Home » Ryo Tatsuki : तिच्या स्वप्नाची दहशत !

Ryo Tatsuki : तिच्या स्वप्नाची दहशत !

by Team Gajawaja
0 comment
Ryo Tatsuki
Share

जपानची बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या र्यो तात्सुकीची एक भविष्यवाणी प्रसिद्ध झाली आहे. या भविष्यवाणीमुळे जपानसह त्याच्या शेजारी देशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. र्यो तात्सुकी यांना स्वप्नामध्ये भविष्य दिसायचे. त्या घटना त्यांनी एका डायरीत लिहिल्या. यावर ‘द फ्युचर आय सॉ’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात र्यो तात्सुकीने केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता याच पुस्तकात र्यो तात्सुकीनं जपानसाठी जुलै 2025 महिना सर्वात खतरनाक महिना असल्याचे लिहिले आहे. जपानमध्ये जुलै 2025 मध्ये सर्वात मोठी आपत्ती येण्याबाबत र्यो तात्सुकीने भविष्यवाणी केली आहे. (Ryo Tatsuki)

जपानच्या आसपासच्या समुद्रात लाव्हासारखे बुडबुडे येतील आणि महाकाय लाटा निर्माण होतील, अशी ही भविष्यवाणी आहे. 2011 च्या भयानक त्सुनामीपेक्षाही धोकादायक अशी त्सुनामी येण्याची शक्यता या पुस्तकातून वर्तवण्यात आली आहे. जपानसह त्याच्या शेजारी देशांनाही या त्सुनामीची झळ बसणार असल्याचेही र्यो तात्सुकी यांनी लिहिले असल्यामुळे या देशांमध्ये खळबळ उडाली आहे. राजकुमारी डायनाच्या मृत्यूपासून ते कोरोना महामारीपर्यंत अनेक भविष्यवाणी र्यो तात्सुकी यांनी केल्या होत्या. त्या सर्व ख-या ठरल्या आहेत. 2011 मध्येही जपानमध्ये आलेल्या त्सुनामीची भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्यामुळेच जुलै 2025 वरुन जपानसह त्याच्या शेजारी देशांमध्ये भीतीचे वातावऱण पसरले आहे. (Latest International News)

माजी जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनी जुलै 2025 आणखी एक धोकादायक आपत्ती येण्याची शक्यता वर्तवली आहे. तात्सुकी यांच्या मते, समुद्रात ‘उकळते पाणी’ आणि मोठे बुडबुडे दिसत असून हे मोठ्या त्सुनामीचे लक्षण असल्याचे सांगण्यात येते. र्यो तात्सुकी या एक माजी मंगा कलाकार असून त्या त्यांच्या भाकितांसाठी ओळखल्या जातात. जपानच्या बाबा वेंगा म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांना स्वप्नात भविष्यात होणा-या घटना दिसत असत. 1980 पासून, त्यांनी स्वप्नातील घटना डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली. त्यावर 1999 मध्ये ‘द फ्युचर आय सॉ’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच पुस्तकात आता जपानमधील सर्वात मोठ्या आपत्तीचे वर्णन करण्यात आले आहे. (Ryo Tatsuki)

र्यो तात्सुकींच्या मते जुलै 2025 मध्ये जपान आणि आसपासच्या देशांमध्ये एक मोठी मेगा-त्सुनामी येऊ शकते. 2011 च्या तोहोकू त्सुनामीपेक्षा ही त्सुनामी तिप्पट धोकादायक असणार आहे. र्यो तात्सुकी यांच्या स्वप्नात दिसलेल्या भविष्यानुसार जपानच्या दक्षिणेकडील समुद्रातील पाणी उकळत आहे आणि त्यात मोठे बुडबुडे उठत आहेत. हे समुद्राखालील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे लक्षण असू शकते, त्यामुळेच मोठी त्सुनामी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जपानसह तैवान, फिलीपिन्स आणि इंडोनेशिया या देशांच्या किनारी भागांना फटका बसण्याची शक्यता र्यो तात्सुकी यांनी पुस्तकात व्यक्त केली आहे. र्यो तात्सुकी यांच्या अनेक भविष्यवाणी यापूर्वीही ख-या ठरल्या आहेत. त्यामुळे जपानमध्ये आता त्याची चर्चा सुरु झाली आहे. जपानी तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नानकाई ट्रफ प्रदेशात एक मोठा भूकंप होऊ शकतो, ज्यामुळे ३० मीटर उंचीपर्यंत त्सुनामी येऊ शकते. मात्र, सध्या, अशा कोणत्याही धोकादायक त्सुनामी येण्याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे शास्त्रज्ञांकडे नाहीत. पण र्यो तात्सुकी यांनी व्यक्त केलेला धोका पाहता जपानमध्ये अनेक शास्त्रज्ञ या विभागावर लक्ष ठेऊन आहेत. (Latest International News)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Pitongtarn Shinawatra : ती फक्त सुंदर नाही, उत्तम प्रशासकही आहे…

==========

र्यो तात्सुकी यांनी 1995 मध्ये त्यांच्या डायरीत लिहिले होते की, 25 वर्षांनी, म्हणजे 2020 मध्ये, एक रहस्यमय विषाणू येईल. एप्रिलमध्ये या विषाणुचा सर्वाधिक फैलाव होईल. नंतर विषाणुचा प्रादुर्भाव कमी होईल. पण पुन्हा 10 वर्षांनी हाच विषाणु परत येणार आहे. सुरुवातील र्यो तात्सुकी यांच्या या भाकिताकडे कोणी गांभीर्यानं पाहिलं नाही. पण 2020 मध्ये कोविड-19 ची साथ आल्यावर र्यो तात्सुकी यांचे नाव चर्चेत आले होते. याशिवाय र्यो तात्सुकी यांनी 1991 मध्ये फ्रेडी मर्क्युरीच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरली. ब्रिटनची राजकुमारी डायनाच्या मृत्यूबाबतही त्यांनी भविष्य सांगितले होते. त्यानंतर पाच वर्षांनी राजकुमारी डायना यांचे निधन झाले. त्यामुळेच आता र्यो तात्सुकी यांनी सांगितलेल्या त्सुनामीच्या भविष्यवाणीमुळे जपान आणि आसपासच्या देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Ryo Tatsuki)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.