Home » चाहूल महायुद्धाची तयारी लहान देशांची

चाहूल महायुद्धाची तयारी लहान देशांची

by Team Gajawaja
0 comment
Russia And Ukraine War
Share

जगभर युद्धाचे ढग आहेत. रशिया युक्रेन युद्ध संपण्याचं नाव नाही. त्यात इस्त्रायलवर झालेला हमासचा हल्ला आणि त्यानंतर इस्त्रायलने चालू केलेले अग्नितांडव. इकडे आशियामध्ये चीन आपल्या शेजारी राष्ट्रांना देत असलेल्या धमकीनं तणाव निर्माण झाला आहे. तर रशिया आणि अमेरिकेमध्येही तणावाचे वातावरण चालू आहे. ही सर्व मोठी राष्ट्रे असली तरी या सर्वात लहान देशांना अक्षरशः भरडण्यात येत आहे. यामुळेच की काय काही देशांनी पुढच्या महायुद्धाची छाया जाणून घेत स्वतःच्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात फिनलंडसारख्या छोट्या देशांनी केली. आता फिनलंडच्या धर्तीवर नॉर्वेही रशियाच्या सीमेवर आधुनिक तंत्रांच्या आधारे कुंपण घालणार आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या सीमेवर असलेले देश सतर्क झाले आहेत. त्यांनी आपल्या सीमा सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. या लहान देशांनी आपल्याला युद्धाची झळ बसू नये आणि युद्धजन्य देशातील नागरिक आपल्याकडे येऊ नयेत, म्हणून आपल्या देशांच्या सीमांची नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. (Russia And Ukraine War)

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून रशियाच्या सीमा ज्या देशांना लागत आहेत, अशा देशांनी आपल्या सीमा आधुनिक तंत्राच्या आधारे अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आघाडी घेतली ती फिनलंड या देशानं. फिनलंडनं रशिया युक्रेन युद्धाचा ‘हायब्रीड वॉर’ असा उल्लेख केला. शिवाय रशियासोबतच्या 1,340 किमी लांबीच्या सीमेवर कुंपण घातले आहे. त्यामुळे रशियातून स्थलांतरिकांना थोपवण्यात या देशाला यश आले आहे. आता त्याच धर्तीवर नॉर्वे या देशानंही आपल्या सीमा बंद करायला सुरुवात केली लोंढा नॉर्वे आणि रशियाची सीमा 198 किलोमीटर लांब आहे. हे कुंपण घातलतांना त्यात सेन्सर आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रशियामधून नॉर्वेमध्ये जाणारे एकमेव क्रॉसिंग हे स्टोरस्कोग बॉर्डर स्टेशन आहे. (International News)

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून या बॉर्डरवर बेकायदेशीर क्रॉसिंगच्या घटनात वाढ झाली आहे. त्यातच सध्या रशियानं युक्रेनला अणुयुद्धाची धमकी दिल्यानं परिस्थिती बिघडली तर आणखी स्थलांतरित या सिमेचा वापर करु शकतात हे नॉर्वे ओळखून आहे. त्याधीच नॉर्वे सरकाराने सीमा बंद करण्याची तयारी सुरु केली आहे. फिनलंड सरकारने 2023 मध्येच रशिया ते फिनलंड असे सर्व क्रॉसिंग पॉईंट बंद केले आहेत. तरीही या देशाच्या क्रॉसिंगवर रशियन नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातील फक्त 1300 नागरिकांना फिनलंडमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. फिनलंड सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार रशियामधून मोठ्या प्रमाणात निर्वासीत फिनलंडमध्ये येत आहेत. दरदिवशी साधारण 300 नागरिक फिनलंडचा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करीत आहेत. ही संख्या फिनलंडसारख्या देशासाठी मोठी आहे. त्यामुळे या देशानं आधीच खबरदारी घेत आपल्या सीमा बंदच करुन टाकल्या आहेत. (Russia And Ukraine War)

आता याच निर्वासीतांचा लोंढा नॉर्वेकडे वळला आहे. नॉर्वेही फिनलंडप्रमाणेच लहान देश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात येणा-या रशियन नागरिकांमुळे तेथील सामाजिक व्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. यात रशियाचे अध्यक्ष ब्लादेमीर पुतिन यांनी युक्रेनला अणुयुद्धाची धमकी दिल्यावर अनेक रशियन नागरिकांनी देश सोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. फिनलंडने आपल्या सीमा बंद केल्यावर या सर्वांनी नॉर्वेमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. नॉर्वेमध्येही दिवसाला हजारो नागरिकांचे व्हिसाचे अर्ज दाखल होत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक नॉर्वेमध्ये आले तर येथील संपूर्ण व्यवस्था कोसळणार आहे. त्यामुळेच या देशानंही आपल्या सीमा आधुनिक तंत्राच्या सहाय्यानं बंद करायला सुरुवात केली आहे. (International News)

======

हे देखील वाचा : चीनची आण्विक पाणबुडी बुडाली !

======

फिनलंडने आपल्या रशियाला जोडलेल्या सीमा बंद करतांना कुंपणामध्ये उच्च दर्जाची पाळत ठेवणारी उपकरणे बसवली आहेत. नॉर्वे या देशानंही हाच पर्याय स्विकारला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा म्हणून या प्रश्नाकडे बघण्यात येत आहे. नॉर्वे आणि रशिया यांच्यातील सीमांमध्ये 195.7-किलोमीटर जमीन सीमा आहे. वॅरेंजरफजॉर्डमध्ये 23.2-किलोमीटर सागरी सीमा आहे. या सागरी सीमाही बंद करण्याबाबत नॉर्वेकडून विचार करण्या येत आहे. (Russia And Ukraine War)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.