Home » रशिया -युक्रेन युद्धाआधी युक्रेनमध्ये चित्रित झालेल्या ‘लव्ह इन युक्रेन’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

रशिया -युक्रेन युद्धाआधी युक्रेनमध्ये चित्रित झालेल्या ‘लव्ह इन युक्रेन’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

by Team Gajawaja
0 comment
love in ukraine
Share

आपल्या मनोरंजनविश्वात अनेक सिनेमे हे सध्याच्या घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर बेतलेले असतात. जगात घडणाऱ्या घटना चित्रपटाच्या स्वरूपातून लोकांपर्यंत पोचवल्या जातात. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त गाजणारा मुद्दा म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध. मागील तीन महिन्यांपासून हे युद्ध सुरू आहे. मात्र आता एक असा सिनेमा येत आहे ज्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली. (love in ukraine)

कमल एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेडने म्युझिक यूट्यूब चॅनेलवर ‘लव्ह इन युक्रेन’ (love in ukraine) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलर लाँचवेळी चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या धीरज कुमार तर निर्माता केसी बोकाडिया, अभिनेता सुरेंद्र पाल, पवन कौशिक आणि बबीता कौशिक यांच्यासोबत मुख्य कलाकार विपिन कौशिक, कॉमेडियन सोमा राठौर, सलीम जैदी, न्यारा बनर्जी, मंजू भारती आणि मुकेश जे भारती आदी कलाकार उपस्थित होते. (love in ukraine)

‘लव्ह इन युक्रेन’ या सिनेमाच्या ट्रेलरने सध्या इंटरनेटवर कमाल केली आहे. या रोमॅंटिक ॲक्शन ड्रामा सिनेमाची शूटिंग रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वीच संपली. या सिनेमाचे शूटिंग युद्ध सुरू होण्यापूर्वी केले गेले. मुख्य म्हणजे लव्ह इन युक्रेन सिनेमात मुख्य अभिनेत्री लिजाबेटासोबत दहा युक्रेनी कलाकार देखील अभिनय करताना दिसणार आहे. सिनेमात फन, लव्ह, ॲक्शन, ड्रामा आणि कॉमेडी सर्वच मसाला असल्याने हा सिनेमा नक्कीच गाजणार यात शंका नाही. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन कुमार गुप्ता आणि विशाल शर्मा यांनी मिळून केले आहे. ट्रेलरला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. (love in ukraine)

=====

हे देखील वाचा – ‘दबंग गर्ल’ ने मिस्ट्री मॅनसोबत केला साखरपुडा?, सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण

=====

या सिनेमात लिजाबेटा, एनकेजी, मिखाइल स्ट्रिगा, लोलिता ज़ुरावलोवा, रोमन बैट्रिन, रुस्लान सेफरोव, ओल्स दिमित्रेंको, इरमा बालन, कॉन्स्टेंटिन शिर्याव, व्लादिमीर डिडेन्को आणि सर्गेई शेचेनिचनी एस यांच्यासोबत विपिन कौशिक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरची सुरुवात भारतीय विद्यार्थी असलेल्या विपीन कौशिकपासून होते. विपिन एका युक्रेनी मुलीच्या प्रेमात पडतो. तर इकडे त्याच्या कुटुंबाने विपिनचे लग्न एका गुंड परिवारातील मुलीसोबत होईल असे वचन दिलेले असते. यानंतर पुढे कथा कशी पुढे सरकते, काय काय घडते हे सिनेमात बघणे नक्कीच मजेशीर असेल. या सिनेमात युक्रेन, युक्रेनची संस्कृती, तेथील लोकं, शहरं, गावं आदी सर्वच दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. २७ मे २०२२ ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात कॉमेडीचा तडका देखील असणार आहे. (love in ukraine)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.