Home » एकेकाळी टुथब्रश बनवणारा ‘हा’ दिग्दर्शक आज सिनेमावर खर्च करतो १०० कोटी

एकेकाळी टुथब्रश बनवणारा ‘हा’ दिग्दर्शक आज सिनेमावर खर्च करतो १०० कोटी

by Team Gajawaja
0 comment
ronnie screwvala
Share

बॉलिवूड सिनेमात तुम्ही अशा काही कथा पाहिल्या असतील ज्यामध्ये एक गरिब अथवा मध्यम वर्गीय व्यक्ती आपल्या मेहनीतने आयुष्यात यशाचा मार्ग गाठतो. परंतु हे केवळ सिनेमांमध्येच नव्हे तर खऱ्या आयुष्यात ही होते. प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाच्या आयुष्याची कथा थोडीफार अशीच असते. परंतु तुम्हाला इंडस्ट्री मधील अशा एका व्यक्ती बद्दल सांगणार आहोत जे एकेकाळी टुथब्रश बनवण्याची फॅक्ट्री चालवायचे. पण आज ते बॉलिवूड मधील दिग्गज सिनेमांचे निर्माते आहेत. प्रत्येक मल्टीस्टार आणि बिग बजेट असणाऱ्या सिनेमांमध्ये ते पाण्याप्रमाणे पैसा लावतात. (Ronnie Screwvala)

खरंतर ही कथा बॉलिवूड मधील फिल्म प्रोड्युसर रॉनी स्क्रूवाला यांची आहे. ज्यांनी UTV मोशन पिक्चर्सची स्थापना केली. या मीडिया समूहाअंतर्गत जोधा अकबर, रंग दे बसंती, उरी द सर्जिकल स्ट्राइकसह काही सुपरहिट सिनेमांनी देशात विदेशात बक्कळ कमाई केली.

रोहिंटन सोली स्क्रुवालाच्या रुपा जन्मलेले फिल्म निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी १९८० च्या दशकातीच्या सुरुवाीला भारतात केबल टेलिविजची सुरुवात केली आणि १९९० मध्ये मनोरंजन समूह UTV ची स्थापना केली. रॉनी स्क्रुवाला यांची ओळख एक यशस्वी फिल्म प्रोड्युसरच्या रुपात आहेच. पण मनोरंजनाशिवाय काही कंपन्यांचे ते फाउंडर सुद्धा आहेत.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला रॉनी यांनी लेजर ब्रशची स्थापना केली होती, जी पुढे जाऊन देशातील सर्वाधिक मोठी टुथब्रश तयार करणारी कंपनी बनली. त्यानंतर १९८ मध्ये त्यांनी नेटवर्क नावाची एक केबल टेलिविजन सेवा सुरु केली. परंतु स्क्रुवाला यांच्या व्यावसियिक करियरमध्ये हा महत्वपूर्ण टप्पा होता. १९९० मध्ये त्यांनी केवळ ३७,५०० रुपयात टीव्ही प्रोडक्शन कंपनीच्या रुपात युटीवीची सुरुवात केली होती. आजच्या तारखेला युटीवी मोशन पिक्चर्स देशातील महत्वाच्या मीडिया समूहापैकी एक आहे. (Ronnie Screwvala)

हेही वाचा- मराठी चित्रपटसृष्टीत बनलेला ‘हा’ सर्वोत्तम राजकीय सिनेमा.

परंतु २०१२ मध्ये ग्लोबल एंटरनेटमेंट कंपनी वॉल्ट डिन्जीने युटीवीला $454 मिलियनमध्ये खरेदी करत त्याला Disney UTV मध्ये बदलले. रॉनी स्क्रुवाला यांन आपली संपूर्ण २३ टक्के हिस्सेदारी विकली आणि दोन वर्षानंतर २०१४ मध्ये कंपनी सोडली. तर ब्रँन्ड युटीवी २०२२ मध्ये बंद झाले. सध्या स्क्रुवाला हे एक अॅडटेक कंपनी अपग्रेडचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ज्याची किंमत २.२५ बिलियन डॉलर आहे. तसेच एखा खासगी इक्विटी फर्म युनीलेजर वेंचर्स ही चालवतात. ज्याच्या माध्यमातून ते काही स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.