Home » Lata Kare : ती पतीसाठी म्हातारपणात धाव धाव धावली !

Lata Kare : ती पतीसाठी म्हातारपणात धाव धाव धावली !

by Team Gajawaja
0 comment
Lata Kare
Share

आजकाल आपण रोज सकाळी उठल्यावर टीव्ही, मोबाईल, न्युजपेपर या गोष्टी बघतो. आणि यात अल्मोस्ट रोज एक news अशी असते कि ‘महिलेने घेतला नवऱ्याचा जीव’, किंवा ‘आपल्या एक्स च्या मदतीने बायकोने नवऱ्याला संपवलं’ नुकतच ताज असणारं प्रकरण म्हणजे सोनम आणि राजा case… ती case नक्की काय होती यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवलाय ज्याची लिंक वरती देतोय अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा ! तर थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या काळात नात्यांमध्ये वाढलेला संशय, specially नवरा बायकोच्या नात्यामध्ये वाढलेला संशय, हिंसाचार, आणि प्रेमाच्या नावाखाली होणारी जीवघेणी कृत्यं ही वाढतच जातायत. पण या सगळ्याला अपवाद ठरणारी आणि अजूनही जगात प्रेम शिल्लक आहे ह्याची आपल्याला जाणीव करून देणारी एक गोष्ट आहे लता भगवान करे यांची ! काय आहे या एका साध्या स्त्रीची असामान्य गोष्ट जाणून घेऊ. (Lata Kare)

तर मध्यंतरी महाराष्ट्रातल्या बारामतीत एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ट्रॅक सूट, स्पोर्ट्स शूज, नी कॅप घालून अनेक धावपटू सज्ज झाले होते. कुणी फिटनेससाठी, कुणी सवयीपोटी, तर कुणी केवळ छंद म्हणून धावत होतं. त्याच गर्दीत, अनवाणी पायांनी, मळकट नऊवारी साडीत एक ६५ वर्षांची आजी धावत होती. सगळ्यांचे डोळे तिच्यावर खिळले. धावपटूंना घाम फुटावा इतकं ती धावत होती. तिचं नाव… लता भगवान करे. पण तिचं धावण्यामागचं कारण वेगळंच होतं. काय होतं हे कारण जाणून घेऊ. (Top Stories)

Lata Kare

तर बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात लता आणि भगवान करे यांचा साधा, कष्टाळू संसार सुरू होता. तिन्ही मुलींच्या लग्नासाठी आयुष्यभराची जमापूंजी खर्च झाली. नंतर बारामतीत मोलमजुरी करत आपलं उरलेलं आयुष्य ते जगत होते. भगावान करे सेक्युर्टी गार्ड म्हणून, तर लता करे या शेतात शेतमजूरी करायच्या. सर्व काही एका छोट्या झोपडीत अपार कष्ट आणि मेहनतीने चालू होतं. परिस्थिती बिकट होती, पण संसाराचा गाडा चालत होता. आता इथपर्यंत एखाद्या सामान्य माणसांसारखच आयुष्य लता करे यांचं होतं. पण एका घटनेने त्यांच आयुष्यच बदल. ही घटना गंभीर होती. एक दिवशी अचानक भगवान करे यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं “उपचारांसाठी ५०,००० रुपये लागतील. लता करे हादरल्या. इतके पैसे कुठून आणणार? पण त्या थांबल्या नाहीत. शेजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून उधार मागून त्यांनी ती रक्कम उभी केली. नवऱ्याचं आयुष्य वाचलं. पण अजून संकट टळलं नव्हतं. कारण डॉक्टरांनी सांगितलं की “तुमच्या नवऱ्याची परिस्थिती थोडी नाजुक आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी त्यांचा MRI करणं गरजेच आहे.” आणि यासाठी खर्च येणार होता ५,००० रुपये! (Lata Kare)

५० हजार तर उधारी घेऊन कसे बसे उभे केले पण आता ५००० रुपये उभे करायचे होते. लता करे दु:खी होत्या, पण निराश नाही. लता करे पुन्हा कामाला लागल्या. त्यांनी आता शेतासोबत शाळेतसुद्धा काम करायला सुरवात केली. त्याच वेळी काही लहान मुलांनी त्यांना सल्ला दिला “आजी, तुम्ही खूप फास्ट चालता…एक मॅरेथॉन आहे, जिंकलात तर ५,००० रुपये मिळतील.” हे ऐकून लता करे यांनी मनाशी ठरवलं आपण धावायचंच.पण स्पर्धेच्या आदल्या दिवशी त्या आजारी पडल्या. इतक्या की जेव्हा त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी पोहचल्या तेव्हा सुद्धा त्या थंडीतापाने थरथरत होत्या.त्यामुळे अनेकांनी सांगितलं, मॅरेथॉन वैगरेच्या भानगडीत पडू नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या.” पण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अंथरुणात असलेला नवरा होता. आणि त्या त्यांच्यासाठी धावल्याच. (Top Stories)

=============

हे देखील वाचा : Sourav Ganguly : ‘हा’ कलाकार साकारणार सौरव गांगुलीची भूमिका

=============

मळकट नऊवारी साडीत, अनवाणी पायांनी, ६५ वर्षांच्या लता करे ३ किमी धावल्या आणि मॅरेथॉन जिंकल्या सुद्धा. या मॅरेथॉनमुळे त्यांची गोष्ट संपूर्ण देशात पोहोचली. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. पण गोष्ट इथेच संपली नाही. लता करे यांनी त्यानंतर अनेक मॅरेथॉन धावल्या आणि जिंकल्या. त्यानंतर एका तेलगू चित्रपट दिग्दर्शकाने त्यांच्या संघर्षावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. खास गोष्ट म्हणजे, त्या चित्रपटात लता करेंची भूमिका निभावणार होत्या खुद्द लता करेच! या चित्रपटात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने काम केलं. या चित्रपटासाठी त्यांना २०२० मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.(Lata Kare)

त्यामुळे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हल्लीच्या मुलं मुलींसाठी प्रेम म्हणजे नक्की काय असत ते कसं असावं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता करे ! त्यांचं प्रेम वेगळंच होतं. त्या धावल्या आपल्या नवऱ्यासाठी, त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि संघर्षासाठी. त्यांनी दाखवलं की एक स्त्री कितीही संकटात असली तरी ती आपल्या नात्यासाठी आपल्या माणसांसाठी काहीही करू शकते !

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.