रुग्णवाहिका काही वेळेस एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्याच्या प्रक्रियेत फार मोठा वाटा उचलतात. वेळेला रुग्णवाहिका उपलब्ध झाली तर वैद्यकिय उपचार होऊ शकतात. पण त्यासाठीच जर उशिर झाला तर वेळेअभावी मृत्यू सुद्धा झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आल्या आहेत. अशातच महामार्गावर बहुतांशवेळा अपघात होत असल्याच्या घटना आपण पाहतो किंवा ऐकतो ही. मात्र काही वेळेस असे होते की, रुग्णाला योग्य वेळी दवाखान्यापर्यंत पोहचणारी रुग्णवाहिका वेळेवर आलीच नाही तर ते जीवावर बेतते. याच पार्श्वभूमीवर आता जर रुग्णवाहिकेला अपघाताच्या ठिकाणी जाण्यास उशिर झाल्यास त्यांच्यावर दंड आकारला जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानुसार, रुग्णवाहिकेच्या एजेंसींना गोल्डन ऑवरच्या आतमध्ये अपघातग्रस्त रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेले नाही तर दंड ठोठावला जाणार आहे. गोल्डन ऑवर ही वेळ अपघातात दुखापत झाल्यानंतरचा कालावधी असतो. या दरम्यान अधिक संभावना असते की, तत्काळ वैद्यकिय उपचार आणि रुग्णाचा जीव वाचवणे. (Rules for Ambulance)
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने नुकत्याच नियम कठोर करण्यासाठी अशा अटींचा समावेश करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार असे म्हटले गेले आहे की, सिविल ठेकेदार किंवा एजेंसिंद्वारे तैनात करण्यात आलेल्या रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्त रुग्णाला कोणत्याही विलंबाशिवाय त्याला उपचार केंद्रापर्यंत पोहचवावे.

परिपत्रकात पुढे असे ही म्हटले आहे की, जर रुग्णवाहिकेकडून पहिल्यांदा हा नियम मोडल्यास तर १० हजारांचा दंड सुनावला जाणार आहे. दुसऱ्यांचा २५ हजारांचा आणि तिसऱ्या वेळेस १ लाखांचा दंड सुनावला जाणार आहे. एनएचएआयने असे म्हटले की, तिसऱ्यांदा नियम मोडल्यानंतर अखेरची वॉर्निंग दिली जाणार आहे. त्यानंतर जरी नियम मोडला तर थेट एजेंसी किंवा ठेकेदारा कारवाईसाठी जबाबदार असतील.
हे देखील वाचा- ऑनलाईन शॉपिंगच्या पेड रेटिंग्ससंदर्भात सरकार उचलणार मोठे पाऊल
आदेशात असे म्हटले आहे की, राजमार्ग प्राधिकरण परियोजना निर्देशक किंवा त्या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सिफारशीच्या आधारावर कंपन्यांना रुग्णवाहिकांच्या तैनातीवर सहा महिन्यापर्यंत बंदी घातली जाऊ शकते. एनएचआयने असे ही म्हटले की, जिल्हा आरोग्य विभागाद्वारे घटना प्रबंधन प्रणाली क्षमतेचे आकलन करण्यासाठी रुग्णवाहिका आणि त्यामधील कर्मचाऱ्यांसाठी ऑडिट करुन घ्यावे.(Rules for Ambulance)
या व्यतिरिक्त ट्राफिक जाममध्ये आपण रुग्णवाहिका बराच वेळ अकडून पडल्याचे पाहतो. अशावेळी जर रुग्णवाहिकांना एका बाजूने जाण्यासाठी जागा करुन दिली पाहिजे. त्यामुळे आपत्कालीन वाहनांना गर्दीमधून मार्ग काढून न दिल्यास तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई ही केली जात आहे. या गोष्टीला गुन्हा असे सुद्धा मानले जाते.
