Home » UK Poverty Crisis : राजाचा देश गरीब होतोय

UK Poverty Crisis : राजाचा देश गरीब होतोय

by Team Gajawaja
0 comment
Share

ब्रिटन या देशाचे नाव घेतले की समोर येते ते तेथील राजघराणे. एकेकाळी ब्रिटनच्या राजघराण्यानं अवघ्या जगावर राज्य केलं. राजघराण्याच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळत नाही, असे अभिमानानं सांगितलं जायचं. ब्रिटनमध्ये राजघराण्याची मिळकत आत्ताही खूप मोठी आहे. जगातील बहुधा सर्वाधिक ऐतिहासिक किल्ले आणि राजवाडे हे ब्रिटनमध्येच आढळतात. जवळपास ४,००० हून अधिक राजवाडे या देशात असून यामध्ये बकिंगहॅम पॅलेस, विंडसर कॅसल आणि स्कॉटलंडमधील अनेक प्रसिद्ध किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व वैभवानं ब्रिटनची ओळख आजही कायम आहे. ( UK Poverty Crisis )

येथील राजघराण्यातील एका व्यक्तीची झलक बघण्यासाठी तेथील काय पण अन्य देशातील नागरिकही उत्सुक असतात. हे राजघराणे आजच्या काळताही तेवढ्याच ऐशोआरामात रहात आहे. त्यांच्यासाठी मोठे किल्ले आणि राजवाडे यांची कायम डागडुजी करण्यात येते. मात्र ब्रिटनच्या सर्वसामान्य जनतेची अवस्था याहून मोठी वेगळी आहे. कारण सध्या ब्रिटनच्या जनतेकडे रहाण्यासठी योग्य जागा नाही, की खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. ब्रिटनमधील दहापैकी एक व्यक्ती अत्यंत गरिबीत जगत असून गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक गरीबी ब्रिटनमध्ये असल्याचा एका अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात ब्रिटनमधील गरीबीचा स्तर दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे.

राजा-राणीचा देश म्हणून ब्रिटनला ओळखले जाते. जगभरातील राजघराण्यांची सत्ता संपली आहे. ब्रिटनमध्येही लोकमतानं आलेले सरकार आहे. मात्र आजही या देशात राजघराण्यातील व्यक्तींना तेवढाच मान दिला जातो. येथील राणी किंवा राजाला सर्वोच्च स्थान दिले जाते. या राजघराण्यातील सदस्य हे आजही भल्यामोठ्या राजवाड्यात रहात आहेत. या राजघराण्यात त्यांच्या परंपरा जोपासण्यासाठी करोडो खर्च केले जात आहेत. पण याच ब्रिटनमधील जनतेची आर्थिक पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचा एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार ब्रिटन हा पुढच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक गरीबांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. ( UK Poverty Crisis )

या अहवालानुसार गेल्या३० वर्षांत ब्रिटनमध्ये ऊर्जा किंमतीच्या संकटामुळे गरिबीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. जोसेफ राउनट्री फाउंडेशन यांनी यासंदर्भात संशोधन केले आणि एक अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. यातून ब्रिटनच्या राजवाड्यामागे लपलेल्या वास्तव जीवनाचे दारुण चित्र उघड झाले आहे. या अहवालानुसार, ब्रिटनमधील ६.८ दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत जगत आहेत. ब्रिनटनच्या एकूण लोकसंख्येचा अंदाज घेतला तर येथील दहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती गरीब आहे. त्यातही गंभीर म्हणजे, पुढच्या काही महिन्यात हे प्रमाण दुप्पटीनं वाढणार आहे.

=======

हे देखील वाचा : Gutka in London : अशी झालीय लंडनची दैना !

=======

जोसेफ राउनट्री फाउंडेशनने दिलेल्या अहवालमध्ये कुठली कुटुंब अधिक गरीबीमध्ये आहेत, याचे विश्लेषण केले आहे. अनेक कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे त्यांच्या नित्याच्या गरजा भागवण्यासाठीही पुरेसे पडत नाही. घरभाडे आणि इतर घरखर्च भागवण्यासाठी अशा कुटुंबाना मोठी तारांबळ करावी लागत आहे. त्यातही ज्यांच्या घरात दोन मुलं किंवा त्याहून अधिक मुलं आहेत, त्यांची परिस्थिती अधिक दारुण झालेली आहे. याचा परिणाम म्हणून १९९४-९५ मध्ये २४% असलेला दारिद्र्य दर आता २०२३-२४ मध्ये २१% पर्यंत घसरला आहे. दारिद्र्याची पातळी ८% वरून १०% पर्यंत वाढली आहे. यावरुन गरिबीत राहणाऱ्यांपैकी जवळजवळ निम्मे लोक आता अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत असल्याचे उघड झाले आहे. ( UK Poverty Crisis )

यासर्वात अहवालात ब्रिटनमधील लहान मुलांबाबत जे विश्लेषण केले आहे, त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ब्रिटनमध्ये सध्या अंदाजे ४.५ दशलक्ष मुले गरिबीत राहत आहेत. सलग तिस-या वर्षी या आकडेवारीमध्ये वाढ झाली आहे आणि पुढच्या वर्षात त्यात दुप्पटीनं वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सोबतच गरिबीचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांसह अपंग व्यक्तींवरही होत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. यातील काही कुटुंबाना सरकार पेंशन स्वरुपात मदत करते. कमी उत्पन्न मोजण्यासाठी सरकार दोन मुख्य पद्धती वापरते. घरांच्या खर्चाचा हिशेब केल्यानंतर कुटुंबाकडे खर्च करण्यासाठी उपलब्ध असलेली रक्कम ही उत्पन्न मोजली जाते. पण आता आलेली नवीन आकडेवारी पाहता ही पेंशनही पुरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच सरकारनं राजघराण्यावरील खर्च थांबवून गरीबीमध्ये रहाणा-या कुटुंबाना अधिक मदत करावी अशी मागणी आता होत आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.