हिवाळ्याच्या दिवसात गिझर आणि हिटर या दोन्ही वस्तूंचा वापर अधिक केला जातो. काही लोक संपूर्ण दिवस हिटर सुरू ठेवतात. पण तुम्हाला माहितेय का, हिटरमुळे जरी शरीराला उष्णता मिळत असली तरीही यामुळे तुमचा जीव देखील जाऊ शकतो. अशातच रूम हिटरच्या भरोशावर शरीराला उष्णता मिळेल असा विचार करत असाल्यास थांबा. रूम हिटरच्या वापरामुळे कोणते धोके निर्माण होऊ शकतात आणि कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.. (Room Heater Use)
अधिक वेळ चालवणे पडेल भारी
रूम हिटरमधून कार्बेन मोनोऑक्साइड गॅस निघतो. याचा सतत वापर करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे मर्यादेत रूम हिटरचा वापर करावा. खोलीचे तापमान व्यवस्थितीत झाल्यानंतर रूम हिटर बंद करून ठेवावा. रूम हिटरचा अधिक वापर केल्यास आरोग्यालाही नुकसान पोहोचले जाते.

Room Heater Use
रूम हिटरमुळे होणारे नुकसान
-आग लागण्याचा धोका
रूम हिटरमुळे आग लागण्याचा धोका उद्भवू शकतो. रूम हिटर व्यवस्थितीत काम करत नसल्यास आणि व्यवस्थितीत ठेवल नाही तर आग लागू शकते.
-धुर निघण्याची शक्यता
रूम हिटर बंद खोलीत सुरू ठेवल्यास त्यामधून धुरू निघू शकतो. रूम हिटरमध्ये थोडीशी जरी गडबड असल्यास धूर निघू शकतो. यामुळे श्वास घेण्यास समस्या अथवा व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
-खोलीतील ओलरपणा कमी होतो
रूम हिटर वापरल्याने खोलीतील ओलसरपणा कमी होऊ शकतो. खरंतर रूम हिटर ओलसरपणा शोषून घेतात. यामुळे तुमची त्वचा कोरडी, खाज येणे अथवा लालसरही होऊ शकते.
-अॅलर्जी
रूम हिटरमधून निघणाऱ्या धुरामुळे अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. हिटरच्या धुरात अॅलर्जी तयार करणारे कण असू शकतात. यामुळे अस्थमा, अॅलर्जी आणि श्वसनासंबंधित समस्या होऊ शकतात. (Room Heater Use)
या गोष्टीची काळजी घ्या
ज्यावेळी रूम हिटरचा वापर करत असाल तेव्हा घरातील खोली कधीच बंद करून ठेवू नका. रूम हिटर लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. याशिवाय रूम हिटर वेळोवेळी स्वच्छ करण्याशिवाय तो सुरू ठेवून झोपू नका.
हेही वाचा: वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुवावेत का?