बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) आणि त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांची सध्या चर्चा चालू आहे.किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 74 वर्षाच्या लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या या लेकीनं स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून डॉक्टर असलेली रोहिणी, ही लालू प्रसाद यादव यांची मुलगी सिंगापूरला स्थायिक झाली आहे. लालू प्रसाद यादव यांची तब्बेत बिघडल्यावर तिनं वडिलांना सिंगापूरच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार लालू प्रसाद यादव सिंगापूरला रवाना झाले. तिथे डॉक्टरांनी त्यांना किडणी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आणि यावेळी रोहिणी पुढे झाली. तिचा आणि लालू प्रसाद यादव यांचा रक्टगटही सारखा असल्यानं रोहिणीनं वडिलांना किडणी देण्याचा निर्णय घेतला. लालू प्रसाद यादव यांनी मुलीच्या या निर्णयाचा पहिल्यांदा विरोध केला, पण नंतर मुलीच्या आग्रहापुढे त्यांना झुकावे लागले. आता नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लालू प्रसाद यादव यांच्यावर किडणी प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया सिंगापूरला होईल अशी माहिती आहे. या सर्वात रोहिणीच्या पितृप्रेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
आरजीडीचे नेते लालू यादव(Lalu Prasad Yadav) हे बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. यासाठी सिंगापूरला गेलेल्या लालू प्रसाद यादव यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला मिळाल्यावर त्यांची दुसरी मुलगी यासाठी पुढे आली. सिंगापूरमध्ये राहणारी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने वडिलांना किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणीनं लिहिलं आहे की, माझे आई-वडील माझ्यासाठी देव आहेत. मी माझ्या वडिलांसाठी काहीही करू शकते. रोहिणीच्या या पोस्टवरुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ज्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि प्रकृती चिंताजनक आहे, अशा व्यक्तीला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात येतो. निरोगी व्यक्तीकडून किडनी घेतली जाते आणि रुग्णाच्या शरीरात रोपण केली जाते. यातील किडणी दात्याची जीवनशैली चांगली असेल, तर तो एका किडनीवरही संपूर्ण आयुष्य घालवू शकतो. कोणत्याही निरोगी व्यक्तीचा रक्तगट रुग्णाच्या रक्तगटाशी जुळतो. किडनी दात्याचे वय 18 ते 55 च्या दरम्यान असेल तर दोघांचेही आरोग्य उत्तम रहाते. आता लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांचीही अशीच प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे.
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)आणि रोहिणी आचार्य यादव यांचा रक्तगट एकच आहे म्हणजेच रक्तगट एबी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळेच रोहिणी आचार्य यांनी किडनी देण्यास पुढाकार घेतला आहे. रोहिणी स्वतः एक डॉक्टर असल्याने तिने सिंगापूरच्या डॉक्टरांचा लालू प्रसाद यादव यांच्यासाठी सल्ला घेतला. डॉक्टरांनी रोहिणीचीही तपासणी करुन लालू प्रसाद यादव यांना किडणी देऊ शकत असल्याचे सांगितले. मात्र, सुरुवातीला लालूप्रसाद यादव यासाठी तयार झाले नाहीत. पण रोहिणीनं घेतलेल्या खंबीर भूमिकेपुढे त्यांना झुकावे लागले. आता भारतात परतलेले लालू प्रसाद यादव नोव्हेंबरच्या तिस-या आठवड्यात पुन्हा सिंगापूरला जाणार असून तिथे त्यांच्यावर किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. कुटुंबातील सदस्यांची किडनी घेतल्यास ती शस्त्रक्रीया अधिक यशस्वी होते, असे सांगितले जाते. लालू प्रसाद यादव यांची ही शस्त्रक्रीया किडनी हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंगापूरच्या सेंटर फॉर किडनी डिसीजमध्ये होणार आहे. भाजप नेते आणि माजी राज्यसभा सदस्य आरके सिन्हा यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. आरके सिन्हा यांनीही लालूंना येथे जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला होता.
======
हे देखील वाचा : पहिल्यांदाच खासगी आंतराळ कंपनीचे रॉकेट श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपित, जाणून घ्या खासियत
=====
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांना दोन मुलं आणि सात मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी मीसा भारती राज्यसभेची सदस्य आहे. मीसा भारतीचे 1999 मध्ये शैलेशसोबत लग्न झाले. शैलेश हे व्यवसायाने अभियंता असून त्याने आयसीआयसीआय आणि इन्फोसिसमध्ये काम केले आहे. मीसा भारतीला दोन मुली आणि एक मुलगा आहे. रोहिणी आचार्य ही लालूंची दुसरी मुलगी आहे. 2002 मध्ये तिचे औरंगाबादचे रहिवासी समरेश सिंग यांच्याबरोबर लग्न झाले. समरेश सिंग हे व्यवसायाने संगणक अभियंता आहेत. रोहिणी यादव पतीसोबत सिंगापूरमध्ये राहते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून मध्यंतरी तिचं नावही बिहारच्या उपमुख्यपदासाठी चर्चेत आलं होतं. लालू यादव यांच्या तिसऱ्या मुलीचे नाव चंदा यादव आहे. 2006 मध्ये चंदाचा विवाह इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट असलेल्या विक्रम सिंहसोबत झाला होता. रागिणी यादव या लालू यादव आणि राबडी देवी यांच्या चौथ्या कन्या आहेत. तिने 2012 मध्ये राहुल यादवसोबत लग्न केले. राहुल यादव हा समाजवादी पक्षाचे नेते जितेंद्र यादव यांचा मुलगा आहे. लालू यादव यांच्या पाचव्या मुलीचे नाव हेमा यादव आहे. हेमाचे पती विनित यादव दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहेत. हेमा यादव यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. अनुष्का राव ही लालू प्रसाद यादव यांची सहावी मुलगी आहे. हरियाणाच्या अजय सिंह यादव यांचे चिरंजीव राव यांच्याबरोबर तिचा विवाह झाला आहे. लालू यादव यांची सर्वात धाकटी मुलगी राजलक्ष्मी आहे. तिचा विवाह समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे नातू तेज प्रताप यादव यांच्याबरोबर झालाय. लालू प्रसाद यादव यांना दोन मुलं असून मोठा मुलगा म्हणजे तेज प्रताप यादव. तेज प्रताप यादव यांचा विवाह जेडीयू नेत्या चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्याशी 2018 मध्ये झाला होता. लालू यादव यांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तेजस्वी यादव. तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. सध्या ते बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. सध्या तेजस्वी यादव आरजेडीचे प्रमुख आहेत.
आता लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या मुलांमध्ये रोहिणी आचार्य या त्यांच्या दुस-या मुलीची सर्वाधिक चर्चा आहे. सिंगापूरममध्ये स्थायिक असलेली रोहिणी स्वतः डॉक्टर आहे. रोहिणेचे पती समरेश सिंग, एव्हरकोर पार्टनर्स नावाच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. रोहिणीचे नाव गेल्यावर्षीही चर्चेत आले होते. रोहिणी आचार्य यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात येणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र या बातम्या तेथेच थांबल्या. आता हिच रोहिणी वडीलांना किडणी देण्यासाठी पुढे आली आहे.
सई बने…