नेदरलँड हा वायव्य युरोपमधील एक देश आहे. या देशाचा मोठा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे. हा देश त्यामधील पवनचक्क्या, कालवे आणि ट्यूलिप या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जागतिक पर्यटनामध्ये नेदरलँडचा वाटा मोठा आहे. आता याच नेदरलँडमध्ये घडणा-या राजकीय घडामोडीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण नेदरलँडच्या पंतप्रधानपदाची माळ ३८ वर्षीय रॉब जेटन यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. असे झाले तर, डी६६ पक्षाचे नेते रॉब जेटन हे पहिले समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान होणार आहेत. नेदरलँडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रॉब यांनी गीर्ट वाइल्डर्स यांचा पराभव केला आहे. ३ नोव्हेंबरला पोस्टल मतांची मोजणी झाल्यावर रॉब यांच्या विजयाची घोषणा कऱण्यात येणार आहे. (Rob Jetton)

नेदरलँडमधील राजकीय घडामोडींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या देशात वयाच्या ३८ व्या वर्षी, डी६६ या पक्षाचे नेते रॉब जेटन हे पंतप्रधान होणार आहेत. रॉब हे समलैंगिक असून याची त्यांनी वयाच्या २४व्या वर्षीच जाहीर कबुली दिली होती. हॉलीबॉल खेळाडू म्हणून आपले करिअर करण्यासाठी उत्सुक असलेले रॉब कॉलेजपासूनच राजकीय चळवळीमध्ये सक्रीय झाले आणि आता ते पंतप्रधान पदापर्यंत झेप घेत आहेत. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी इस्लामविरोधी लोकप्रियतावादी गीर्ट वाइल्डर्स यांना पराभूत केले. रॉब यांच्या रुपानं नेदरलँड्समधील राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. (International News)
रॉब जेटन यांनी ज्या गीर्ट वाइल्डर्सचा पराभव केला, त्यांचे नाव भारतामध्येही गाजले आहे. या गार्ट वाइल्डर्ड यांनी नुपूर शर्मा प्रकरणानंतर उघडपणे नुपूर यांची बाजू घेतली होते. सोशल मीडिया पोस्टमध्ये गीर्ट यांनी, “धाडसी नुपूरला माझा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एक वैयक्तिक संदेश पाठवला आहे. सत्य बोलल्याबद्दल तिला इस्लामवाद्यांनी धमकावले आहे. जगभरात स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्या सर्वांनी नुपूरला पाठिंबा द्यावा. मला माझ्या भारत भेटीदरम्यान एक दिवस तिला भेटायचे आहे.”असा मेसेज शेअर केला होता. नेदरलँडमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. याबाबत वाइल्डर्स यांनी मोहीम चालू केली. सार्वत्रिक निवडणुकीतही वाइल्डर्स यांनी स्थलांतर विरोधी धोरणांना प्रोत्साहन दिले होते आणि कुराणवर बंदी घालण्याची मागणीही केली होती. (Rob Jetton)

याच वाइल्डर्स यांच्याविरोधात गेल्या दोन वर्षापासून रॉब जेटन यांनी प्रचार सुरु केला होता. जेटनने त्यांच्या पक्षाला डच राजकारणात पाचव्या स्थानावरून वरच्या स्थानावर नेले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या “हो, आपण करू शकतो” या घोषणेपासून प्रेरित होऊन “हे शक्य आहे” ही घोषणा दिली. त्यांनी वाइल्डर्सवर समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. शिवाय नेदरलँड्सला युरोपच्या मध्यभागी परत आणण्यासाठी मला सहकार्य करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला नेदरलँडच्या जनतेनं भरभरुन मत दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रॉब जेटनचा जन्म २५ मार्च १९८७ रोजी दक्षिण डच प्रांतातील ब्राबंटमधील एका लहान शहरात झाला. तरुण वयातच समलैंगिक म्हणून त्यांनी जाहीर कबुली दिली. रॅडबॉड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदवी आणि पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली आहे. २०१७ मध्ये, रॉब, डी६६ पक्षाचे सर्वात तरुण खासदार झाले. (International News)
=======
हे देखील वाचा : Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !
=======
त्यांची प्रतिभा पाहून माजी पंतप्रधान मार्क रुटे यांनी त्यांच्याकडे हवामान मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आणि रॉब यांनी अनेक सकारात्मक योजना राबवून या मंत्रालयाला नवे रुप दिले. जेटन यांचे वैयक्तिक आयुष्यही त्यांनी कधी लपवून ठेवले नाही. हॉकी खेळाडू, ऑलिंपियन निको कीनन यांना रॉब डेट करत आहेत. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी, या जोडप्याने सोशल मिडियावर “लवकरच मिस्टर अँड मिस्टर” या कॅप्शनसह त्यांच्या लग्नाची घोषणा केली. २०२२ मध्ये या रॉब आणि किनन या दोघांची भेट झाली. तेव्हापासून ते दोघंही एकत्र रहात असून रॉब यांनी आपल्या राजकीय जीवनात किनन यांच्यासोबतच्या नात्याचा कधीही अडसर होणार नाही, असे जाहीर मुलाखतीमध्ये सांगितले आहे. नेदरलँडचे पंतप्रधान झाल्यावर रॉब यांच्यापुढे हवामान बदलांमुळे नेदरलँडमधील किना-यांना होत असलेल्या धोक्याचा सामना प्रामुख्यानं करावा लागणार आहे. शिवाय स्थलांतरितांचा प्रश्न, आर्थिक आव्हानांचाही सामना त्यांना करावा लागणार आहे. (Rob Jetton)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
