जगभरात प्रसिद्ध असलेला कोहिनूर (Kohinoor) हिरा भारताचाच आहे, यावर आता खुद्द ब्रिटीश राजघराण्यानं कबुली दिली आहे. महाराजा दिलीप सिंग यांच्याकडे असलेला हा कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीनं घेतला होता. ब्रिटीश राजवटीमध्ये अशी अनेक रत्न आणि सोनं ब्रिटीश जबरदस्तीनं आपल्या देशात घेऊन आले. मात्र कोहिनूर हिरा ब्रिटीशांनी नेल्यापासून तो परत मिळावा यासाठी भारतातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. कोहिनूरला (Kohinoor) महाराजा दिलीप सिंग यांनी आपल्याला भेट दिल्याचे सांगत ब्रिटीश राजघराण्याकडून या गोष्टीला कायम विरोध करण्यात आला आहे. मात्र आता त्याच ब्रिटनकडून कोहिनूर भारताचाच असल्याचे मान्य केले आहेच. शिवाय कोहिनूर हिरा, ईस्ट इंडिया कंपनीने जबरदस्तीनं ब्रिटनमध्ये आणल्याचे मान्य केले आहे. कोहिनूर (Kohinoor) हा 105 कॅरेटचा म्हणजेच 21.6 ग्रॅमचा हिरा आहे. हा हिरा जगातील मोठा हिरा असून कोहिनूर भारतातील गोलकोंडाच्या खाणीतून काढण्यात आला आहे. कोहिनूर ब्रिटीशांकडे गेल्यावर राणी व्हिक्टोरियाला भेट देण्यात आला. आणि राणी व्हिक्टोरियानं कोहिनूरला आपल्या मुकूटात घालून त्याच्यावर ब्रिटनचा शिक्काच मारला. गेल्या काही वर्षापासून कोहिनूर भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता ब्रिटनच्या या कबुलीनंतर या प्रयत्नांना अधिक यश येईल अशी आशा आहे.

ईस्ट इंडिया कंपनीने भारताकडून कोहिनूर ( Kohinoor)हिरा जबरदस्तीनं घेतल्याचे ब्रिटनच्या राजघराण्याने मान्य केले आहे. महाराजा दिलीप सिंह यांना कोहिनूर हिरा देण्यास भाग पाडण्यात आले. लाहोर करारानुसार कोहिनूर देण्याची अट दिलीप सिंग यांच्यासमोर ठेवण्यात आल्याची पुष्ठीही राजघराण्यानं दिली आहे. ही माहिती बकिंगहॅम पॅलेसच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या प्रदर्शनात दिली गेली आहे. टॉवर ऑफ लंडनच्या प्रदर्शनात कोहिनूरसह अनेक मौल्यवान हिरे ठेवण्यात आले आहेत. इस्ट इंडिया कंपनीनं भारतातून आणलेल्या हि-यांची संख्या त्यात जास्त आहे. येथे कोहिनूरचा (Kohinoor) इतिहासही अनेक व्हिडिओ आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितला जात आहे.
क्राऊन ज्वेल्स प्रदर्शनात कोहिनूरवरील (Kohinoor) चित्रपटही दाखवण्यात आला आहे. यामध्ये त्याचा संपूर्ण इतिहास ग्राफिक नकाशाद्वारे दाखवण्यात आला. त्यात कोहिनूर हिरा भारताच्या गोलकोंडाच्या खाणीतून काढल्याचा आल्याचे सांगितले आहे. यानंतर महाराजा दिलीप सिंग एका छायाचित्रात हा हिरा ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवताना दाखवण्यात आले आहे. यानंतर कोहिनूर (Kohinoor) थेट ब्रिटनच्या राणीच्या मुकुटात दिसत आहे. कोहिनूर जडलेला मुकुट प्रथम ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांनी परिधान केला होता. त्यानंतर हा मुकुट राणी एलिझाबेथ यांना देण्यात आला. कोहिनूर (Kohinoor)व्यतिरिक्त, राणीचा मुकुट अनेक मौल्यवान रत्नांनी सजवलेला आहे. यामध्ये आफ्रिकेचा ग्रेट स्टार याचाही समावेश आहे. ग्रेट स्टा र हा आफ्रिकेचा सर्वात मौल्यवान हिरा आहे. त्याची किंमत सुमारे $400 दशलक्ष एवढी आहे. भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर हिऱ्यावर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे. तसेच आफ्रिकेकडूनची त्यांच्या ग्रेट स्टारची मागणी करण्यात येत आहे.
=======
हे देखील वाचा : पेप्सी आणि कोकचे उत्पादन काही दिवसांनी थांबण्याची शक्यता?
=======
कोहिनूरसह (Kohinoor) भारतातील अनेक मौल्यवान वस्तू आणि हिरे आणि दागिने परत आणण्यासाठी सरकार, ब्रिटनमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. संसदेच्या स्थायी समितीनेही आपल्या अहवालात याचा उल्लेख केला आहे. कोहिनूर (Kohinoor) हिऱ्याचा इतिहास वादांनी भरलेला आहे. 1849 मध्ये ब्रिटिशांनी पंजाबवर ताबा मिळवला तेव्हा हा हिराही ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. हिरा राणी व्हिक्टोरियाला भेट देण्यात आला. आता भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इराणनेही या हिऱ्यावर दावा केला आहे. इतर अनेक प्रसिद्ध रत्नांप्रमाणे, कोहिनूरबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. काही ठिकाणी कोहिनूर (Kohinoor) हिरा सुमारे 5000 वर्षांपूर्वी सापडल्याचे सांगण्यात येते. प्राचीन संस्कृत ग्रंथात या हि-याचे नाव स्यमंतक रत्न म्हणून असल्याचेही सांगण्यात येते. जगातला सर्वात मोठा हिरा असलेला हा हिरा आता ब्रिटनच्या ताब्यात आहे. तो भारताचा असल्याचे ब्रिटननं मान्य केलं तरी कोहिनूरला भारतात आणणे सोप्पे नाही. कारण इस्ट इंडिया कंपनीनं भारतातील अनेक अमूल्य वस्तू ब्रिटनमध्ये नेल्या आहेत. त्या अमुल्य वस्तूंनी ब्रिटनमधील संग्रालये सजली आहेत. एक कोहिनूर जर भारताला परत दिला तर त्या अन्य वस्तूही भारताला द्याव्या लागतील याची जाणीव ब्रिटनला आहे. त्यामुळेच कोहिनूर भारतात आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.