संपूर्ण देशात गुरुग्राम मधील रेयान शाळेच्या हत्येप्रकरणी आरोपी विद्यार्थी प्रिंस (बदललेले नाव) याला पाच वर्षानंतर जामीन मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याला आता जामीन दिला गेला आहे. वर्ष २०१७ मध्ये प्रिंस यानेच आपल्याच शाळेतील एका ७ वर्षीय मुलगा प्रद्युम ठाकूर याचा गळा कापून हत्या केली होती आणि याच कारणास्तव त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो अवघा १६ वर्षांचा होता आणि तेव्हापासून तो अटकेत होता. आता पाच वर्षानंतर म्हणजेच वयाच्या २१ व्या वर्षात वर्षात त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. जुवेनाइल जस्टिस बोर्डाने काही काळापूर्वी त्याच्यावर अल्पवयीन ऐवजी अडल्ट आरोपी म्हणून खटला चालवण्यासाठी मंजूरी दिली होती. (Ryan School Murder)
आरोपी विद्यार्थ्याच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश दिनेश माहेश्वरी आणि न्यायाधीश जेके माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. खंडपीठाने आरोपी हा पाच वर्ष ताब्यात असल्याचे लक्षात घेता त्याच्या जामीनासाठी मंजूरी दिली. दरम्यान, खंडपीठाने सातत्याने प्रोबेशन अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली राहण्यासह गुरुग्रामच्या सेशन न्यायाधीशांकडून ठरवण्यात आलेल्या अटी आणि नियमाअंतर्गत त्याला जामीन दिला गेला आहे.

अधिकच चर्चेत राहिले हे प्रकरण
पाच वर्षापूर्वी म्हणजेच ८ सप्टेंबर २०१७ मध्ये गुरुग्राम मधील रेयान स्कूलच्या टॉयलेट मध्ये ७ वर्षाचा विद्यार्थी प्रद्युमन ठाकूर हा गंभीर अवस्थेत जखमी असल्याचे आढळून आले होते. क्लास-२ चा विद्यार्थी प्रद्युमन याची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण अधिकच चर्चेत राहिले होते. पोलिसांनी प्रद्युमन याच्या हत्येच्या आरोपाखाली शाळेच्या बसचा कंटक्टरला अटक केली होती. मात्र नंतर जेव्हा सीबीआयच्या हवाल्याने हे प्रकरण सोडवण्यात आले तेव्हा सीबीआयने ७ नोव्हेंबरला ११ वी च्या वर्गातील विद्यार्थी प्रिंस याला अटक केली होती. (Ryan School Murder)
हे देखील वाचा- पाकिस्तानच्या एकमेव डीजे आर्टीस्टला बलात्काराची धमकी…
परीक्षा रद्द करायची होती प्रिंसला
प्रिंसची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपणच हत्या केल्याचे मान्य केले. त्याने असे म्हटले की, त्याला शाळेत होणारी परीक्षा रद्द करायची होती. तसेच पालक आणि शिक्षकांमधील बैठक सुद्धा त्याला रद्द करायची होती. याच कारणास्तव त्याने टॉयलेटमध्ये प्रद्युमन याचा गळा चिरला होता. दरम्यान, प्रिंसच्या वडिलांनी आरोप लावला होता की, त्याच्या चौकशीवळी त्यांच्या मुलाला टॉर्चर करण्यात आले आणि जबरदस्तीने गुन्हा कबुल करण्यास भाग पाडले. त्यानतंरच प्रिंसला ताब्यात घेण्यात आले होते.