Home » पिरॅमिड सारखी दिसणारी रोमनेस्को ब्रोकली….

पिरॅमिड सारखी दिसणारी रोमनेस्को ब्रोकली….

by Team Gajawaja
0 comment
Romanesco Broccoli
Share

रोमानेस्को फुलकोबी किंवा रोमनेस्को ब्रोकली (Romanesco Broccoli) हे नाव तुम्ही ऐकलं आहे का….हे एका भाजीचं नाव आहे.  तिन भाज्यांची मिश्रण असलेली ही रोमानेस्को ब्रोकली जगातली अत्यंत महागडी अशी भाजी आहे. मात्र या भाजीमध्ये पोषक तत्वेही तेवढीच असल्यामुळे ती खवय्यांमध्ये आवडती आहे.  विशेष म्हणजे ज्यांना सॅलेड आवडतात, ती मंडळी या भाजीची हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात. आतापर्यत भारताबाहेर मिळणारी ही रोमानेस्को ब्रोकली (Romanesco Broccoli)आता भारतातही उपलब्ध झाली आहे. चवीला कोबीसारखी असणारी ही भाजी जेवढी महाग असली तरी त्यामध्ये असलेल्या फायबरच्या मात्रेमुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.  

रोमानेस्को ब्रोकोली (Romanesco Broccoli) ही पिरॅमिडसारखी दिसणारी भाजी कोबीसारखीच आहे. मात्र त्यांच्या किंमतीत प्रचंड तफावत आहे.  रोमानेस्को ब्रोकोली बाजारात 2200 रुपये किलो दराने विकला जातो.  या रोमानेस्को ब्रोकोलीला डिझायनर कोबी म्हणूनही ओळखले जाते.  कारण कोबी आणि ब्रोकली यांच्यापासून या रोमानेस्को ब्रोकोलीची निर्मिती झाली आहे.  अमेरिकेमध्ये या रोमानेस्को ब्रोकोलीची (Romanesco Broccoli) निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती आहे.  आता ही पिरॅमिडसारखी ब्रोकोली, अमेरिका आणि युरोपमध्ये खवय्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये उगवलेल्या या रोमनेस्को फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-के यांची मात्रा भरपूर आहे. कॅरोटीनॉइड्स आणि फायबरच्या गुणधर्मांमुळे ही ब्रोकोली अत्यंत चढ्या दरानं विकली जाते.

अमेरिकेपाठोपाठ भारतातही परदेशी फळे आणि भाज्यांना वाढती मागणी आहे.  यापैकी काही भाज्या त्यांच्या रंगामुळे चर्चेत असतात, तर काहींच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात, त्यामुळेही त्याबद्ल उत्सुकता  असते.  एवढ्या महाग भाजीची चव कशी असेल याची उस्तुकता असते.  अशाच महाग भाजीत रोमनेस्को ब्रोकलीचे (Romanesco Broccoli) नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.  कोबी आणि ब्रोकलीपासून तयार केलेली या भाजीचा आकार पिरॅमिडसारखा आहे.  त्याचा रंग हिरवा गर्द असून त्यावर जेवढे बारीक दाणे असतात, तेवढीच ही भाजी ताजी मानली जाते, आणि मग तिची किंमत ठरवली जाते.  फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी रोमनेस्का ब्रोकलीवर अनेक वर्ष संशोधन केले आहे.  त्यांच्या संशोधनानुसार  ही भाजी नसून हे एकप्रकारचे फूल आहे.  पण या फुलाचा पूर्ण विकास होऊ शकला नाही, त्यामुळे ते भाजीसारखे दिसते.   

या ब्रोकोलीमध्ये दाणेदार फुले एकत्रितपणे वाढतात.  परंतु त्यांची वाढ होत नाही.  यावर नवीन कळ्या तयार होतात आणि एक कळी दुसऱ्याच्या वर वाढून पिरॅमिड बनते. या ब्रोकोलीबद्दल जॉर्जिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अलेक्झांडर बुच यांनीही संशोधन केले आहे.   हिरव्या ब्रोकोलीचा पिरॅमिड कसा तयार झाला? हे शोधणे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.   हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी रोमनेस्को ब्रोकोलीचे 3D मॉडेल देखील तयार केले.

=========

हे देखील वाचा : बकरी एवढी गाय तुम्ही पाहिलंय का?

=========

रोमनेस्को ब्रोकोलीची (Romanesco Broccoli) चव कोबी आणि शेंगदाणासारखीच असते. यामध्ये व्हिटॅमिन-के आणि व्हिटॅमिन-ए व्यतिरिक्त, कोबीमध्ये आहारातील फायबर आणि कॅरोटीनोइड्स आढळतात.  याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो.  त्यामुळे अमेरिकन आणि युरोपियन बाजारपेठेत या भाजीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.  वाढती मागणी बघता या रोमनेस्का ब्रोकोलीची (Romanesco Broccoli) किमंत किलोमागे 2,000 ते 2,200 रुपये एवढी असते.  अर्थात ही भाजी एवढी महाग असल्यामुळे आणि ती पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असल्यामुळे भाजीचा कुठलाही भाग टाकला जात नाही.  पिरॅमिडसारखे भाजीचे कोंब सॅलेडमध्ये टाकले जातात.  तर त्याच्या मोठ्या देठाचा वापर सूप किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी केला जातो.  या भाजीपासून तयार होणा-या रेसिपीही युरोपमधील काही मोठ्या हॉटेलमध्ये उपलब्ध असून त्यांचा उल्लेख अत्यंत चविष्ठ आणि तेवढ्याच किंमती असा केलेल असतो.  

अर्थात ही रोमनेस्को ब्रोकोली (Romanesco Broccoli),  अमेरिकेमध्ये संशोधनातून निर्माण  केली असा दावा असला तरी इटलीमधील काही जुन्या पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो.  अर्थात कुठलीही का असेना आतातरी रोमनेस्को ब्रोकोली जगातील सर्वाधिक किंमती भाज्यांमधली एक भाजी आहे.  त्या एक किलो भाजीमध्ये एका कुटंबाच्या महिन्याच्या भाज्या येतील हे नक्की…

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.