Home » सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादेत असावे

सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादेत असावे

by Correspondent
0 comment
Share

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा वर्षी साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे ज्यावर मुंबईतील सर्वच मंडळांचे एकमत झाले आहे. तसेच जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव साजरा करण्यात यावा असे देखील त्यांनी नमूद केले आहे. यावर्षी आपल्या बाप्पाची मूर्ती किती उंचीची असावी? उत्सव कसा साजरा करावा? असे अनेक प्रश्न मंडळांना होते. यावरच महाराष्ट्र राज्य सरकारने एक परिपत्रक काढत या वर्षीच्या गणेशोत्सव संदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यावर्षी सार्वजनिक मंडळांची बाप्पाची मूर्ती ४ फुटांपर्यंत मर्यादित असावी तर घरगुती मूर्ती ही २ फुटांपर्यंत मर्यादित असावी. तसेच या वर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबवावे असे नमूद करण्यात आले आहे.

उत्सवांचा राजा म्हणजेच आपला आवडता सण अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यंदा सर्वच साणांवर कोरोनाचा विघ्न समोर आहे. मात्र विघ्नहर्ताचा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा कंबर कसली आहे. या वर्षासाठी शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

नेमक्या काय आहेत या सूचना
.सार्वजनिक मंडळांना शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील
.मंडळाच्या बाप्पाची मूर्ती ४ फुटांपर्यंत तर घरगुती मूर्ती २ फुटांपर्यंत मर्यादित असावी
.मूर्ती पर्यावरण पूरक असल्यास शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे. शक्य नसल्यास कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करावे.
.सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम हाती घ्यावे.
.आरती भजन कीर्तन करत असताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी
.बाप्पाचे दर्शन ऑनलाइन, केबल, वेबसाईट या सारख्या विविध मार्गाने उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.
.विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबवावे असे नमूद करण्यात आले आहे.
८. मंडपाचे दिवसातून ३ वेळा निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावा.

. या वर्षी मंडपात हार, फुल प्रसाद वाटप, इत्यादी वर प्रतिबंध असणार आहे. तर या मुळे कमीत कमी निर्माल्य होणार याची दक्षता घ्यावी.
१०. आगमन व विसर्जन मध्ये मंडळाचे १० पेक्षा जास्त लोक नसावे व कोंतूनही प्रकारची मिरवणूक काढू नये.
तसेच अशी कोणती ही कृती जेणे करून कोरोनाचा फैलाव होणार असल्यास संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेले अनेक दिवस पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, महानगर पालिका अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. या वर्षी सरक


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.