अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समधील कालव्यामध्ये एका रात्रीत पाण्याचा रंगच बदलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सारंदी नावाच्या या कालव्याचे पाणी एका रात्रीत रक्तासारखे लाल झाले. हा लाल रंग बघून नागरिकांमध्ये सुरुवातीला घबराट निर्माण झाली. सोबत या पाण्यातून रासायनिकांचा वास येऊ लागल्यामुळे या कालव्याच्या परिसरात अधिक भीती निर्माण झाली. या सारंदी कालव्यातील पाण्याचा उपयोग परिसरातील शेती आणि अन्य कामासाठी होतो. यात हे लाल रंगाचे पाणी जाणार असल्यामुळे आसपास पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा कालवा पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित क्षेत्राच्या सीमेला लागून आहे. अर्जेंटिना सरकारनं पर्यावरण मंत्रालयाला या कालव्याच्या पाण्याचे नमुने घेण्यासाठी पाठवले आहे. तसेच कालव्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी आणि त्याचा या भागातील जनजीवनावर होणा-या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांची टिमही नियुक्त करण्यात आली आहे. (Buenos Aires)
वास्तविक हा कालवा ज्या भागातून जातो, तिथे अनेक कारखाने आहेत, याच कारखान्यातील सांडपाण्यामुळे कालव्याच्या पाण्याचा रंग बदलल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे पाण्याचा रंग बदलला आहे. मात्र आता हा रंग रक्तासारखा लालेलाल झाल्यामुळे नागरिकांना चिंता व्यक्त केली आहे. अर्जेंटिनामधील सारंदी कालवा एका रात्रीत लालेलाल झाला. रक्ताचा पाट वाहत असल्याचे दृष्य बघून परिसरात घबराट पसरली. या लाल पाण्याचा नुमना घेण्यासाठी शास्त्रज्ञ दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासयाला सुरुवात केली आहे. मात्र सारंदी कालव्याच्या भोवती असलेल्या कपड्यांच्या कारखान्यातूनच मोठ्या प्रमाणात येणा-या रासायनिक पाण्यामुळे कालव्याचे पाणी लाल झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (International News)
अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समधील नदीचा हा सुमारे सहा मैल सारंदी कालवा शहरातून वाहत आहे. या भागातच कापड रंगवण्याच्या रसायनांमुळे या कालव्यातील पाण्याचा रंग यापूर्वी अनेकवेळा बदलला आहे. या कालव्याच्या परिसरात कापड आणि चामड्याच्या वस्तू तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यातून येणा-या रसायनांमुळे या सारंदी कालव्याचा यापूर्वीही अनेकवेळा रंग बदलला आहे. शिवाय या पाण्याला अनेकवेळा दुर्गेंधी येते. कारखान्यातून कचराही या कालव्यात टाकला जातो. त्यामुळेच सारंदी कालव्याचे पाणी खराब झाले आहे. या सर्वांचा परिणाम या भागातील नागरिकांच्या शरीरावर होत असल्याचीही ओरड आता होत आहे. (Buenos Aires)
सारंदी कालव्याचे पाणी याआधी निळे, हिरवे, जांभळे आणि गुलाबी रंगाचेही झाले आहे. एकदा तर कालव्याच्या पाण्यावर ग्रीसचा थर जमा झालेला होता. त्यामुळेच या भागातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. सारंदी कालवा पुढे अर्जेंटिना आणि उरुग्वे यांच्यातील एक प्रमुख असलेल्या रिओ दे ला प्लाटा नदिला मिळतो. परिणामी या कालव्यातील दूषित पाणी या नदिच्या पाण्यातही मिसळले जाते. या नद्यांमधीलही पाणी प्रदूषित होत असल्याची ओरड आहे. मातान्झा-रियाचुएलो नदीचे खोरे हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात प्रदूषित जलसाठ्यांपैकी एक मानले जाते. या नदीची स्वच्छता करण्यासाठी आणि औद्योगिक कचरा, सांडपाणी आणि त्यात मिसळण्यात येणारे रासायनिक पाणी थांबवण्यासाठी सरकारतर्फे योजना राबवण्यात येत आहेत. मात्र सारंदी कालव्यातील प्रकार समोर आल्यानं सरकारी योजना, नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (International News)
=============
हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट
Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?
=============
2021 मध्येही दक्षिण पॅटागोनिया प्रदेशातील एका तलावाचे पाणी पूर्णपणे गुलाबी झाले होते. या पाण्यात सोडियम सल्फेट अँटी-बॅक्टेरियलचे अतिरिक्त प्रमाण असल्याचे नंतर सिद्ध झाले. यासंदर्भात अर्जेंटिनामधील पर्यावरण कार्यकर्ते गेल्या काही वर्षापासून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कालव्यांच्या बाजुलाच सरकारनं रासायनिक कारखान्यांना परवानगी दिल्यामुळे पर्यावण संस्थांचे काम अपुरे पडत आहेत. अर्जेंटिनामध्ये अनेक नद्या आहेत. त्यात पराना नदी, रिओ दे ला प्लाटा, पिल्कोमायो नदी आणि बर्मेजो या नद्यांचा समावेश आहे. या नद्यांचा वापर जल वाहतुकीसाठीही करण्यात येतो. मात्र या नद्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. अर्जेंटिनामध्ये नद्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करुन पर्यांवरणाचे कायदे अधिक कडक करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातूनच सारंदी कालव्यासारख्या घटनांत कमी येईल, असे या कार्यकर्त्यांना वाटत आहे. (Buenos Aires)
सई बने