Home » आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित

आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित

by Correspondent
0 comment
Share

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि बंधू सुरेश पाटील या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सुदैवाने आबांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या पलुस कडेगाव मतदारसंघातील आमदार सुमन पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

सुरेश पाटील आणि रोहित पाटील या दोघांचे अहवाल गुरुवारी दुपारी मिळाले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. आमदार सुमनताई पाटील यांचीही स्वॅब तपासणी केली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

तासगावमध्ये बुधवारी झालेल्या कोव्हिड उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात रोहित पाटील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटीलही हजर होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. इस्लामपूरमध्ये आधीच जनता कर्फ्यू लावला असताना पाठोपाठ जिल्ह्यातील पलुस नगरपरिषदेनेही पाच दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर काही जणांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.

मार्चपासून ऑगस्टपर्यंत रुग्णालयातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती, ऑगस्टमध्ये काही सहयोगी प्राध्यापक, निवासी डॉक्टर  आणि परिचारिकांना करोनाची लागण झाली होती, आता मात्र तब्बल 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.