प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय गोड आणि नाजूक भावना म्हणजे ‘प्रेम’. सगळ्यांच्याच आयुष्यात प्रेम असते. हेच प्रेम व्यक्त करणे देखील खूपच आवश्यक असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाइन डे. या व्हॅलेंटाइन डेची सुरुवात होते ती ‘रोझ डे’ पासून. दरवर्षी ७ फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाइन वीक म्हणून ओळखला जातो. या वीकचा शेवटचा दिवस हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा होतो. ७ फेब्रुवारीला आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन मनातील प्रेम व्यक्त केले जाते. गुलाब देऊन प्रेम व्यक्त करण्याचा अतिशय सोपा मात्र असरदार मार्ग आहे. मात्र व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात रोझ डे नेच का केली जाते? चला जाणून घेऊया. (Valentine Week)
एक गुलाब आपल्या मनातील सर्वच भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचवते. त्यामुळे ज्यांना मनातील भावना व्यक्त करणे अवघड होऊन बसते अशा लोकांनी बिनधास्त गुलाब देऊन प्रेम दाखवण्याचा मार्ग निवडावा. आता व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात रोझ डे ने का होते याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. यातलीच एक अतिशय चर्चित कथा म्हणजे, बेगम नूरजहाँची. मुघल काळापासून रोज डे साजरा केला जात होता. याविषयी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती वाचायला मिळेल. असे सांगितले जाते की, मुघल बेगम नूरजहांक यांना लाल रंगाची गुलाब खूप जास्त आवडायची. त्यामुळे त्यांचे पती त्यांच्या बेगमला खुश करण्यासाठी दररोज एक टन गुलाबाची फुले पाठवत होते. यामुळे नूरजहाँ खूप जास्त खुश झाल्या होत्या. (Todays Marathi Headline)

याशिवाय, १९ व्या शतकात महाराणी व्हिक्टोरियाच्या काळात ब्रिटनमध्ये अनेक सांस्कृतिक बदल करण्यात आले. या काळात फुलांचे महत्त्व पटवून देण्यात आले होते. सांस्कृतिक बदलातील हा एक महत्त्वाचा बदल म्हटला जातो. त्यावेळी उघडपणे प्रेम व्यक्त केले जायचे नाही. पण, फुलांचे महत्त्व पटवून दिल्यानंतर प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर होऊ लागला. राणी व्हिक्टोरियाला गुलाब आवडायचे आणि तिचे पती प्रिन्स अल्बर्ट तिला गुलाब द्यायचे. त्या दोघांची प्रेमकहाणी पाहून त्या काळात गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. ही परंपरा हळहळू इतकी लोकप्रिय झाली की, फुलांच्या माध्यामातून प्रेम व्यक्त होऊ लागले. यानंतर ही परंपरा संपूर्ण जगभर पसरली आणि अशा पद्धतीने व्हॅलेंटाइन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे साजरा होऊ लागला. (Latest Marathi HEadline)
इतकेच नाही तर गुलाबाची उत्पत्ती ही प्रेम, सुपीकता आणि उत्कटतेची ग्रीक देवी असलेल्या अफ्रोडाइटच्या काळापासून होते. पाश्चिमात्य संस्कृतीत असे मानले जाते की लाल गुलाबाची निर्मिती अॅफ्रोडाइटने केली होती. हे फूल अफ्रोडाइटच्या अश्रूंनी आणि तिचा नश्वर प्रियकर अडोनिसच्या रक्ताने सिंचित झालेल्या जमिनीतून उगवले असल्याचे मानले जाते. गुलाब भेट देण्याची प्रथा शतकानुशतके चालत आली आहे, हे फूल पिढ्यानपिढ्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मानले जाते. या दिवशी गुलाब देण्याचा इतिहास प्राचीन संस्कृतींशी जोडलेला आहे, जिथे गुलाबामध्ये जादुई आणि दैवी शक्ती असल्याचे मानले जात होते. (Top Stories)
========
Valentine Day : उद्यापासून सुरु होतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’
========
शिवाय रोमन पौराणिक कथांमध्ये गुलाबाचा संबंध प्रेमाची देवी शुक्राशी जोडला गेला होता आणि तिला पवित्र मानले जात होते. आशिया आणि अरब जगतासारख्या अनेक पौर्वात्य संस्कृतींमध्ये प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब शतकानुशतके जोपासला जात आहे. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा स्वतःचा अर्थ असतो, ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या प्रियजनांबद्दल वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
