‘लग्न’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि संस्मरणीय असा दिवस. प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपले लग्न सर्वात सुंदर आणि आपल्याला अपेक्षित असे व्हावे. कायमच सर्वांना लक्षात राहील असे लग्न करण्यासाठी अनेक लोकं तसूभरही कमी ठेवत नाहीत. शक्य तितके प्रयत्न करून लग्न सर्वांनाच आठवेल, असे धुमधडाक्यात केले जाते.
मधल्या काळापासून दाक्षिणात्य कलाकारांनी तुफान लोकप्रियता मिळवत अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि गाजत असणाऱ्या आरआरआर सिनेमामुळे अजून एक साऊथ स्टार चांगलाच चर्चेत आला आहे आणि तो म्हणजे नंदमूरी तारक रामा राव उर्फ ज्युनिअर एनटीआर (Junior NTR).
ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अमाप लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले असून, त्याचे ‘फॅन फॉलोविंग’ भरपूर आहेत. आज या लेखातून आपण ज्युनिअर एनटीआरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) हा लहानपणापासूनच चित्रपटांच्या वातावरणात मोठा झाला. ज्युनिअर एनटीआरचे वडील एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकीय नेते होते. ज्युनिअर एनटीआरचे आजोबा रामाराव तर लोकांसाठी देवासमान होते. लोकं त्यांची पूजा देखील करायचे. ते एक मोठे समाज सुधारक होते. त्यांनीच तेलगू देशम पक्षाची स्थापना केली.
सुमारे ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दिसलेले रामाराव राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. अतिशय दिग्गज लोकांच्या सानिध्यात मोठ्या झालेल्या ज्युनिअर एनटीआरने देखील अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याला या क्षेत्रात अतिशय मोठे यश मिळाले.
जुनियर एनटीआरचे (Junior NTR) नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. मात्र या सर्व अफवांना पूर्णविराम देत त्याने २०११ साली व्यावसायिक श्रीनिवास राव यांच्या मुलीशी लक्ष्मी प्रनथीशी लग्न केले. त्यांचे लग्न हा त्यावर्षीचा अतिशय मोठया आणि चर्चेचा विषय होता.
अतिशय भव्य आणि आलिशान असे लग्न म्हणून ज्युनिअर एनटीआर आणि प्रनथी यांचे लग्न ओळखले जाते. या लग्नाला जवळपास १५ हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. संपूर्ण देशातील उद्योगपती, राजकीय नेते, कलाकार आदी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित होते.
तब्बल १० लाख लोकं या लग्नात केवळ या जोडप्याला बघण्यासाठी हजर होते. यावरूनच या लग्नाची लोकांमधील क्रेझ किती होती याचा अंदाज आपल्याला येईल. या लोकांसाठी राज्य सरकारने अनेक ज्यादा ट्रेनदेखील चालवल्या होत्या.
एका माहितीनुसार, जुनियर एनटीआरच्या लग्नात तब्ब्ल १०० कोटींपेक्षा अधिक खर्च केला गेला होता. लग्नात अगदी लहानमोठ्या सर्वच गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसे खर्च केला गेला. १ कोटींची तर प्रनथीची साडीच होती. मंडप सजवण्यासाठी १८ कोटी खर्च केले गेले होते.
====
हे देखील वाचा – शाहरुख खानने आजपासून राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात
====
ज्युनिअर एनटीआरचे (Junior NTR) लग्न तर एका प्रादेशिक चॅनेलवरून लाईव्ह दाखवण्यात आले होते. या लग्नात दिग्गज लोकांसोबतच जुनियर एनटीआरच्या १२ हजार फॅन्सला देखील बोलवण्यात आले होते. जुनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनथी ही प्रसिद्ध उद्योजक असणाऱ्या श्रीनिवास राव यांची मुलगी असून ती तेलगू न्यूज चॅनेल ‘स्टुडिओ एन’ची मालकीण देखील आहे. ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी प्रनथी यांच्यामध्ये १० वर्षांचे अंतर असून त्या दोघांना दोन मुलं आहेत.