चांद्रयान- ३ च्या यशस्वी मिशननंतर आता पुढील मिशनची तयारी इस्रोकडून करण्यात येत आहे. इस्रोच्या पुढील मिशन बद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, भारत पुढील मिशनमध्ये आंतराळात एक महिला रोबोट पाठवणार आहे. तिचे नाव व्योममित्रा (Robot Vyommitra) असे आहे. या मिशनच्या यशानंतर इस्रो आंतराळात आंतराळवीरांना पाठवू शकेल. खरंतर आंतराळात मनुष्याला पाठवण्याचे ट्रायल करण्यासाठी इस्रो गगनयान मिशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे मिशन पुढील दीड वर्षात लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.
या मिशनमध्ये मानवरहित विमानला रॉकेटच्या माध्यमातून आंतराळात पाठवले जाणार आहे. तसेच इस्रो आपली सिस्टिम आणि केलेली तयारी यावर लक्ष ठेवणार आहे. पुढील वर्षात या मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात व्योममित्र रोबोट पाठवला जाणार आहे. याच्या मदतीने मनुष्याला आंतराळात जाणारा मार्ग मोकळा होणार आहे. अशातच जाणून घेऊत व्योममित्राबद्दलच्या काही खास गोष्टी.
इस्रोने मिशन गगनयानसाठी २४ जानेवारी २०२० रोजी हा रोबोट सादर केला होता. हा रोबोट अशा कारणास्तव तयार करण्यात आला होता की, जेणेकरुन आंतराळात आंतराळवीराला पाठवता येईल. याच्या माध्यमातून आंतराळात व्यक्तीवर पडणाऱ्या प्रभावाबद्दल समजून घेण्यास मदत होईल. याच्या काम करण्याच्या टेक्निकचे कौतुक करण्यात आले आहे आणि त्याला जगातील बेस्ट स्पेस एक्सप्लोरर ह्युमेनॉइड रोबोटचा पुरस्कार दिला गेला आहे. तो बंगळरुत ठेवण्यात आला आहे.
खरंतर महिला रोबोट व्योममित्रा ही व्यक्तीप्रमाणे आंतराळात काम करणार आहे. हे गगनयानाच्या क्रु मॉडेलला वाचणार असून महत्त्वाच्या गाइडलाइन्सला समजून घेणार आहे. त्याचसोबत हे ग्राउंड स्टेशनमध्ये असलेल्या वैज्ञानिक आणि मिशन टीम सोबत संपर्क करुन संवाद साधणार आहे. या मानवरहित मिशनमुळे मनुष्याला आंतराळात जाता येऊ शकते. गगनयानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लॉन्चिंगमध्ये भारतीय आंतराळवीर आंतराळात पाठवला जाणार आहे.
इस्रोची अशी योजना होती की, गगनयानाच्या माध्यमातून भारतीय आंतराळवीर ७ दिवसांपर्यंत पृथ्वीच्या परिक्रमा करणार आहे. मात्र यामध्ये बदल झाला. असे म्हटले गेले की, आंतराळवीर ७ ऐवजी ३ दिवसच पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. गगनयानचे क्रु मॉडेल या मिशनमध्ये पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर असलेल्या लोअर बर्थ ऑर्बिटमध्ये परिक्रमा करणार आहे. (Robot Vyommitra)
हेही वाचा- Chandrayaan-3 च्या यशस्वी मिशननंतर इस्रोच्या पुढील मिशनची लिस्ट घ्या जाणून
हे मिशन अत्यंत खास आहे. कारण यामध्ये कोणतीही चुक होता कामा नये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मिशनमध्ये भारतीय वायुसेनेच्या सक्षम वैमानिकांना पाठण्याचा विचार आहे. हेच कारण आहे की, यासाठी तयारीसाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात आहे. इस्रोच्या चांद्रयान-३ मिशननंतर आता जगाचे लक्ष गगनानावर आहे.