सध्याच्या काळात एनर्जी ड्रिंक पिणे हे एक प्रकारचे फॅशन झाले आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंतच हे कोणते ना कोणते एनर्जी ड्रिंक पितात. अशातच बहुतांश लोक कोल्ड ड्रिंक सोडून आता एनर्जी ड्रिंक पिऊ लागली आहेत. याचे मार्केट वेगाने वाढत आहे. लोकांचे असे मानणे आहे की, एनर्जी ड्रिंक प्यायल्याने त्यांना उर्जा मिळल्याचा भास होतो. दरम्यान, एनर्जी ड्रिंकमुळे शरिराला फायदा होतोच पण त्यामुळे आरोग्याला नुकसान सुद्धा होते. तर अमेरिकेतील एका व्यक्तीने १० मिनिटात १२ बॉटल एनर्जी ड्रिंकचे सेवन केले. असे केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये असलेली साखर, कॅफीन आणि केमिकलच्या कारणास्तव त्याला पचनाची समस्या उद्भवली.(Risks of Energy Drinks)
तर २००७ मध्ये एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्याच्या कारणास्तव १२-१७ वयोगटातील १४५ मुलांना आपत्कालीन वॉर्डात भरती करण्यात आले होते. तर २०११ मध्ये ही संख्या वाढून १४९९ झाली. तर जाणून घेऊयात एनर्जी ड्रिंक प्यायल्याने आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवू शकतात त्याबद्दल अधिक.

-हायपरटेंशनची समस्या
एनर्जी ड्रिंकमध्ये खुप प्रमाणात कॅफेन असते. जी एक चिंतेची बाब आहे. अर्धा लीटर एनर्जी ड्रिंकमध्ये कमीत कमी २०० ग्रॅम कॅफेन असते, जे ५०० ग्रॅम पर्यंत सुद्धा असू शकते. कॅफेनचे गरजेपेक्षा अधिक सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशन, हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, भिती आणि कॅल्शियमची कमतरता उद्भवू शकते. हार्वर्डच्या एका रिपोर्ट्सनुसार, मध्यम प्रमाणात १.२ ग्रॅम किंवा अधिक कॅफेनचे सेवन केल्यास आरोग्यावर त्याचा प्रतिकुल प्रभाव पडू शकतो. तर १०.१४ ग्रॅम कॅफेनच्या सेवनामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो.
-मधुमेहाचा धोका
कॅफएनच्या अधिक वापरासह साखरेचा ही खुप प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. एनर्जी ड्रिंकच्या अर्ध्या लीटर बॉटलमध्ये २२० कॅलरीज असतात. त्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.(Risks of Energy Drinks)
हे देखील वाचा- शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घ्या
-दातांची समस्या
एनर्जी ड्रिंक्स मध्ये साखर उच्च प्रमाणात असल्याने त्याचा दातांवर ही परिणाम होतो. यामध्ये असलेली साखर तुमच्या दातांचे इनामेल संपवते आणि त्यामुळे हायपर-सेंसिटिव्हिटी, कॅविटी सारख्या समस्या सुरु होतात. एनर्जी ड्रिंक प्यायल्याने झोप ही व्यवस्थितीत होत नसल्याची समस्या उद्भवू शकते.