Home » Kerala : सबरीमाला आणि मंडळपूजा

Kerala : सबरीमाला आणि मंडळपूजा

by Team Gajawaja
0 comment
Share

केरळ मधील जगप्रसिद्ध शबरीमाला मंदिरात प्रसिद्ध मंडळपूजेसाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. या मंदिरात 26 डिसेंबर रोजी मंडळ पूजा होणार असून हजारो भाविकांच्या 41 दिवसांच्या कडक उपोषणाची सांगता होणार आहे. यासाठी शबरीमाला मंदिर परिसरात भाविकांना मोठी मिरवणूक काढली आहे. हा सर्व परिसर देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांनी सजून गेला आहे. सबरीमाला मंदिर हे भारतातील केरळ राज्यातील पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पातील सबरीमाला पर्वतावर आहे. या मंदिराची जगभर ख्याती आहे. दरवर्षी या मंदिरात 4 ते 5 कोटी भाविक दर्शनासाठी येतात. भगवान अय्यपन यांना समर्पित असलेल्या या मंदिरातील मंडळपूजेसाठी अनेक भाविक वर्षभर प्रतीक्षा करीत असतात. (Kerala)

केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये मंडळपुजेची तयारी जोरात चालू आहे. 26 डिसेंबर रोजी मंडळ पूजा होणार असून त्यासाठी त्रावणकोर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी कर्पुरा आजी मिरवणूक काढली. यात हजारो भाविक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात मंदिराचे कंदार राजीव आणि मेलासंती अरुणकुमार नंबूथिरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कर्पुरा आजीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मलिकापुरम मंदिरमार्गे पदपथावर पोहोचली आणि 18 व्या पायऱ्यापूर्वी संपली. ढोल ताशांचा गजर आणि भगवान अय्यपन यांच्या जयघोषानं हा परिसर दुमदुमून गेला होता. (Marathi News)

या मिरवणुकीत शिव, पार्वती, हनुमान, गणेश या देवतांच्या प्रतिकृती मंत्रमुग्ध करत होत्या. याशिवाय मिरवणुकीमधील रोषणाईही भाविकांना सुखावणारी होती. या मिरवणुकीनंतर मंडळाच्या पूजेसाठी सुवर्ण वस्त्र 25 डिसेंबरच्या संध्याकाळी सबरीमाला येथे आणले जाईल. हे वस्त्र भगवान अय्यप्पन यांना अर्पण केले जाईल. यावेळी विशेष दीपार्थन आयोजित केले जाणार आहे. शबरीमालामध्ये मंडलपूजेसाठी दरवर्षी मोठी तयारी करण्यात येते. (Kerala)

या वर्षी मंडल पूजा व्रत 16 नोव्हेंबर पासून सुरू झाले. या 41 दिवसांच्या व्रताची सांगता म्हणजेच मंडळ पूजा असते. हे व्रत सूर्याच्या वृश्चिक राशीत प्रवेश झाल्यावर सुरू होते. यानंतर सूर्य धनु राशीत असताना मंडळ पूजा केली जाते. हे व्रत म्हणजे एक कठीण तपश्चर्या असते. कारण 41 दिवसांच्या व्रतामध्ये सांसारिक सुखांचा त्याग करावा लागतो. कडक उपवास असतो. पायी चपला घालता येत नाहीत. विशिष्ठ वस्त्र परिधान करावी लागतात. हे व्रत कठिण असले तरी भगवान अय्यप्पन यांचे भक्त ते तेवढ्याच भक्तीनं पार पाडतात. दरवर्षी हे व्रत करणा-यांची संख्या वाढती आहे. असे मानले जाते की यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतात. या व्रतामध्ये शरीर आणि मनाची शुद्धता होते असेही सांगितले जाते. (Marathi News)

या पूजेत सहभागी होण्यासाठी मांस, अंडी, मद्य याशिवाय अनेक प्रकारच्या तामसिक आहाराला सोडून सात्विक आहार घ्यावा लागतो. त्यामुळे शारीरिक बळ संपादन होते, अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळेच हे व्रत जेवढे कठिण तेवढीच त्याची ख्याती वाढती आहे. शबरीमाला मंदिर हे शैव आणि वैष्णव यांच्यातील एक अद्भुत दुवा मानला जातो. मल्याळममध्ये ‘शबरीमाला’ म्हणजे पर्वत. पंपा ते सबरीमाला हा पायी प्रवास करावा लागतो. हा मार्ग पाच किलोमीटर लांबीचा आहे. शबरीमाला येथे भगवान अय्यप्पनचे मंदिर आहे. हा सर्व परिसर घनदाट जंगलाचा आहे. या मंदिरात येण्यापूर्वी भक्तांना 41 दिवसांचे कठोर उपवास करावे लागतात त्यालाच ‘मंडलम’ म्हणतात. या मंदिरात वर्षातून तीनवेळ मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. त्यात एप्रिल महिन्यात होणारी विशूपूजा, मार्गशिष महिन्यात होणारी मंडलपूजा आणि मकर संक्रांतीमध्ये होणा-या मकरविलक्कू पुजेचा समावेश आहे. (Kerala)

=======

हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !

शानदार नोएडा फिल्म सिटी

=======

भगवान अय्यपन हे शिशुशास्त्राचा अवतार मानले जातात. त्यांचा उल्लेख कंबन रामायण, महाभागवतचा आठवा मंत्र आणि स्कंदपुराणातील असुर कांडात आहे. मोहिनीच्या वेशातील भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या मिलनातून शास्ताचा जन्म झाला असे म्हणतात. याच भगवान अय्यप्पनचे प्रसिद्ध मंदिर पुंकवन नावाने ओळखल्या जाणाऱ्या 18 टेकड्यांमध्ये असलेल्या या धाममध्ये आहे. त्यालाच शबरीमाला श्रीधर्मस्थ मंदिर म्हणतात. भगवान अय्यप्पन यांच्या पूजेसाठी परशुरामांनी शबरीमाला येथे मूर्तीची स्थापना केली होती, अशीही कथा येथे सांगितली जाते. काही भाविक रामभक्त शबरी या नावानंही या देवस्थानचा उल्लेख करतात. (Marathi News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.