Home » काहीही करा पण मुले जन्माला घाला !

काहीही करा पण मुले जन्माला घाला !

by Team Gajawaja
0 comment
Russia Population
Share

जगावर युद्धाची छाया आहे, असं सांगितलं जात आहे. चीन, रशिया, अमेरिका, जर्मनी यासारखे देश आपले वर्चस्व जगावर रहावे यासाठी प्रयत्नशील आहेत. तिकडे मिडलइस्टमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या देशावर हल्ले होत आहेत. या सर्व वातावरणात एका मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. हा प्रश्न म्हणजे, घटत्या लोकसंख्येचा. जगातील अनेक देश त्यांच्या देशातील घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत झाले आहेत. जन्मदरच कमी होत आल्यानं या देशांचे अस्तित्व पुढच्या 50 वर्षांनी जगाच्या नकाशावरुन नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या देशांनी आपल्या देशातील धोरणात बदल केले आहेत. लोकसंख्या वाढावी यासाठी तरुण वर्गाला अनेक सुविधा दिल्या आहेत. अगदी लग्न जमवण्यापासून ते मुल जन्माला येईपर्यंत सर्व खर्च सरकारी असल्याचेही आश्वासन देण्यात येत आहे. एकापेक्षा अधिक मुले जन्म घालणा-या दाम्पत्याला अधिक सुविधा, मुलांचे सर्व शिक्षण मोफत अशी प्रलोभनेही दाखवण्यात येत आहे. चीन, जपान सारख्या देशात घटत्या जन्मदरामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Russia Population)

या देशांमधील तरुण लग्न संस्थेपासून दूर होत असून त्यांना कुटुंब वाढवायचे नाही. त्यामुळे चीनमध्ये आता सरकार तरुणांना लग्न जुळवून द्यायला मदत करत आहे, तर जपानमध्ये सरकार मुलांची सर्वार्थानं जबाबदारी घ्यायला पुढे येत आहे. तीनपेक्षा अधिक मुले होणा-या दाम्पत्याला घरापासून ते नोकरीतील प्रमोशनपर्यंत सगळ्या सुविधा मिळत आहेत. हे होत असतांना रशियाही आपल्या देशातील जनसंख्या दरामुळे चिंतीत आहे. एका अहवालानुसार रशियामध्ये पुढच्या तीस वर्षात साठीच्या पार पोहचलेल्या नागरिकांची संख्या सर्वांधिक होणार आहे. यामुळे देशाची लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन रशियन सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अजिबोगरीब योजना आणि आवाहने नागरिकांना करण्यात येत आहेत. आता चक्क रशियन सरकारनं कार्यालयामध्ये सेक्स करण्यासाठी परवानगी दिली आहे. फक्त परवानगी नाही तर त्यासाठी बक्षिसही ठेवले आहे. काहीही करा पण मुलांना जन्म घाला,असे आवाहनच रशियन सरकारतर्फे कऱण्यात येत आहे. फक्त एवढ्या आवाहनावरच रशियन सरकार थांबले नाही, तर यासाठी विशेष मंत्रालयाचीही स्थापना करण्यात आली आहे. (International News)

घटत्या जन्मदराला वाढवण्यासाठी रशियामध्ये अगदी युद्धपातळीवर योजनांचा आणि आश्वासनांचा पाऊस पडत आहेत. रशियामध्ये गेल्या काही वर्षापासून जन्मदर कमी झाला आहे. हा जन्मदर पुढचे सहा वर्ष कमी होत गेला, तर रशियामध्ये वृद्धांची संख्या वाढणार आहे. यामुळे रशियन सरकारला चिंतेत टाकले आहे. त्यासाठी त्यांनी रशियन तरुणांना अधिक मुले जन्माला घाला, अशी आज्ञाच जणू दिली आहे. तरुणवर्ग कार्यालयामध्ये अधिक काळ असतो. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता असते. त्यामुळे कुटुंबासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, अशा सबबी नको, म्हणून कार्यालयातच रोमान्स करा, असे खुले आवाहन करण्यात आले आहे. फक्त आवाहन नाही तर अशा जोडप्याना बक्षिसेही देण्यात येणार आहे. रशियात या सर्वांसाठी आता ‘सेक्स मंत्रालय’ स्थापन करण्याचा विचार होत आहे. रशियातील घटत्या जन्मदराबाबत आणि तेथील तरुणांमध्ये लग्न संस्थेबद्दल कमी झालेल्या अनास्थेबद्दल आता विशेष पाहणी करण्यात आली. यातील निष्कर्ष हे धक्कादायक आले आहेत. त्यामुळे तरुण पिढीला पुन्हा कुटुंब संस्थेचे महत्त्व कळण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून कार्यालयात एकत्र काम करणाऱ्या जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत. (Russia Population)

=====

हे देखील वाचा : लोकसंख्या वाढवण्यासाठी काहीही ?

========

या जोडप्यांना महिना 5,000 रूबलही देण्यात येणार आहेत. शिवाय लग्न झालेल्या जोडप्यांना हनीमूनचा खर्चही मिळणार आहे. त्यात फिरण्याचा आणि हॉटेल खर्चाचा समावेश आहे. ज्या जोडप्यांना मूल होणार आहे, त्यांच्यासाठी विशेष सुट्टीही देण्यात येणार आहे, अर्थात त्या मुलाचा सर्व खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच एकापेक्षा जास्त मुलं झाल्यास त्या पटीनं अधिक पैसे त्या मुलाच्या वडिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. रशियन संसद मुल होऊ न देणा-या जोडप्याला दंड ठोठवण्याचाही विचार करत आहे. एकूण रशियामधील जन्मदर धोक्याच्या पातळीवर आहे. लोकसंख्या कमी होणं, आणि त्याचे वयोमान वाढणे यामुळे देशाच्या प्रगतीला आणि सुरक्षेला धोका येऊ शकतो. जगावर युद्धाची छाया असली तरी आज जगातील अनेक देश अशाच घटत्या लोकसंख्येच्या संकटामधून जात आहेत. आणि या सर्व देशात कमी अधिक प्रमाणात रशियासारखेच नियम मूल जन्माला यावे म्हणून घालण्यात आले आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.