडले जाण्यासाठी लोक निळे वस्त्र घालतात. शनिदोषाने पीडित लोक काळे वस्त्र घालतात. काही भक्त भगव्या आणि पांढऱ्या वस्त्रांतही दिसतात. (Todays Marathi Headline)

मकरसंक्रांतीच्या रात्री मंदिर परिसरात दिसणारी ‘मकरी विलक्कु’ नामक पवित्र ज्योत हे येथे दिसणारे अद्भुत दृश्य मानले जाते. या दिव्य प्रकाशाचे दर्शन घेण्यासाठी कोट्यवधी भक्त सबरीमला गाठतात. मंदिराचा परिसर १८ पर्वतरांगांनी वेढलेला असल्यामुळे या परिसराला सबरीमला असे नाव मिळाले. श्री अयप्पन ब्रह्मचारी असल्यामुळे या मंदिर परिसरात महिलांना प्रवेश नाही. मात्र लहान मुली आणि वयोवृद्ध महिलांना प्रवेश दिला जातो. ज्या महिलांना मासिक पाळी येते त्यांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही. काही वर्षापूर्वी याबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र मंदिराचे व्यवस्थापन आपल्या परंपरा पाळण्याच्या निश्चयावर ठाम राहिले. (Top Marathi HEadline)
विष्णू आणि शिव यांच्या एकत्र शक्तीने भगवान अयप्पा यांची निर्मिती झाली. अयप्पा ही देवता शाश्वत ब्रह्मचारी असल्याने मागील १५०० वर्षांपासून या मंदिरात मासिकपाळीच्या टप्प्यातील महिलेला प्रवेश नाकारला जात होता. पुराणातील कथेनुसार, शबरीमला मंदिर ही ती जागा आहे जेथे अयप्पांनी महिशी या असुराचा वध केला होता. महिशी ही महिशासुराची बहीण होती. दुर्गा देवीने महिशासुराचा वध केल्यानंतर बदला घेण्यासाठी महिशी आणि अयप्पा यांच्यामध्ये युद्ध रंगलं. मात्र यामध्ये महिशीचा वध झाला. (Latest Marathi News)
शबरीमला हे हिंदू देवतेचं मंदिर असले तरीही मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरम्यानच्या रस्त्यात एक मशिददेखील आहे. वावर या मुस्लिम संताच्या स्मरणार्थ आहे. भाविक मंदिरात जाण्यापूर्वी त्याला प्रदक्षिणा मारतात, जाताना अयप्पा आणि वावर दोघांच्याही नावाचा जयघोष करतात. मंदिरात अयप्पाच दर्शन घेण्यापूर्वी भाविकाला 41 दिवसाचं व्रत करावं लागत. यादरम्यान भाविक केवळ शाकाहारी जेवण घेतात. या काळात केस आणि नखं कापण्याला मज्जाव असतो. (Marathi Trending Headline)
========
Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा
Sankranti : जाणून घ्या वृश्चिक संक्रांतीचे खास महत्त्व
========
भारतातील श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे शबरीमला मंदिर, दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक अयप्पाचं दर्शन घेतात. श्रीनिवास अय्यर यांनी लिहलेल्या हरिवरसनमचं पठण केलं जातं. यामध्ये १०८ शब्द आणि ८ कडवी आहेत. अयप्पाच्या मंदिरात केवळ साध्या काळ्या किंवा निळ्या रंगाची वस्त्र परिधान करून यावीत असा नियम आहे. दर्शनाच्या वेळेस मांसाहार, मद्यपान टाळण्याचा, दोन वेळेस आंघोळ करण्याचा दंडक आहे. (Top Trending News)
शबरीमलयला जाणारे भाविक सहज ओळखता येतात कारण त्यांचा पोशाख हा खास असतो. काळी वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा धारण करुन या मंदिरात गेल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धारणा आहे. माळा धारण केलेल्या भक्तांना स्वामी म्हणून संबोधण्यात येते. यातून ईश्वर आणि भक्त एकरुप झाल्याचे मानण्यात येते. आजवर अजय देवगण, रामचरण यांच्यासारख्या कलाकारांनी देखील अय्यप्पा भगवानांचे कठीण व्रत केले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
