प्रसिद्ध फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या संपूर्ण जगात चर्चेत आहे. यामागील कारण असे की, त्याने सौदी अरबचा फुलबॉल क्लब अल नस्त्र मध्ये एन्ट्री केली आहे. खरंतर त्याने ब्रिटेनच्या मॅनचेस्टर युनाइटेड क्लबला रामराम करत आता येथे प्रवेश केला आहे. यामुळेच आता त्याच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, खुप विरोध केल्यानंतर तो अधिकृतपणे सौदी क्लबमध्ये सहभागी झाला आहे. (Ronaldo Girlfriend)
आपल्या गर्लफ्रेंडसोबत पोहचला सौदीला
रोनाल्डो आपली गर्लफ्रेंन्ड जॉर्जिनासोबत सौदीत आला आहे. तेथे जॉर्जिना आणि आपल्या मुलांसोबत राहणार आहे. खरंतर आपल्या गर्लफ्रेंन्ड बद्दल चर्चेत राहणारा रोनाल्डो २०१६ पासून जॉर्जिना सोबत आहे. दरम्यान, आता असा पेच निर्माण झाला आहे की सौदी अरबमध्ये लग्नाशिवाय तो कशा पद्धतीने राहू शकतो? खरंतर इस्लामिक देशात आपले काही कायदे आहेत. त्यानुसार त्यांना लग्नाशिवाय राहण्यासाठी काही समस्या येऊ शकते. अशातच जाणून घेऊयात जॉर्जिना रोड्रिग्स नक्की कोण आहे त्याबद्दल अधिक.
कोण आहे जॉर्जिना रोड्रिग्स
जॉर्जिना ही रोनाल्डो याची प्रेयसी आहे. हे दोघे एकमेकांसोबत २०१६ पासून असून त्यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होत राहते. जॉर्जनि रोड्रिग्स सध्या एक मॉडेल आहे. त्याचसोबत ती एक स्पॅनिश डांन्सर ही आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो याची प्रेयसी झाल्यानंतर ती खुप चर्चेत आली.
जॉर्जिनाची आई स्पॅनिश आणि वडिल अर्जेंटीनातील होते. जॉर्जिना आपली बहिण इवानासह उत्तर पूर्व स्पेनचे एक शहर जॅका आणि ह्सुस्का प्रांतात वाढल्या आणि शिकल्या. आपल्या करियरच्या सुरुवातीला तिने बॅली डांन्सरच्या रुपात काम केले. त्यानंतर सेल्स असिस्टंटचे काम सुरु केले. मास्सिमो दुतीसह सेल्सचे काम सुरु केल्यानंतर तिने गुच्ची मध्ये काम केले आणि तिचे आयुष्यच बदलले. सेल्सचे काम सोडून तिने कान्स फिल्म्स फेस्टिव्हल मध्ये रेड कार्पेटरवर जीन गॉल्टियर कॉउचर घातले.
जॉर्जिनाने लंडन येथून शिक्षण घेतले आणि त्यानंतर मॉडलिंगच्या करियरची सुरुवात केली. दरम्यान, रोनाल्डोला भेटल्यानंतर तिचे आयुष्य अधिकच बदलले गेले. तिने नेटफ्लिक्सवर स्वत:चा शो ‘आय एम जॉर्जिना’ सुद्धा काढला. (Ronaldo Girlfriend)
रोनाल्डो जॉर्जिना सोबत राहणार?
सौदी अरेबियात अविवाहित कपलला एकत्रित राहण्यास बंदी आहे. मात्र ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी जॉर्जिना यांना एकत्रित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सौदीच्या वकिलांनी स्पॅनिश समाचार एजेंसीला असे सांगितले की, दोघांना एकत्रित राहण्याची परवानगी दिली जाईल, कारण कायदे हे कथित रुपात कठोरपणे लागू केले जात नाहीत.
हे देखील वाचा- पेले Vs माराडोना, कोण आहे फुटबॉलचा GOAT?
सौदीच्या वकिलांनी काय म्हटले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदीच्या एका वकिलांनी आपले मतं मांडत असे म्हटले की, देशात अद्याप कायद्यानुसार अविवाहत जोडप्यांना एकत्रित राहण्यास बंदी आहे. मात्र गेल्या काही काळापासून याकडे दुर्लक्ष करण्यास अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्याचसोबत कोणावर ही खटला चालवला नाही. मात्र या कायद्याचा अशावेळी उपयोग केला जातो जेव्हा एखादी समस्या किंवा गुन्हा झालेला असतो.