जगभरातील अनेक देशांमध्ये कमी होणार जन्मदर ही एक मोठी सामाजिक समस्या झाली आहे. चीन, जपान, ब्रिटन सारख्या देशांमध्ये जन्मदर कमी झाल्यानं या देशांची लोकसंख्याही कमी होत आहे. यात आता आणखी एका देशाची भर पडली आहे. हा देश म्हणजे, रशिया आहे. अन्य देशात जन्मदर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होत असतांना रशिया त्यात कसे मागे राहिल. त्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादेमिर पुतिन यांनी एक अजब सल्ला देशातील तरुण तरुणींना दिला आहे. पुतिन यांना आपल्या नागरिकांना देशाच्या घटत्या जन्मदराला चालना देण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या विश्रांतीच्या वेळेत लैंगिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुतिन यांच्या या सल्याला देशाच्या आरोग्य मंत्र्यांनीही दुजोरा दिला आहे. (Vladimir Putin)
आरोग्य मंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव्ह यांनी पुतिन यांच्या पुढे जात कर्मचा-यांना कार्यालयात जाणाऱ्यांनी दुपारचे जेवण आणि कॉफीचा वेळ वापरण्याचा सल्ला दिला आहे. रशियाचा प्रजनन दर 2.1 होता. मात्र आता हाच जन्मदर प्रति महिला सुमारे 1.5 इथपर्यंत घसरल्यानंतर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रशियामध्ये आता या सामाजिक समस्येला तोंड देण्यासाठी सरकारी पातळीवरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात पुतिन यांनी कर्मचा-यांना थेट कार्यालयातच लैंगिक संबंध ठेवण्याचे आवाहन केल्यानं खळबळ उडाली आहे. शिवाय ज्या तरुणी अधिकाधिक मुलांना जन्म देतील त्यांना विशेष पारितोषिक देण्याची घोषणाही पुतिन यांनी केली आहे. देशाचे अस्तित्व टिकवण्यासाठी जनसंख्या ही मोठी गोष्ट असल्याची पुष्टीही वरुन पुतिन यांनी केली आहे. (Vladimir Putin)
गेल्या काही वर्षापासून रशियामध्ये जनसंख्या दर सातत्यानं कमी होत आहे. यातच रशिया युक्रेन युद्धाची छाया पडली आहे. या युद्धामुळे लाखो तरुण रशिया सोडून अन्य देशात स्थलांतरीत झाले आहेत. परिणामी नेहमी युद्धाचा विचार करणा-या पुतिन यांना आता देशाच्या जनसंख्येचाही विचार करावा लागत आहे. पुतीन यांनी 2022 मध्ये रशियन महिलांना 10 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी विशेष पुरस्कारही घोषित केले आहेत. आता 2024 मध्ये रशियातील जनसंख्या अधिक कमी होऊ लागल्यानं पुतिन चिंतेत आहेत. यावर उपाय सांगतांना त्यांनी देशातील नागरिकांना कार्यालयात काम करताना शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. रशियन नागरिकांचे संरक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. रशियन लोकांचे भविष्य आता त्यांच्या संख्येवर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Vladimir Putin)
रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनीही पुतिन यांच्या या आवाहनाला समर्थन दिले आहे. आरोग्य मंत्री डॉ.येवगेनी शेस्टोपालोव यांनी कार्यालयीन कामाचा ताण वाढल्यामुळे मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेण्यात येत असेल तर त्या तरुणांनी कार्यालयीन कामाच्या दरम्यान ब्रेक घेऊन शारीरिक संबंध ठेवावे असे सांगितले आहे. रशियामध्ये जन्मदर प्रति स्त्री 1.5 मुले आहे. तर देशाची लोकसंख्या राखण्यासाठी, जन्मदर प्रति स्त्री 2.1 मुले असणे आवश्यक आहे. रशियाच्या लोकसंख्येला सर्वात मोठा फटका युक्रेन युद्धाचा बसला आहे. युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे 1 दशलक्ष नागरिक देश सोडून गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण असल्यामुळे रशियातील सामाजिक समतोल बिघडला आहे. गेल्या काही वर्षापूर्वी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये रशियाचा समावेश होत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्या झपाट्यानं कमी झाली, त्यात रशियातून स्थलांतराचा दर वाढला आहे. त्यामुळेच रशियाचे अध्यक्ष पुतिन आता महिलांना जास्तीत जास्त मुलांना जन्म द्या, असे आवाहन करीत आहेत. यासाठी त्यांनी काही पारितोषिकेही जाहीर केली आहेत. (Vladimir Putin)
==============
हे देखील वाचा : रशियावर युक्रेनची आणि व्हॅक्यूम बॉम्बची एन्ट्री
===============
वास्तविक एकसंघ रशिया असतांनाही अशाच प्रकारच्या सामाजिक समस्येला तोंड द्यावे लागले होते. सोव्हिएत काळात ‘ग्लोरी टू मदर हिरोईन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. जास्त मुले होणा-या महिलांना हा पुरस्कार देण्यात येत असे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 2022 मध्ये हा पुरस्कार पुन्हा सुरू केला आहे. यातून 10 मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते. हा पुरस्कार दुसऱ्या महायुद्ध काळात महिलांना देण्यात आला होता. त्या काळातही रशियाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत होती. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर रशियाने हा पुरस्कार देणे बंद केले होते. तो आता पुन्हा सुरु झाला आहे. (Vladimir Putin)
सई बने