Home » ब्रिटेन मधील शाही परिवारातील ही परंपरा बंद होणार ?

ब्रिटेन मधील शाही परिवारातील ही परंपरा बंद होणार ?

by Team Gajawaja
0 comment
Royal Family
Share

ब्रिटेन मधील शाही परिवार आपली एक जुनी ऐतिहासिक परंपरा सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही परंपरा अशी आहे की, ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. खरंतर प्रिंस विल्यियम शाही परिवारातील पुरुषांसंदर्भातील एक परंपरा सोडण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की,किंग चार्ल्स यांचा सर्वात लहान मुलगा आतापर्यंत टार्टनमध्ये दिसला नाही. टार्टन हा एक प्रकारचा कपड्यांचा पॅटर्न आहे. या पॅटर्सनमधून शाही परिवारासाठी पोषख तयार केला जातो.त्याला Kilts असे म्हटले जाते. (Royal family)

असे म्हटले जातेय की, सध्या राजघराण्याचे स्कॉटलंडसह घनिष्ठ संबंध आहेत आणि ते वर्षातील काही महिने बाल्मोरल कॅसलमध्ये घालवतात. येथे अशी परंपरा होती की, रॉयल परिवारातील पुरुष स्कॉटलंडच्या बाहेर फिरताना तो पोशाख घालताना दिसून येतात. सामान्य कपडे किंवा सूट बुटात दिसत नाहीत. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच किंग चार्ल्स किन्नील हाउस येथे आले होते. त्यांना पारंपरिक रुपात स्कॉटिश पोशाखात पाहिले गेले होते. ज्यांना औपचारिक रुपात सम्राटच्या रुपात मान्यता दिली गेली होती.

Royal Family
Royal Family

खास गोष्ट अशी की, किंग चार्ल्स हे आपले वडिल प्रिंस फिलिप यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात. त्यांना बहुतांशवेळेस त्या विशिष्ट पोशाखात पाहिले गेले आहे. याचे फोटो सुद्धा ब्रिटेनच्या जनतेने पाहिले आहेत. मात्र प्रिंस विल्यियम आणि त्यांचा लहान भाऊ प्रिंस हॅरी हे तरुण्यात आल्यानंतर त्यांना सुद्धा त्या विशिष्ट पोशाखात पाहिले गेले नाही. त्यामुळेच ते जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

सेंट अँड्रयुज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रिंस विल्यियम यांचे स्कॉटलंडसोबत फार घनिष्ठ संबंध आहेत. येथे त्यांना त्यांची पत्नी केट मिडलटन भेटली होती. आपल्या ग्रॅज्युएशन सेरेमनी मध्ये प्रिंस ऑफ वेल्सने ग्रॅज्युएशन गाउनसह काळ्या रंगाचा सूट आणि सफेद बो टाय निवडली होती. यावेळी सुद्धा त्यांना त्या विशिष्ट कपड्यांमध्ये पाहिले गेले नाही. (Royal family)

हेही वाचा- पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला तुरुंगवास होणार…

प्रिंसने कधीच याचा खुलासा केला नाही की, ते टार्टनमध्ये का दिसले नाही. त्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, जेव्हा आपल्या वडिलांचे उत्तराधिकारी होतील म्हणजेच किंग होतील तेव्हा ही परंपरा बंद होईल. परिवारातील सर्वाधिक ओळख असणारा टार्टन स्वीटर्ट रॉयल असून ज्याचे मूळ स्टीवर्ट हाउस आहे. टार्टन कापड केवळ शाही परिवारासाठी असतो. त्यामुळे तो सामान्य व्यक्ती परिधान करू शकत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.