Home » रशियन सैन्यात जायचे नाही म्हणून तरुण बदलतायत लिंग

रशियन सैन्यात जायचे नाही म्हणून तरुण बदलतायत लिंग

by Team Gajawaja
0 comment
Russia Ukraine War
Share

युक्रेन सोबत सुरु असलेल्या युद्धात सैनिकांच्या तुटवड्यामुळे रशियन सरकार सातत्याने तरुणांना सैन्यात भरती करत आहे. रशियाने कायद्यात बदल करत तरुणांना सैन्यात सेवा करणे अनिवार्य केले आहे. पण रशियन तरुणींना युद्धाची भीती वाटत आहे. असे या कारणास्तव म्हटले जात आहे कारण रशियन सैन्यात भरती न होण्यासाठी तरुण हे आपले लिंग बदलून घेत आहेत. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धा फार मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांचे सैनिक मृत्यूमुखी पडल्याची बातमी समोर आली आहे.(Russia Ukraine War)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्दालिमिर पुतिन यांनी गेल्या वर्षात फेब्रुवारीत युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून हे युद्ध सुरु आहे. युद्ध आणखी काही काळ चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या बाजूला रशियन सैन्यात सैनिकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच तरुण लिंग बदल करतायत. असा गोंधळ सुरु असल्याने आता पुतिन यांचे अधिकारी सैन्यात भरती होण्यासाठी जेंडरच्या नियमांना अधिक कठोर करु शकतात. जेणेकरुन तरुण भरती होतील.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रशियान सैन्याने आता पर्यंत युद्धाच्या मैदानात ७,७०,०० सैनिकांना गमावले आहे. यामध्ये ५.७ लाख असे सैनिक आहेत जे अत्यंत गंभीर जखमी झाले असून ते पुन्हा लढू शकत नाहीत. युद्धाबद्दल असा ही दावा केला जात आहे की, आता पर्यंत रशियातील १.९३ लाख सैनिक ठार झाले आहेत. हेच कारण आहे की, रशियाला आपल्या तरुणांकडून अपेक्षा आहे की ते देशासाठी आपले योगदान देतील. पण सैन्यात भरती न होण्यासाठी तरुण मात्र नवेनवे मार्ग शोधत आहेत.

खरंतर रशियात एक फॉर्म भरुन लिंग परिवर्तन केले जाऊ शकते. यासाठी सर्जरीची गरज नाही. सरकारचे सुद्धा असे मानणे आहे की, एखादा व्यक्ती केवळ कागदावर आपले लिंग बदलत असेल तर त्याच्याकडे लग्न करणे आणि मुलं दत्त घेण्याचा अधिकार येतो. मात्र यामुळे समस्या ही उद्भवतात. (Russia Ukraine War)

हेही वाचा- No Fault Divorce वरुन अमेरिकेत वाद

सरकारला सुद्धा असे वाटत आहे की, आता तरुण सातत्याने आपले लिंग बदलून घेत आहेत. असे सांगितले जात आहे की, ज्या तरुणांनी गेल्या वर्षात डिसेंबर मध्ये सैन्याच्या ड्राफ्टमुळे ज्यांना देश सोडता आला नाही आता त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी प्रायव्हेट क्लिनिकडे धाव घेतली आहे. आता पर्यंत २.५ लाखांपेक्षा अधिक तरुणांनी आपले लिंग बदलले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.