महागड्या आणि सुंदर घड्याळ घालणे कोणाला आवडत नाही. प्रत्येकालाच असे वाटत असते की, आपल्याकडे एक आलिशान गाडी, घर आणि एक गाडी. अशातच तुम्ही जेव्हा रोलेक्सच्या घड्याळाबद्दल बोलले जाते तेव्हा महागडी आणि डिझाइनर घड्याळ डोळ्यांसमोर येते. एक काळ होता जेव्हा रोलेक्सच्या घड्याळांचा ब्रांन्ड हा जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध झाला होता. जगभरातील श्रीमंतांची पहिली पसंद रोलेक्स होती. (Rolex Success Story)
रोलेक्स जगातील सर्वाधिक प्रमुख आलिशान ब्रँन्डपैकी एक आहे. हा ब्रँन्ड आपली उत्कृट बनावट आणि क्वालिटीसाठी मानले जाते. असे म्हटले जाते की, ज्याच्या हातात रोलेक्सचे घड्याळ तो श्रीमंतांच्या श्रेणीतील आहे. त्यांचे व्यक्तिमत्व वेगळेच दिसते. हैंस विल्सडॉर्फ आणि अल्फ्रेड डेविस यांनी जेव्हा सन १९०५ मध्ये याची स्थापना केली तेव्हा कोणालाच माहिती नव्हते की, तो जगातील सर्वाधिक पसंदीचा ब्रँन्ड ठरला जाईल.
कधी आणि कशी झाली स्थापना?
जर्मनीतील कुलम्बॅक मध्ये २२ मार्च १८८१ ला जन्मलेले हँन्स विल्सडॉर्फ यांचे वडिल डॅनियल फर्डिनेंड विल्सडॉर्फ हे एका हार्डवेयर स्टोरचे मालक होते. आई अन्ना मॅसेल एक प्रसिद्ध दारु बनवणाऱ्या परिवारातील होती. मात्र हँन्स जेव्हा १२ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी आयुष्यात फार कठीण समस्यांचा सामना केला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गरिबीचा सामना केला.
मात्र काकांनी हँन्स आणि त्यांच्या भावंडांना उत्तम शिक्षण देण्यास मदत केली. हँन्स यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्विर्त्झलँन्डला गेले. तेथे एका मोती व्यापाऱ्याकडे काम केले. एकोणीसाव्या वयात हँन्स रिपोर्टर ही झाले. मात्र फार कमी वेळातच त्यांनी कुनो कोर्टेनमध्ये काम केले जो पॉकेट घड्याळांसाठीचा एक प्रसिद्ध निर्यातक होता. कुनो कोर्टेन मध्येच हँन्स यांना घड्याळाबद्दल शिकायला मिळाले.
पत्नीच्या पाठिंब्यामुळे मिळाले यश
सन् १९०३ मध्ये हँन्स लंडनला आहे. येथे नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. एक महागडी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लाखो रुपये एकत्रित केले. मात्र चोरांनी त्यांना लुटले. हँन्स निराथ होत परतले. एक घड्याळ कंपनीत नोकरी करु लागले. आयुष्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात झाली होती.
लंडनमध्ये पत्नीच्या पाठिंब्यामुळे ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. याच दरम्यान त्यांनी एक विशिष्ट पद्धतीचे मनगडी घड्याळ बनवण्याचे स्वप्न पाहिले. दरम्यान, हँन्स यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. लंडनमध्ये त्यांची भेट एक व्यापारी अल्फ्रेड डेविस यांच्याशी झाली. डेविस यांना हँन्स यांची कल्पना आवडली आणि त्यांनी या मध्ये पैसे लावण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला हँन्स विल्सडॉर्फ आणि डेविस यांनी पॉकेट वॉच लॉन्च केले. तीन वर्षातच ब्रँन्डला संपूर्ण ब्रिटेनमध्ये ओळख मिळू लागली. काही कालांतराने ब्रँन्डचे नाव बदलण्याचा विचार केला. हँन्स यांनी रोलेक्स शब्द त्यासाठी निवडला. कारण याचा उच्चार करणे सोप्पे असून ते प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासारखे नाव होते. (Rolex Success Story)
जगभरात मिळाली मान्यता
१९१० मध्ये रोलेक्सने आपले पहिले मनगटी घड्याळ तयार केले. त्यांनी वॉर्ज ऑब्जर्वेशन ब्युरोला भेट दिली. त्यांचे उद्देश यामागील असे होते की, घड्याळ्याच्या योग्यतेचे परिक्षण करणे. सर्वांना याचा निष्कर्श आश्चर्यचकित करणाऱ्यासारखा होता. रॉलेक्सने प्रतिष्ठित परिक्षा पास केली होती. स्विस क्रोनोमीटर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते इतिहासातील पहिले मनगडी घड्याळ बनले.
पहिल्या महायुद्धादरम्यान सैनिकांनी अत्यंत सुविधाजनक रोलेक्सच्या घड्याळांचा वापर करण्यास सुरुवात केली. २० व्या शतकादरम्यान या ब्रँन्डची लोकप्रियता अधिक वाढली, त्यानंतर त्यांनी ऑयस्टर परपेचुअल, सी ड्वेलर, सबमरीनर आणि डेटजस्ट सारखे प्रतिष्ठित मॉडेल सादर केले. या जबरदस्त कलेक्शनने रॉलेक्सला जगातील सर्वाधिक मागणी असणाऱ्या घड्याळ्यांपैकी एक बनवले.
हे देखील वाचा- फॅशनच्या जगात Calvin Klein ची जादू
सर्वांची पसंद रोलेक्स
रोलेक्सच्या पसंदीचा अंदाजा अशा गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की, ड्वेन जॉनसन, सोफिया वेरगारा, विल स्मिथ सारख्या नामांकित लोकांनी या घड्याळ्याचे प्रमोशन केले. वर्ष २०२१ मध्ये रॉलेक्सन १३ बिलियन डॉलरचा रेवेन्यू ही मिळवला होता.